Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > किती दिवस उशीरा आली मासिक पाळी तर 'नॉर्मल' समजायचे? पाळी नियमित येण्यासाठी करा ३ गोष्टी...

किती दिवस उशीरा आली मासिक पाळी तर 'नॉर्मल' समजायचे? पाळी नियमित येण्यासाठी करा ३ गोष्टी...

how many days delay in periods is normal : period delay how many days is ok : how late can a period be normal : मासिक पाळीचे चक्र बिघडले, कधी उशिरा येते तर कधी लवकर? सायकल रेग्युलर करण्यासाठी ३ टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2026 13:28 IST2026-02-16T13:15:36+5:302026-02-16T13:28:47+5:30

how many days delay in periods is normal : period delay how many days is ok : how late can a period be normal : मासिक पाळीचे चक्र बिघडले, कधी उशिरा येते तर कधी लवकर? सायकल रेग्युलर करण्यासाठी ३ टिप्स...

periods late how many days is normal how many days delay in periods is normal | किती दिवस उशीरा आली मासिक पाळी तर 'नॉर्मल' समजायचे? पाळी नियमित येण्यासाठी करा ३ गोष्टी...

किती दिवस उशीरा आली मासिक पाळी तर 'नॉर्मल' समजायचे? पाळी नियमित येण्यासाठी करा ३ गोष्टी...

मासिक पाळी (Periods) ही स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणारी एक नॉर्मल आणि नैसर्गिक क्रिया आहे. स्त्रियांची प्रजनन क्षमता आणि एकूणच आरोग्यासाठी ही अत्यंत आवश्यक असते. इतकंच नाही तर, मासिक पाळी ही केवळ एक शारीरिक क्रिया नसून ती स्त्रीच्या संपूर्ण आरोग्याचा आरसा असते. साधारणपणे मासिक पाळीचे चक्र २१ ते ३५ दिवसांच्या दरम्यान असते आणि बहुतेक स्त्रियांमध्ये २८ दिवसांचे चक्र हे निरोगी मानले जाते. मात्र प्रत्येक महिलेच्या शरीररचनेनुसार यात थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे पाळी काही दिवस उशिरा किंवा लवकर येणे अनेकदा नैसर्गिक असते. मासिक पाळी वेळेवर येणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे, पण त्यात होणारे छोटे-मोठे बदल नेहमीच धोकादायक नसतात. काहीजणींच्या बाबतीत पाळी येण्याची क्रिया ही दर महिन्याला थोडी उशिराच येते किंवा वरचेवर सतत पाळीची तारीख पुढे गेल्याचा अनुभव येतो(periods late how many days is normal).

अनेकदा पाळी काही (how many days delay in periods is normal) दिवस उशिरा आल्यावर बऱ्याचजणींच्या मनात अनेक प्रश्न तयार होतात. दर महिन्याला पाळी येण्यात होणारा हा उशीर नॉर्मल आहे की शरीरातील एखाद्या मोठ्या बदलाचा इशारा? इतकंच नाही तर, पाळी येण्यात नक्की किती दिवसांचा उशीर 'नॉर्मल' आहे? आणि कधी आपल्याला (how late can a period be normal) डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे? या सगळ्या विषयांवरील माहिती, आरोग्य तज्ज्ञ डॉ. सोनू खोखर यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत दिलेली आहे. 

मासिक पाळी येण्यात नक्की किती दिवसांचा उशीर 'नॉर्मल' आहे?

डॉ. सोनू खोखर यांच्या मते, जर तुमची मासिक पाळी २ ते ५ दिवस उशिरा येत असेल, तर ते नॉर्मल असू शकते. यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

बऱ्याच वेळा हार्मोनल बदल, मानसिक ताण, प्रवास, खाण्यापिण्याच्या सवयींमधील बदल किंवा पुरेशी झोप न मिळणे यामुळे पाळीचे चक्र थोडे विस्कळीत होऊ शकते.

जर मासिक पाळी ७ दिवसांपर्यंत उशिरा आली, तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, जर दर महिन्याला असेच होत असेल किंवा १० दिवसांपेक्षा जास्त उशीर होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

प्रत्येक पदार्थ गरम असतानाच खाण्याची सवय वाईट! एका चुकीमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका - न्यूट्रिशनिस्ट देतात मोलाचा सल्ला... 

मासिक पाळी उशिरा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात...

१. मानसिक ताण :- मानसिक ताण हे एक महत्त्वाचे कारण आहे. जेव्हा आपण जास्त तणावाखाली असतो, तेव्हा शरीरातील 'कोर्टिसोल' नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते आणि त्याचा परिणाम ओव्हुलेशन प्रक्रियेवर होतो.

२. आरोग्य समस्या :- थायरॉईड किंवा PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सारख्या समस्यांमुळे देखील मासिक पाळी अनियमित होऊ शकते.

३. औषधे आणि आहार :- ठराविक प्रकारच्या गोळ्या खाल्ल्याने किंवा आहारामधील अचानक बदल यामुळे देखील पाळी उशिरा येऊ शकते.

तूप खाणं सोडलंय? लठ्ठ असाल  तरीही रोज खा 'इतके' चमचे तूप; हृदयविकाराचा धोका टळून होईल वेटलॉसही... 

जर तुमची मासिक पाळी १० ते १५ दिवसांपेक्षा जास्त उशिरा येत असेल, सलग २ ते ३ महिने पाळी आली नसेल किंवा या दिवसांमध्ये खूप जास्त वेदना किंवा असामान्य रक्तस्त्राव होत असेल, तर डॉक्टरांना नक्की भेटा.

या व्यतिरिक्त, जर तुमचे पाळीचे चक्र अचानक पूर्णपणे बदलले असेल, तरीही डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे. डॉक्टर गरजेनुसार ब्लड टेस्ट, अल्ट्रासाऊंड किंवा हार्मोनल तपासणी करण्याचा सल्ला देऊ शकतात.

पाळीचे चक्र नियमित करण्यासाठी, दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. हेल्दी डाएट व पौष्टिक आहार घ्या आणि स्ट्रेसपासून दूर राहा.

Web Title : मासिक धर्म में देरी: कब है सामान्य? नियमितता के लिए 3 उपाय।

Web Summary : तनाव, यात्रा या आहार के कारण मासिक धर्म में 2-5 दिनों की देरी सामान्य है। यदि 7 दिनों से अधिक देरी हो, अनियमित चक्र, तेज दर्द या भारी रक्तस्राव हो तो डॉक्टर से सलाह लें। नियमितता के लिए नींद, स्वस्थ आहार और तनाव कम करना ज़रूरी है।

Web Title : Delayed Period: When is it Normal? 3 Tips for Regularity.

Web Summary : A period delay of 2-5 days is often normal due to stress, travel, or diet. Consult a doctor if it's over 7 days, or if you experience irregular cycles, severe pain, or heavy bleeding. Prioritize sleep, a healthy diet, and stress reduction for cycle regularity.