Premenstrual Syndrome Relief Tea : दर महिन्यात येणाऱ्या मासिक पाळीमुळे सगळ्याच महिलांना वेदना, पोटदुखी, थकवा आणि मूड स्विंग या समस्यांचा सामना करावा लागतो. हा नेहमीचा त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात किंवा त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. अशात वेळीच जर एखादा सोपा आणि नैसर्गिक उपाय मिळाला, तर त्यातून मोठा दिलासा मिळू शकतो. प्रसिद्ध अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) हिने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर हा मासिक पाळीदरम्यान त्रास कमी करण्यासाठी एक उपाय शेअर केला आहे. हा उपाय म्हणजे एक खास चहा आहे. महत्वाची बाब म्हणजे हा चहा बनवायला खूप सोपा आहे.
PMS Relief Tea रेसिपी
सोहा हिने हा चहा “super easy” असल्याचं सांगून रेसिपी शेअर केली. ताजं आले किसून उकळत्या पाण्यात घाला. त्यात एक दालचिनीची काडी टाका, चव आणि आरोग्यासाठी थोडं मध घाला.
सोहानं सांगितलं की, हा खास चहा मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना, क्रॅम्प्स कमी करतो, मूड चांगला करतो आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासही मदत करतो.
काय काळजी घ्याल?
हा चहा नॅचरल आहे आणि सोपा घरगुती उपाय आहे, मात्र प्रत्येक महिलेचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.