साधारणपणे महिलांना दर २८ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे मासिक पाळीचे चक्र प्रत्येक महिलेसाठी वेगळे असते आणि त्यामुळे काही दिवसांचा फरक असू शकतो परंतु बऱ्याचदा (Dont Ignore Late Periods These 3 Medical Conditions Might Be The Cause) असे घडते की, आपल्यापैकी काहीजणींना सतत (What health conditions cause late periods) वरचेवर मासिक पाळी नेहेमीच्या ठरलेल्या तारखेपेक्षा उशिराच येते. मासिक पाळी (Missed your period but not pregnant 6 possible causes) नियमितपणे उशिरा येणे हे अनेक महिलांसाठी चिंतेचे कारण ठरु शकते. काहीवेळा ही समस्या तात्पुरती असू शकते, परंतु वारंवार असे होत असल्यास, ही काही गंभीर आरोग्याच्या समस्यांची लक्षण असू शकतात( 6 Reasons For Delayed or Missed Periods).
अनेकदा महिलांना PCOS, PCOD सारख्या समस्या असल्याने मासिक पाळी वेळेवर येत नाही. अनेकदा मासिक पाळीची तारीख चुकल्यानंतर स्त्रियांना वाटते की, गर्भधारणा झाली आहे. परंतु, २-३ ते महिन्याचा काळ उलटून गेल्यानंतरही प्रेग्नेंसी नसेल तर इतर काही कारणांमुळे मासिक पाळीचे चक्र बिघडते. वजनात बदल होणे, हार्मोनल अनियमितता आणि रजोनिवृत्ती सारख्या समस्या देखील असतात. परंतु, ही समस्या सतत होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. परंतु तज्ज्ञांच्यामते, जर मासिक पाळी उशिरा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण त्यामागे अनेक मोठ्या आरोग्य समस्या असू शकतात. याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल परिहार यांनी त्यांच्या इंस्टग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत, मासिक पाळी वारंवर उशीरा येत असेल तर कोणत्या शारीरिक समस्या सतावू शकतात ते पाहूयात.
मासिक पाळी वारंवार उशिरा येत असेल तर...
१. PCOS आणि PCOD ची समस्या :- स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल परिहार म्हणतात की, अनियमित मासिक पाळीचे पहिले मोठे कारण म्हणजे PCOS किंवा PCOD ची समस्या असू शकते . या स्थितीत महिलांचे हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम आणि नको असलेले चेहऱ्यावरील केस यांसारखी लक्षणे दिसतात.
२. थायरॉईड :- थायरॉईडमुळे मासिक पाळी वेळेवर येण्यात अडचणी येतात. यात असणारे संप्रेरकांचे प्रमाण जास्त किंवा कमी झाल्यास मासिक पाळीचे चक्र बिघडते. थायरॉईडच्या आजारामुळे महिलांना वेळेवर पाळी येत नाही. तसेच पाळी अधिक काळ थांबवून ठेवली जाते. ज्याला अमेनोरिया असेही म्हणतात.
डायबिटिस असेल तर पोहे खाणं कितपत सुरक्षित? पोषणतज्ज्ञ सांगतात, खायचेच असतील तर पोहे ‘असे’ खा...
३. गर्भधारणेच्या प्रक्रियेवर परिणाम :- मासिक पाळी नियमितपणे उशिरा येणे किंवा अनियमित होणे याचा ओव्हुलेशन प्रक्रियेवर थेट परिणाम होऊ शकतो. ओव्हुलेशन म्हणजे अंडकोषातून अंडोत्सर्जन होणे, जे गर्भधारणेसाठी आवश्यक असते. जर मासिक पाळी नियमितपणे उशिरा येत असेल, तर अंडोत्सर्जनाची वेळ आणि प्रमाण अनियमित होऊ शकते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते.
४. रजोनिवृत्तीची पूर्व स्थिती :- डॉक्टरच्या मतानुसार, जर तुमचे वय चाळीशीच्या पुढे असेल तर तुम्ही प्री-मेनोपॉजच्या स्थितीत असू शकता. हा असा टप्पा असतो जेव्हा शरीर रजोनिवृत्तीकडे वाटचाल करत असते आणि अशावेळी हार्मोनल बदल वेगाने होऊ लागतात. अशा परिस्थितीत, या काळात मासिक पाळी उशिरा येऊ शकते.
रोजच्या आहारात 'या' ३ भाज्या हव्याच! डायबिटीस राहील कायम नियंत्रणात - शुगर वाढण्याचं टेंशन दूर...
५. बदलती लाईफस्टाईल व डेली रुटीन :- स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की मासिक पाळी उशिरा येण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शरीरात होणारे हार्मोनल बदल. हे बदल मासिक पाळीवर थेट परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुमच्या डेली रुटीनमध्ये अचानक बदल झाला, जसे की नाईट शिफ्ट सुरू झाली कामाचा जास्त ताण घेणे, तर या सर्व गोष्टी हार्मोन्सवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे मासिक पाळी उशिरा येऊ शकते.
६. वजन जास्त असणे :- डॉक्टर सोनल यांच्या मते, शरीरातील चरबीचे प्रमाण देखील मासिक पाळीवर थेट परिणाम करु शकते. जर एखाद्या महिलेचे वजन जास्त असेल किंवा जास्त व्यायाम करत असाल तर त्यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होऊ शकते. या असंतुलनामुळे गर्भधारणेवर परिणाम होतो आणि मासिक पाळी येण्यास उशीर किंवा अनियमितता येते.