Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मासिक पाळीच्या चार दिवसांत कोणती फळं खावी, कोणत्या फळांनी वाढतो त्रास? तब्येतीनुसार पाहा काय खावं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:11 IST

Fruits To Avoided During Menstruation : काही फळं मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खाल्लीत तर आराम मिळतो, पण काही फळं अशीही असतात जी काहीतरी गडबड निर्माण करू शकतात. अशात कोणती फळं टाळावीत हे पाहुयात.

Fruits To Avoided During Menstruation : मासिक पाळी हा असा काळ असतो ज्यात महिलांना वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. मूड स्विंग्स, असह्य वेदना, डोकेदुखी, कमजोरी अशा कितीतरी गोष्टी महिला दर महिन्यात सहन करत असतात. या पाच ते सहा दिवसांमध्ये हार्मोन्समध्ये बदल होत असल्याने आहाराची देखील खूप काळजी घ्यावी लागते. काही फळं या दिवसांमध्ये खाल्लीत तर आराम मिळतो, पण काही फळं अशीही असतात जी काहीतरी गडबड निर्माण करू शकतात. healthfab वेबसाइटच्या एका रिपोर्टमध्ये मासिक पाळीदरम्यान कोणती फळं खाणं टाळलं पाहिजे हे सांगण्यात आलंय.

अननस  

अननस हे फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. यातून भरपूर पोषण मिळतं. पण मासिक पाळीत हे फळ कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे. कारण यातील एंझाइम्सने शरीरातील ब्लड फ्लो अचानक वाढू शकतो. ज्यामुळे महिलांना जास्त रक्तस्त्रावाचा सामना करावा लागू शकतो. 

कलिंगड

कलिंगडामध्ये भरपूर पाणी असतं. त्यामुळे हे फळ या दिवसांमध्ये खूप फायदेशीर ठरतं. पण मासिक पाळी असताना कलिंगड खाल्ल्यास समस्या निर्माण होऊ शकते. यातील पाण्याचं जास्त प्रमाणच शरीरात ब्लोटिंग आणि पाणी थांबण्याची समस्या वाढवू शकतं. आधी या दिवसांमध्ये पोट फुगण्याची समस्या असते, त्यात कलिंगड खाल्ल्याने आणखी वाढू शकते. 

आंबट फळं

संत्री, लिंबू आणि ग्रेप्स यांसारख्या आंबट फळांमध्ये अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे पचन तंत्र प्रभावित होतं. आधीच मासिक पाळी सुरू असताना अॅसिडिटी किंवा मळमळ अशा समस्या होत असतात, अशात जर ही आंबट फळं खाल्लीत तर लक्षणं आणखी वाढू शकतात. 

कच्ची केळी 

कच्च्या केळीमधील रेजिस्टेंट स्टार्च पचनाला अवघड असतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोट जड वाटण्याची समस्या होऊ शकते. मासिक पाळीत शरीर आधीच संवेदनशील असतं, त्यात असं काही खाऊन समस्या वाढू शकतात.

ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स सामान्यपणे हेल्दी मानले जातात. पण ज्यांमध्ये जास्त शुगर असते, असे ड्राय फ्रूट्स टाळले पाहिजेत. जास्त शुगरने शरीरात सूज वाढते आणि मूड स्विंग्सही वाढतात. ज्यामुळे मासिक पाळीत आणखी त्रास होऊ शकतो.

कोणती फळं खावीत?

काही फळं मासिक पाळीत नुकसानकारक ठरत असले तरी या दिवसांमध्ये फळंच खाऊ नये असं नाही. या दिवसांमध्ये पिकलेली केळी, सफरचंद, बेरीज आणि कीवीसारखी फळे फायदेशीर ठरतात. या फळांनी पचन चांगलं होतं, सूज कमी होते आणि शरीराला पोषक तत्व मिळतात. एक महत्वाचा मुद्दा असा की, प्रत्येक महिलेचं शरीर हे वेगवेगळं असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीने जर एखाद्या महिलेला नुकसान होत असेल, तर तीच गोष्ट दुसऱ्या महिलेसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे शरीराचे संकेत समजून डाएट निवडणं फायद्याचं ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Menstruation: Some fruits are beneficial, but some can be harmful.

Web Summary : During menstruation, avoid pineapple, watermelon, acidic fruits, raw bananas, and sugary dried fruits. Opt for ripe bananas, apples, berries, and kiwis for better digestion and nutrition.
टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यस्त्रियांचे आरोग्यहेल्थ टिप्सअन्न