Join us   

Menstrual Health : पहिल्या दिवशी कंबर, पोट खूप दुखतं? पाळीला वेदनादायक बनवतात या ५ चूका, डॉक्टरांचा खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 4:14 PM

Menstrual Health : मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी किंवा मासिक पाळीदरम्यान, तुम्हाला प्रायव्हेट पार्टवर किंवा त्याच्या आजूबाजूला शेव्हिंग किंवा वॅक्सिंग पूर्णपणे टाळावे लागेल.

पीरियड्स हा महिलांच्या शरीरासाठी खूप सेंसिटिव्ह असतात.   या काळात जर तुम्ही चुका केल्या तर इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो आणि पीरियड्स दरम्यान होणारा त्रासही वाढू शकतो. मासिक पाळी दरम्यान, आपण निरोगी आहार, व्यायाम किंवा योगा करायलाच हवा. या काळात काही वेगळी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता आणि तुमच्या सवयींवर विशेष लक्ष द्या.

या लेखात आपण अशा 5 सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या महिलांनी मासिक पाळी दरम्यान आणि विशेषतः मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी टाळल्या पाहिजेत. याबाबत झलकारीबाई हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ दीपा शर्मा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Things to avoid on first day of periods)

1) शेविंग किंवा वॅक्सिंग करणं

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी किंवा मासिक पाळीदरम्यान, तुम्हाला प्रायव्हेट पार्टवर किंवा त्याच्या आजूबाजूला शेव्हिंग किंवा वॅक्सिंग पूर्णपणे टाळावे लागेल. मुली किंवा स्त्रिया मासिक पाळी दरम्यान योनीमार्ग स्वच्छ ठेवू इच्छितात आणि वॅक्सिंग किंवा शेव्हिंगची चूक करतात. योनिमार्गाची त्वचा मासिक पाळीच्या काळात संवेदनशील असते, जर तुम्ही शेव्हिंग किंवा वॅक्सिंग करत असाल तर त्वचेवरच्या वेदना वाढून त्रास होऊ शकतो. 

'या' कारणांमुळे स्त्रियांना उद्भवते त्रासदायक मोलर प्रेग्नंसी; लक्षणं कशी ओळखाल? वाचा डॉक्टरांचा सल्ला

२) कॅफिनचे सेवन

मासिक पाळीचा पहिला दिवस नाजूक असतो, या दिवशी वेदनाही जास्त होतात, अनेक महिलांना डोकेदुखीची समस्या देखील असते, परंतु वेदना कमी करण्यासाठी तुम्ही कॅफिनचे सेवन करू नये. चहा किंवा कॉफीच्या अतिसेवनामुळे तणाव आणि चिंता वाढू शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन मासिक पाळीच्या वेदना वाढतात. म्हणून अशा गोष्टी टाळा. तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टी घेऊ शकता.

३) जास्त गोड खाऊ नका़

जर तुम्ही मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून क्रेविंग्स नियंत्रित केली नाही, तर तुम्ही उर्वरित दिवस अस्वस्थ आहार घ्याल. पीरियड्सच्या काळात अनेक महिलांना गोड खाण्याची इच्छा असते, परंतु तुम्हाला गोड खाणे टाळावे लागते. साखर किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्याने पीरियड्सच्या काळात दुखण्याची समस्या तर वाढतेच, त्याचप्रमाणे गोड खाल्ल्याने  कॅलरीज वाढू शकतात. 

 रात्रीच्या जेवणानंतर 'या' चुका कराल तर तुमचंही भरभर वाढेल वजन; हा घ्या मेटेंन राहण्याचा सोपा मंत्र

४)  पेनकिलर खाणं

पीरियड्स ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, यादरम्यान तुम्ही पहिल्याच दिवशी वेदना कमी करण्यासाठी औषध घेऊ नये. डॉ. दीपा यांच्या म्हणण्यानुसार, माझ्याकडे अनेक रुग्ण येतात ज्यांना मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होत असतात आणि ते मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून औषध घेणे सुरू करतात, परंतु तुम्ही अशी चूक करू नये. पहिल्या दिवशी पीरियड्सच्या वेदना जास्त होतात नंतर वेदना कमी होत जाते. या दरम्यान, तुम्ही सकस आहार घ्या, परंतु औषध टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा औषधाचा तुमच्या हार्मोन्सवर वाईट परिणाम होईल.

५) पाणी न पिणं

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी, तुम्हाला निरोगी आहार आणि हायड्रेशनची काळजी घ्यावी लागेल. ज्या महिलांना कमी पाणी पिण्याची सवय असते त्यांना स्नायूंमध्ये जास्त वेदना होतात किंवा गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मासिक पाळीच्या पहिल्याच दिवसापासून तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या टाळावी लागेल आणि ताजी हायड्रेटिंग फळे खावी लागतील जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिऊ शकता.  

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यस्त्रियांचे आरोग्यहेल्थ टिप्सआरोग्य