Join us   

Menstrual Cycle : महिला क्रिकेटर पांढऱ्या कपड्यात पिरिएड्सचं टेंशन कसं मॅनेज करतात? खेळाडूकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 2:04 PM

Menstrual Cycle : त्या पाच दिवसांच्या कसोटीदरम्यान इंग्लंडचा जवळजवळ अर्धा संघ त्यांच्या पिरिएड्समध्ये होता

ठळक मुद्दे टॅमीला काळजी वाटत होती की जर तिच्या कपड्यांवर मासिक पाळीचे डाग लागले तर ती टॉयलेट ब्रेक कसा घेऊ शकेल. टेलिव्हिजनवर लाइव्ह जाताना जर असं काही झालं तर? टॅमी ब्यूमोंटला सात वर्षांत पहिल्यात कसोटी पूर्वी इतकी चिंता वाटत होती.पीरियड्सबद्दल बोलणे अजूनही खेळात बऱ्याचदा निषिद्ध मानले जाते, परंतु इंग्लंडमधील महिला क्रिकेटपटू खेळात महिलांच्या आरोग्य सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या ध्येयावर आहेत. 

(Image Credit- The cricketer)

क्रिकेटचे चाहते वुमेंस टेस्ट क्रिकेटही तितक्याच उत्साहानं पाहतात. खूप कमी वेळा महिलांची टेस्ट क्रिकेट  खेळली जाते. प्रत्येक खेडाळू महिला या सामन्यासाठी उत्सुक असते. पण या महिला खेळाडूंच्या वेदना प्रत्येकजण समजू शकत नाही. टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी कोणाची पीरिएड्स सायकल संपलेली असते तर कोणाला पांढऱ्या कपड्यांवर रक्ताचे डाग लागण्याचं टेंशन असतं. कारण जर चारचौघात कपड्यांना असे डाग दिसले तर खूप विचित्र अनुभव येतो. महिला खेळाडू या स्थितीचा सामना कसा करतात याबाबत इंग्लँडची महिला क्रिकेटर टॅमी ब्यूमोंट हिनं खुलासा केला आहे. 

वास्तविक, टॅमी ब्यूमोंट  उन्हाळी हंगामात भारताविरुद्ध कसोटी सामन्यात उतरली. तोच दिवस तिच्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता. यामुळे ती घाबरली, कारण तिने पारंपारिक पांढरा ड्रेस परिधान केला होता, जो कसोटी क्रिकेटमध्ये घातला जातो. टॅमीला काळजी वाटत होती की जर तिच्या कपड्यांवर मासिक पाळीचे डाग लागले तर ती टॉयलेट ब्रेक कसा घेऊ शकेल. टेलिव्हिजनवर लाइव्ह जाताना जर असं काही झालं तर? टॅमी ब्यूमोंटला सात वर्षांत पहिल्यात कसोटी पूर्वी इतकी चिंता वाटत होती.

टॅमी ब्यूमोंटने द स्टफला सांगितले, "मी सलामीवीर होते, म्हणून मी पंचांना विचारले, 'ड्रिंक्स ब्रेकचे नियम काय आहेत? ती महिला पंच होती, म्हणून मी म्हणाले की,' इट्स  डे वन '.'  त्यावर ती म्हणाली मी  समजू शकते. आम्ही त्यास सामोरे जातो.''  दुसऱ्या दिवशी एका भारतीय फलंदाजाला त्याच कारणास्तव मैदानाबाहेर जावे लागले. मला वाटते की येत्या आठवड्यात प्रत्येकजण विचार करत होता की ते (पीरियड्स) कधी येणार आहेत. कसोटीसाठी पांढरे कपडे परिधान करणं हे अनेकांसाठी गैरसोयीचं आहे. अशावेळी चहूबाजूंनी खूप चिंता असते.

त्या पाच दिवसांच्या कसोटीदरम्यान इंग्लंडचा जवळजवळ अर्धा संघ त्यांच्या पिरिएड्समध्ये होता. पुढे तीनं सांगितले की, '''नेट स्कीवर्सची पाळी चौथ्या दिवशी आली. इंग्लंडच्या अष्टपैलूजवळ पूर्वीचा अनुभवही होता. तिने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात रक्तस्त्रावाचा सामना केला होता. अंडरशॉर्ट्स आता स्किवर्सला आवश्यक वाटतात. परंतु या प्रसंगी अतिरिक्त संरक्षणाचा विचार होता. स्कीव्हर म्हणाली डॉक्टरांनी आम्हाला रक्त प्रवाह कमी करण्यासाठी काही औषधे दिली."

पीरियड्सबद्दल बोलणे अजूनही खेळात बऱ्याचदा निषिद्ध मानले जाते, परंतु इंग्लंडमधील महिला क्रिकेटपटू खेळात महिलांच्या आरोग्य सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या ध्येयावर आहेत. तिनं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत महिला आरोग्य गट स्थापन करण्यासाठी काम केले आहे.  खेळाडूंच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की मासिक पाळी आणि कामगिरी, हाडांचे आरोग्य, स्तनांची काळजी, गर्भनिरोधक, गर्भधारणा आणि प्रजननक्षमता हे मुख्य मुद्दे आहेत ज्याबद्दल खेळाडूंना अधिक जाणून घ्यायचे होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्समहिलाआरोग्य