Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळी सुुरु असताना योगा किंवा व्यायाम करावा का? शरीराला काय हवं असतं आराम की..

मासिक पाळी सुुरु असताना योगा किंवा व्यायाम करावा का? शरीराला काय हवं असतं आराम की..

Exercises During Periods : हा बऱ्याच वर्षांपासून चालत आलेला मोठा गैरसमज आहे की, मासिक पाळीत योगा किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करू नये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:54 IST2026-03-04T09:35:30+5:302026-03-04T13:54:24+5:30

Exercises During Periods : हा बऱ्याच वर्षांपासून चालत आलेला मोठा गैरसमज आहे की, मासिक पाळीत योगा किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करू नये.

Is it ok to do exercise or yoga during my period? Know what expert says | मासिक पाळी सुुरु असताना योगा किंवा व्यायाम करावा का? शरीराला काय हवं असतं आराम की..

मासिक पाळी सुुरु असताना योगा किंवा व्यायाम करावा का? शरीराला काय हवं असतं आराम की..

Exercises During Periods : मासिक पाळीचा महिलांना दर महिन्यात सामना करावा लागतो. या दिवसांमध्ये महिलांना रक्तस्त्राव होत असल्याने वेदना, चिडचिड, थकवा, कमजोरी, मूड स्विंग अशा कितीतरी गोष्टींचा अनुभव येतो. बऱ्याच महिलांना यासंबंधी एक प्रश्न पडतो की, मासिक पाळीदरम्यान व्यायाम किंवा योगा करावा की नाही? बऱ्याच महिलांचा असा समज असतो की, या दिवसांमध्ये व्यायाम किंवा योगा केल्यास शरीराचं नुकसान होतं. पण नॅशनल हेल्थ मिशननुसार, असं अजिबात नाहीये. अशात जाणून घेऊया की, या दिवसांमध्ये हलका व्यायाम किंवा योगा केल्याने काय फायदे मिळतात.

मासिक पाळीत योगा किंवा व्यायाम करावा की नाही?

हा बऱ्याच वर्षांपासून चालत आलेला मोठा गैरसमज आहे की, मासिक पाळीत योगा किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करू नये. पण योगाचे काही सोपे आसन शरीराला आराम देतात आणि पाळीदरम्यानच्या समस्या कमी करतात. इतकंच नाही तर महिलांना शारीरिक आणि मानसिक रूपाने मजबूत बनवतात. एक्सपर्ट मासिक पाळीच्या दिवसांमध्ये बालासन, सुप्त बद्ध कोणासन, विपरीत करणी, मार्जरिआसन आणि शवासन सारखी सोपी आसने करावीत. ही आसनं हळूहळू आणि क्षमतेनुसार करावी. जर फार जास्त वेदना किंवा जास्त ब्लीडिंग होत असेल तर डॉक्टर किंवा योगा एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.

मासिक पाळीत योगा केल्याने काय होतं? 

मुळात मासिक पाळीत योगा केल्याने नुकसान नाही तर अनेक फायदे मिळतात. आखडलेपणा आणि पोटदुखीत आराम मिळतो. योगाने पोट आणि पाठीचे स्नायू रिलॅक्स होतात, ज्यामुळे क्रॅम्प्स आणि वेदना कमी होतात. शरीराला आराम मिळतो, हलकी स्ट्रेचिंग आणि श्वसनाच्या व्यायामाने तणाव कमी होतो आणि थकवा दूर होतो. त्यासोबतच चिडचिडही कमी होते. या दिवसात हार्मोनमध्ये बदल होत असल्याने मूड स्विंग्स आणि राग येणं सामान्य आहे. योगाने मन शांत राहतं आणि चिडचिड कमी होते.

पाठ आणि कंबरदुखीचा त्रासही कमी होतो. जास्तीत जास्त महिलांना मासिक पाळीत पाठदुखीचा जास्त त्रास होतो. योगाचे काही हलकी आसने करून बराच आराम मिळू शकतो. तसेच योगा आणि व्यायामाने एकंदर आरोग्यही चांगलं राहतं. ब्लड सर्कुलेशन सुधारतं, पचन सुधारतं आणि शरीराला एनर्जीही मिळते.

Web Title : मासिक धर्म में योग और व्यायाम: फायदे और नुकसान जानें

Web Summary : हल्का योग मासिक धर्म की परेशानी को कम करता है, जैसे ऐंठन, पीठ दर्द और मूड स्विंग। बालासन और शवासन जैसे आसान आसन राहत देते हैं। गंभीर दर्द के लिए विशेषज्ञों से सलाह लें।

Web Title : Yoga and Exercise During Periods: Benefits vs. Risks Explained

Web Summary : Light yoga eases period discomfort, reducing cramps, back pain, and mood swings. Simple poses like Balasana and Shavasana offer relief. Consult experts for severe pain.