Join us

मुलींना कमी वयातच पाळी येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? मुलींचं बालपण जपण्यासाठी ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2025 13:45 IST

How to Prevent Early Periods in Your Daughter: कमी वयात आपली लेक मोठी होऊन तिला लवकर पाळी येऊ नये म्हणून पालकांनी काय काळजी घ्यायला हवी?

ठळक मुद्दे मुलींना हंगामी फळं, सुकामेवा, तूप, नाचणी असे पदार्थ भरपूर प्रमाणात खायला द्या. यामुळे त्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते. 

हल्ली मुलींना कमी वयातच पाळी येण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. अगदी ९- १० वर्षांच्या मुलींनाही पाळी येत आहे. चौथीमध्ये असतानाच मुलींची पाळी सुरू होणाऱ्या कित्येक मुली डॉक्टरांकडे नेहमीच येत असतात. पुर्वी मुलगी साधारण १४- १५ वर्षांची झाली की तिला पाळी यायची. पण आता मात्र पाळी येण्याचं वय खूपच अलिकडे आलं आहे. असं होऊन कमी वयातच आपली लेक मोठी होऊ नये म्हणून पालकांनी मुलींच्या बाबतीत काही गोष्टी कटाक्षाने सांभाळणं गरजेचं आहे. (how to prevent early periods in your daughter?) त्यासाठी नेमकं काय करावं आणि काय टाळावं ते पाहूया..(how to take care of your daughter in her growing age?)

 

मुलींना लवकर पाळी येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी nehasahaya या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

१. यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलींना खूप दूध पिऊ देऊ नका. कारण हल्ली दुधामध्येही काही हार्मोन्स मिसळले जातात ज्यामुळे पाळी लवकर येऊ शकते.

'या' पद्धतीने अश्वगंधा घ्या! मिळतील ५ जबरदस्त फायदे- बीपी, शुगर नेहमीच राहील कंट्रोलमध्ये..

२. प्रोसेस्ड केलेले सोया प्रोडक्ट्स मुलींना देणं टाळा. याच्या अतिरेकामुळे शरीरातील इस्ट्रोजीन हार्मोन्सवर परिणाम होतो.

३. लहान मुलींना मेकअप करणं किंवा लिपस्टिक लावणं टाळावं. कारण त्यात असणारे काही केमिकल्स शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात.

 

४. प्लास्टिकच्या डब्यात पॅक केलेले गरम अन्नपदार्थ खाऊ नका. कारण त्यामुळे प्लास्टिकमधले BPA सारखे घातक केमिकल्स अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात जाऊ शकतात.

National Nutrition Week 2025 special: डाळी खाण्याचे वेगवेगळे फायदे- पाहा कोणती डाळ कोणासाठी चांगली 

५. मुलींना सुर्यप्रकाशात जास्तीतजास्त वेळ खेळायला लावा. कारण व्हिटॅमिन डी शरीरात पुरेशा प्रमाणात असेल तर हार्मोन्सचे संतुलन टिकून राहण्यास मदत होते.

६. मुलींना हंगामी फळं, सुकामेवा, तूप, नाचणी असे पदार्थ भरपूर प्रमाणात खायला द्या. यामुळे त्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य