Join us   

PCOD मुळे केस गळणं- चेहऱ्यावर पिंपल्स, वांग? आहारतज्ज्ञ सांगतात २ उपाय करा, तातडीने थांबवा वरवरचे प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 9:11 AM

Beauty Tips For PCOD and PCOS: PCOD किंवा PCOS या कारणांमुळे केस गळत असतील, चेहऱ्यावर वांग असतील तर वरवरचे कॉस्मेटिक्स लावून काहीच फायदा होणार नाही असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत....

ठळक मुद्दे त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही विशेष माहिती.

केस गळणं, केसांमध्ये कोंडा होणं, चेहऱ्यावर पिंपल्स असणं, वांगाचे डाग असणं हे त्रास सध्या खूप जास्त वाढले आहेत. त्यासाठी प्रदुषण, आहारात पोषणमुल्यांची कमतरता, चुकीची जीवनशैली ही कारणे जशी आहेत, तसंच एक महत्त्वाचं कारण म्हणजे PCOD किंवा PCOS त्रास असणं. हा त्रास असेल तर केस गळणं थांबविण्यासाठी किंवा चेहऱ्यावरचे वांगाचे डाग कमी करण्यासाठी तुम्ही कितीही उपाय (home remedies) केले तरी त्याचा फायदा होणार नाही. त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही विशेष माहिती. (How to get rid of hair fall and pimples, acne due to PCOD and PCOS?)

 

PCOD मुळे केस गळणं- चेहऱ्यावर वांग असतील तर उपाय पीसीओडी किंवा पीसीओएस चा त्रास असेल तर वरवरचे उपाय करून कधीच फायदा होणार नाही.

झाडाफुलांनी छोटीशी बाल्कनी सजविण्याच्या ३ खास टिप्स, बदलून टाका बाल्कनीचं रूप चटकन- ते ही कमी पैशांत

कारण जोपर्यंत तुमचा पीसीओडी किंवा पीसीओएसचा त्रास नियंत्रणात येणार नाही, तोवर केस गळणं आणि चेहऱ्यावर पिंपल्स, वांग येणं थांबणार नाही. म्हणून यावरचा सगळ्यात मुख्य उपाय म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करणं. आणि हे फक्त २ गोष्टींमुळेच शक्य आहे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आहार आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम.

 

१. आहार

PCOD किंवा PCOS चा त्रास असणाऱ्या मैत्रिणींनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच साखर आणि साखर घालून तयार केलेले गोड पदार्थ खाणं पुर्णपणे बंद करावं.

रणबीरच्या वाढदिवसासाठी आणलेल्या स्पेशल केकवर आई नितू कपूरने लिहिले, राहाज् पापा....

फ्रुक्टोज जास्त असणारी फळं खाणंही बंद करावं. आंबा, चिकू, केळी या फळांमध्ये फ्रुक्टोज भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अशी फळं खाणं टाळावं. आहारातलं प्रोटीन्सचं प्रमाण वाढवावं.

 

२. व्यायाम PCOD किंवा PCOS चा त्रास असणाऱ्या मैत्रिणींनी भरपूर शारिरीक हालचाल होईल असे रनिंग, सायकलिंग, जाॅगिंग असे व्यायाम रोज करायला हवेत.  

टॅग्स : आरोग्यमासिक पाळी आणि आरोग्यपीसीओडीपीसीओएसआहार योजनाव्यायाम