Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीत पोट दुखत असताना डाव्या कुशीवर झोपावे की उजवा, तज्ज्ञ सांगतात ‘ही’ पोझिशन उत्तम-लागेल शांत झोप...

मासिक पाळीत पोट दुखत असताना डाव्या कुशीवर झोपावे की उजवा, तज्ज्ञ सांगतात ‘ही’ पोझिशन उत्तम-लागेल शांत झोप...

how should we sleep during period : best sleeping position during periods : how to sleep during periods pain : doctor tips for sleeping during periods : पोटातील कळ थांबवण्यासाठी आणि मासिक पाळीच्या दिवसांत पूर्ण विश्रांती मिळण्यासाठी कोणती स्लिपिंग पोझिशन आहे बेस्ट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2026 15:31 IST2026-01-23T15:18:51+5:302026-01-23T15:31:38+5:30

how should we sleep during period : best sleeping position during periods : how to sleep during periods pain : doctor tips for sleeping during periods : पोटातील कळ थांबवण्यासाठी आणि मासिक पाळीच्या दिवसांत पूर्ण विश्रांती मिळण्यासाठी कोणती स्लिपिंग पोझिशन आहे बेस्ट ?

how should we sleep during period best sleeping position during periods how to sleep during periods pain doctor tips for sleeping during periods | मासिक पाळीत पोट दुखत असताना डाव्या कुशीवर झोपावे की उजवा, तज्ज्ञ सांगतात ‘ही’ पोझिशन उत्तम-लागेल शांत झोप...

मासिक पाळीत पोट दुखत असताना डाव्या कुशीवर झोपावे की उजवा, तज्ज्ञ सांगतात ‘ही’ पोझिशन उत्तम-लागेल शांत झोप...

मासिक पाळीचे ते ५ दिवस प्रत्येक महिलेसाठी शारीरिक आणि मानसिकरीत्या आव्हानात्मक असतात. मासिक पाळीच्या काळात महिलांना पोट, कंबरदुखी, पोटात जडपणा, अस्वस्थता आणि झोप न लागणे अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. अशावेळी विशेष करून त्या दिवसांत अनेकींचा स्वभाव चिडचिडा होतो आणि रोजची कामे नीट करता येत नाहीत. प्रचंड थकवा यामुळे रात्रीची झोप पूर्ण होणे कठीण होते, अनेकदा तासंतास कूस बदलूनही शांत झोप लागत नाही. इतकंच नाही तर मासिक पाळी सुरु असताना नेमकं कोणत्या स्लिपिंग पोझिशनमध्ये झोपावं असा मोठा प्रश्नच पडतो. काहीवेळा झोपेत असताना हेव्ही फ्लो मुळे ब्लड लीकेजसारख्या समस्या त्रास देतात. सोबतच, पोटदुखी, कंबरदुखी यामुळे वारंवार कूस बदलतो, वेदना आणि दुखण्याने हा त्रास सहन करावा लागतो. मासिक पाळीतील कंबरदुखी आणि क्रॅम्प्समुळे अनेकांची रात्रीची झोप उडते. औषधोपचारांसोबतच फक्त झोपण्याच्या पोझिशनमध्ये बदल करून आपण हा त्रास कमी करू शकता. पोटातील कळ थांबवण्यासाठी आणि मासिक पाळीच्या दिवसांत शरीराला पूर्ण विश्रांती मिळवून देण्यासाठी कोणती स्लिपिंग   पोझिशन सर्वोत्तम ठरते ते पाहूयात(how should we sleep during period).

दिल्लीतील आशा सेंटरच्या डायरेक्टर आणि प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट डॉ. चंचल शर्मा यांच्या मते, मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये  झोपता, याचा तुमचे आरोग्य आणि वेदनांवर मोठा परिणाम होतो. डॉ. शर्मा सांगतात की, "पीरियड्स दरम्यान झोपण्याची योग्य पद्धत जाणून घेणे (how to sleep during periods pain) अत्यंत गरजेचे  आहे. जर तुम्ही योग्य पोझिशनमध्ये झोपलात, तर शरीरातील (best sleeping position during periods) स्नायूंना आराम मिळतो आणि मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासून मोठी सुटका मिळू शकते." 

मासिक पाळीत झोपण्याची योग्य पद्धत कोणती?

तसे पाहायला गेले तर, तुम्हाला ज्या स्थितीत आरामदायी वाटत असेल तसे तुम्ही झोपू शकता. परंतु, तज्ज्ञांच्या मते मासिक पाळी दरम्यान झोपण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे 'डाव्या कुशीवर' (Left Side) वळून झोपणे. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे कंबर आणि पोटावर कमीत कमी दाब पडतो. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि मासिक पाळीत येणारे क्रॅम्प्स तसेच वेदना कमी होण्यास मदत होते.

लग्नानंतर वर्षभरात नवराबायको जाडजूड का होतात? सुखी संसाराचे 'साईड इफेक्ट', ‘या’ कारणांमुळे बदलतो शरीराचा घेर...

पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी मासिक पाळीत कसे झोपावे?

जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान तुमच्या पाठीच्या कण्याला आणि हाडांना आराम द्यायचा असेल, तर तुम्ही गुडघ्यांच्या खाली उशी ठेवून झोपू शकता. यामुळे पाठीचा ताण कमी होण्यास मदत होते. काही महिलांना मासिक पाळीत पाठीवर सरळ झोपणे जास्त आवडते, परंतु जर तुम्हाला 'ब्लोटिंग' किंवा जास्त वेदना होत असतील, तर पाठीवर झोपल्याने अस्वस्थता वाढू शकते. अशावेळी शरीर पूर्णपणे रिलॅक्स ठेवण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी 'डाव्या कुशीवर' झोपणे हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो.

सकाळी चेहरा धुण्यासाठी करा ३० सेकंदांचा उपाय! फेसवॉश - साबण नाही तर चमचाभर पीठानेही येईल सेलिब्रिटींसारखा ग्लो... 

अति रक्तस्त्राव (Heavy Bleeding) होत असताना कसे झोपावे?

जर तुम्हाला मासिक पाळीत खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल किंवा पोटातील वेदना टाळायच्या असतील, तर पोटावर पालथे झोपणे (Sleeping on Stomach) टाळावे. पोटावर दाब पडल्यामुळे गर्भाशयावर ताण येतो, ज्यामुळे तुमची झोप वारंवार मोडू शकते आणि मासिक पाळीतील क्रॅम्प्सचा त्रास वाढू शकतो. उत्तम झोपेसाठी केवळ पोझिशनच नाही, तर योग्य अंथरुण आणि कपड्यांची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. डॉ. चंचल शर्मा सांगतात की, "मासिक पाळीच्या दरम्यान सुती आणि सैलसर कपडे घालणे सर्वात आरामदायक ठरते. यामुळे तुमच्या त्वचेला मोकळी हवा मिळते (Breathable fabric) आणि घाम किंवा रॅशेसमुळे होणारी जळजळ टाळता येते."

मासिक पाळीच्या काळात शारीरिक आरामासोबतच मानसिक शांतताही तितकीच महत्त्वाची असते. यासाठी नेहमी आरामदायक गादी किंवा बिछान्याचा वापर करावा. तसेच, मासिक पाळीत डाग पडण्याची भीती मनात राहिल्याने मानसिक तणाव वाढू शकतो, हा तणाव कमी करण्यासाठी तुम्ही गडद रंगाच्या चादरीचा वापर करू शकता, ज्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे झोपू शकाल. जर तुम्हाला मासिक पाळीतील वेदनांमुळे रात्री झोप येत नसेल, तर 'उबदारपणा' तुम्हाला मदत करू शकतो. यासाठी झोपण्यापूर्वी गरम पाण्याच्या पिशवीने पोट आणि कंबर शेकावी. असे केल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो, रक्ताभिसरण सुधारते आणि तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते.

झोपण्यापूर्वी चहा, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स यांसारखे कॅफिनयुक्त ड्रिंक्स पिणे टाळा, यामुळे झोप मोड होऊ शकते. जेवण नेहमी ताजे आणि गरम करूनच खावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटात गॅस किंवा जडपणा जाणवत नाही. जर तुम्हाला जास्त मानसिक ताण किंवा 'मूड स्विंग्स' (स्वभावात चिडचिड) होत असतील, तर झोपण्यापूर्वी थोडा वेळ दीर्घ श्वासोच्छवास किंवा हलके योगासन करा. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला सुखाची झोप लागेल.

मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीराला नेहमीपेक्षा जास्त विश्रांतीची आणि आरामाची गरज असते. या दिवसांत शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असल्याने थकवा जाणवणे अत्यंत नैसर्गिक आहे. त्यामुळे, जर तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तर पुरेशी आणि चांगली झोप घ्या. जेव्हा तुमचे मन आणि शरीर शांत असते, तेव्हा मासिक पाळीचा त्रास सहन करणे सोपे जाते.

Web Title : मासिक धर्म में बाईं ओर सोना दर्द कम करता है, विशेषज्ञ ने आरामदायक स्थिति बताई।

Web Summary : मासिक धर्म के दौरान बाईं ओर सोने से पेट पर दबाव कम होता है जिससे ऐंठन कम होती है। घुटनों के नीचे तकिया रखने से पीठ दर्द में मदद मिलती है। पेट के बल सोने से बचें। बेहतर नींद के लिए ढीले कपड़े पहनें, हाइड्रेटेड रहें और कैफीन से बचें।

Web Title : Left side sleeping eases period pain, expert suggests restful position.

Web Summary : Left-side sleeping during periods eases cramps by reducing pressure on abdomen. Using a pillow under knees helps back pain. Avoid sleeping on stomach. Wear loose clothes, stay hydrated, and avoid caffeine for better sleep.