lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीच्या चार दिवसात अपचनाचा त्रास होतो, पोट बिघडते? डॉक्टर सांगतात कारणं आणि उपाय..

मासिक पाळीच्या चार दिवसात अपचनाचा त्रास होतो, पोट बिघडते? डॉक्टर सांगतात कारणं आणि उपाय..

How do you deal with indigestion during your period? मासिक पाळीत पोट दुखण्याचा त्रास अनेकींना होतो, पण अपचनही होत असेल तर काळजी घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 05:37 PM2023-09-12T17:37:25+5:302023-09-12T17:38:25+5:30

How do you deal with indigestion during your period? मासिक पाळीत पोट दुखण्याचा त्रास अनेकींना होतो, पण अपचनही होत असेल तर काळजी घ्या..

How do you deal with indigestion during your period? | मासिक पाळीच्या चार दिवसात अपचनाचा त्रास होतो, पोट बिघडते? डॉक्टर सांगतात कारणं आणि उपाय..

मासिक पाळीच्या चार दिवसात अपचनाचा त्रास होतो, पोट बिघडते? डॉक्टर सांगतात कारणं आणि उपाय..

मासिक पाळीच्या संबंधीत समस्येपासून प्रत्येक स्त्री त्रस्त आहे. प्रत्येक स्त्रीला या दिवसात विविध समस्या छळतात. या ४ दिवसात काहींचे मूड स्विंग्स होतात. तर काहींना थकवा, अशक्तपणा, पोटदुखी, कंबरदुखी यांसारख्या समस्यांचा त्रास होतो. मात्र, काही महिलांना पचनाच्या निगडीतही त्रास होतो.

बहुतांश वेळी ही समस्या खराब खाण्याच्या सवयी आणि हार्मोन्समधील बदलांमुळे उद्भवू शकते. अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन, आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. या दिवसात महिलांनीआरोग्याची कशी काळजी घ्याला हवी, याची माहिती बिजनौरचे प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरज शर्मा यांनी दिली आहे(How do you deal with indigestion during your period?).

मासिक पाळीदरम्यान पचनाच्या संबंधित त्रास का होतो?

पीरियड्समध्ये पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवणे खूप सामान्य आहे. अशा स्थितीत पोटदुखी, पोट फुगणे, पोटाच्या संबंधित समस्या उद्भवतात. याचे मुख्य कारण हार्मोन्समधील बदल मानले जाते. त्यामुळे महिलांना पोटाच्या संबंधित समस्या सुरू होतात.

दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर

ब्लोटिंग

पीरियड्स दरम्यान अॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या उद्भवणे सामान्य आहे. मासिक पाळी येण्यापूर्वी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्समध्ये बदल होतो. अशा स्थितीत मासिक पाळी सुरू होण्याच्या काही दिवस आधी पोटदुखी, पोट फुगणे सुरु होते.

पोटदुखी

मासिक पाळी दरम्यान पोटदुखी होणे सामान्य आहे. परंतु, अनेकदा ओटीपोटात जास्त दुखते. या काळात गर्भाशयात सोडले जाणारे हार्मोन्स हे यामागचे प्रमुख कारण आहे.

बद्धकोष्ठता

पिरियड्स दरम्यान ब्लोटिंगची समस्या होते. यासह बद्धकोष्ठतेचा त्रासही होतो. अशा स्थितीत अन्न पचायला वेळ लागते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

‘जवान’फेम अभिनेत्री नयनताराचे ६ फिटनेस रुल्स, तिशीनंतरही दिसते कमाल सुंदर

मासिक पाळी दरम्यान पचनाच्या संबंधित त्रास झाल्यास काय करावे?

- मासिक पाळीदरम्यान, आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. या दिवसात तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा. कारण यामुळे पचनाच्या संबंधित त्रास होऊ शकतो.

- मासिक पाळीदरम्यान, पाणी पीत राहा. शरीर हायड्रेट ठेवा. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.

- या काळात थोडा हलका व्यायाम आणि योगासना करा. यामुळे पचनक्रिया सुधारेल.

Web Title: How do you deal with indigestion during your period?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.