दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच अनेकींना टेंन्शन येत, तसेच भीती देखील वाटते. काहीजणींना मासिक पाळीचे ते ५ दिवस खूपच त्रासदायक वाटतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीच्या काळात (How Chalki Chalansana Is Beneficial In Reducing Period Pain) पोटदुखी, तीव्र वेदना, पेटके येणे आणि संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, या समस्यांपासून सुटका मिळावी यासाठी अनेकजणी काही वेगवेगळ्या प्रकारची औषध - गोळ्या घेतात. परंतु प्रत्येकवेळी या लहान - मोठ्या समस्यांसाठी औषध - गोळ्या खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक (Benefits of Chakki Chalanasana and how to do it) ठरु शकते. अशावेळी, मासिक पाळीच्या त्या दिवसांतील पोटदुखी, तीव्र वेदना, पेटके येणे यासारख्या अनेक समस्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी योगा आसन करणे फायदेशीर ठरु शकते(How is Chakki Chalanasana beneficial for the Body).
योगा केल्याने महिलांना मासिक पाळीसोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. अशा परिस्थितीत, दिल्लीच्या वेदांत योग फाउंडेशनचे संस्थापक योगगुरू ओम प्रकाश यांनी onlymyhealth.com दिलेल्या मुलाखतीनुसार, मासिक पाळीच्या त्या त्रासदायक दिवसांमध्ये, कोणते आसन करणे फायदेशीर राहील याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
मासिक पाळीच्या त्या वेदनादायी दिवसांत कोणते योगासन करावे?
योगगुरू ओम प्रकाश यांच्या मते, मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी योगा करणे फायदेशीर आहे. यासाठी, चक्की चालनासन सारखी साधी योगासन करणे फायदेशीर आहे, ज्यामुळे मांड्या आणि खालच्या ओटीपोटात रक्त प्रवाह सुरळीतपणे होण्यास मदत होते आणि कोणत्याही प्रकारच्या समस्या कमी कमी करण्यास फायदेशीर ठरते.
सकाळी पोट साफ होत नाही? रोज रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर दह्यात कालवून ‘हा’ पदार्थ खा, त्रास कमी...
चक्की चालनासन (The Churning Mill Pose) कसे करावे ?
'चक्की चालनासन' हे एक योगासन आहे जे विशेषतः पोट, कंबर आणि पाठीसाठी फायदेशीर असते. यामध्ये चक्की (गहू दळणारी गिरणी) चालवण्याच्या हालचाली केल्या जातात, म्हणूनच याला 'चक्की चालनासन' म्हणतात. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम, योगामॅटवर बसा, त्यानंतर दोन्ही पाय पुढे करून एकमेकांपासून लांब पसरवा. दोन्ही हातांची बोटेएकमेकांत गुंफून हात जोडावेत. त्यानंतर श्वास घ्या, व शरीराचा वरचा भाग पुढे आणा आणि हात पुढे नेत गोल फिरवा, म्हणजे जणू तुम्ही एका मोठ्या चाकाला फिरवत आहात. पूर्ण शरीराचा वापर करून मोठ्या वर्तुळात गोल हालचाली करा, एकदा डावीकडून उजवीकडे, नंतर उलट दिशेने (उजवीकडून डावीकडे). हालचाली करताना श्वास सहज ठेवावा – पुढे झुकताना श्वास बाहेर टाका आणि मागे जाताना श्वास घ्या.
कोमट पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे फक्त २ थेंब, बेली फॅट होईल कमी, डॉक्टर सांगतात...
मासिक पाळीत 'चक्की चालनासन' करण्याचे फायदे...
१. मासिक पाळीच्या वेदना कमी होतात :- मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळविण्यासाठी चक्की चालनासन करणे फायदेशीर आहे. हे नियमितपणे केल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो, ज्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. तसेच, मासिक पाळी दरम्यान पोटफुगी, गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या पचन समस्यांना तोंड देण्यास ते मदत करू शकते.
२. स्नायूंचा त्रास कमी करते :- चक्की चालनासनाचा नियमित सराव केल्याने ओटी पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते, मासिक पाळीच्या वेदना कमी होतात तसेच मासिक पाळीच्या वेदना आणि पेटके कमी करण्यास मदत होते.
३. रक्ताभिसरण सुधारते :- हे योगासन मासिक पाळी दरम्यान मांड्या आणि खालच्या ओटीपोटातील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराचा खालचा भाग मजबूत होतो, स्नायूमधील पेटके, वेदना कमी होतात आणि मासिक पाळीशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
४. हार्मोन्स संतुलित करण्यासाठी :- शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे अनेकवेळा महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत, चक्की चालनासन सारखी योगासनं केल्याने हार्मोन्स संतुलित होण्यास आणि त्यांच्याशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.