Join us

मेन्स्ट्रुअल कप वापरला तर गर्भधारणेत अडथळे येतात? तज्ज्ञांचा योग्य सल्ला, मेन्स्ट्रुअल कप वापरताना काळजी घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 15:29 IST

Does Menstrual Cup Affect Fertility : Everything You Need To Know About Using Menstrual Cups : काहीजणींच्या मनात अजूनही मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरण्याबद्दल भीती आणि अनेक प्रश्न आहेत.

सध्या बदलत्या काळानुसार, मासिक पाळीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरले जाऊ लागले आहेत. पूर्वीच्या काळी मासिक पाळीतील रक्तस्त्राव शोषून घेण्यासाठी स्त्रिया सुती कापड वापरत असे, त्यानंतर पॅड्स वापरणे सुरु झाले. आजकाल स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी टॅम्पॉन्स आणि मेन्स्ट्रुअल कपसारख्या गोष्टींचा अगदी सर्रास वापर करतात. परंतु बदलत्या काळानुसार मासिक पाळीत अशा असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा वापर होऊ लागल्याने, त्या वस्तू मासिक पाळीत वापरणे योग्य की अयोग्य हा देखील प्रश्न पडतोच. खरंतर, मासिक पाळीतील रक्तस्त्राव शोषून घेण्यासाठी बऱ्याचजणींना मेन्स्ट्रुअल कप वापरणे सोयीचे वाटते. परंतु काहीजणींच्या मनात अजूनही मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरण्याबद्दल भीती आणि अनेक प्रश्न आहेत. मासिक पाळीच्या वेळी मेन्स्ट्रुअल कप थेट योनी मार्गातून आत घातला जातो. अशा परिस्थितीत, अनेकींच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की मेन्स्ट्रुअल कपचा प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो का ? मेन्स्ट्रुअल कप वापरताना अनेकींना हाच प्रश्न पडत असल्याने, नोएडातील मेट्रो हॉस्पिटलच्या प्रसूतीशास्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ आणि गायनी लॅपरोस्कोपिक सर्जन, डॉ. निक्की यादव यांनी ओन्ली माय हेल्थला दिलेल्या मुलाखतीत, याबद्दल अधिक माहिती दिली आहे(Does Menstrual Cup Affect Fertility).

डॉक्टर, निक्की यादव यांच्या मते, आजकालच्या स्त्रिया आता पारंपारिक सॅनिटरी नॅपकिन्स आणि टॅम्पॉन्सऐवजी मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कपची निवड करतात. हे मेन्स्ट्रुअल कप पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगला, दीर्घकाळ टिकणारा आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असा पर्याय आहे. असे असले तरीही  काही महिलांना मेन्स्ट्रुअल कपच्या वापरा बद्दल अनेक प्रश्न असतात, त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे या कपचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो का?

'मेन्स्ट्रुअल कप' हा एक लहान, लवचिक कप असतो जो मेडिकल-ग्रेड सिलिकॉन, रबर किंवा इलास्टोमरपासून बनलेला असतो. मासिक पाळीच्या वेळी हा कप  योनीमध्ये घातला जातो, जेणेकरून ते रक्त शोषण्याऐवजी ते कपमध्ये गोळा करू साचू शकेल. शक्यतो दिवसभरातून ८ ते १२ तास हा कप घालता येते.

खा चमचाभर 'ही' घरगुती आयुर्वेदिक पावडर ! पोटाची ढेरी - मांड्यांचा घेर होईल कमी - सोपा पण असरदार उपाय...

मेन्स्ट्रुअल कपचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का?

जर आपण वैद्यकीयदृष्ट्या पाहिले तर, मेन्स्ट्रुअल कपचा वापर स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करत नाही. हा कप फक्त योनीमध्येच राहतो आणि गर्भाशय किंवा अंडाशयासारख्या पुनरुत्पादक अवयवांपर्यंत पोहोचत नाही. मेन्स्ट्रुअल कप ओव्हुलेशनची क्रिया थांबवत नाही किंवा गर्भाशयात गर्भाच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आई होण्याचे ठरवले असेल तरी देखील महिलांसाठी मेन्स्ट्रुअल कप हा एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगल सांगते, 'प्रेग्नंन्सीत खाल्लं विचित्र चवीचं तूप'...तुपाचा 'हा' प्रकार कोणता?

मेन्स्ट्रुअल कप बाबतीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ? 

जरी कप वापरण्यास सुरक्षित असला तरी, योग्यरित्या न वापरल्यास काही समस्या निर्माण होऊ शकतात. हे परिणाम थेट नसले तरी अप्रत्यक्षपणे प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात, यासाठीच मेन्स्ट्रुअल कप वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. 

१. संसर्गाचा धोका :- जर मेन्स्ट्रुअल कप कप व्यवस्थित स्वच्छ केला नाही किंवा स्वच्छ न केलेला कप तसाच वापरला तर योनीमार्गात संसर्ग होऊ शकतो. जर हे संक्रमण गर्भाशयात किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये पसरले तर पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (PID) सारख्या परिस्थिती उद्भवू शकते, ज्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते.

२. कप घालताना किंवा काढताना झालेली दुखापत :- जर कप चुकीच्या पद्धतीने घातला किंवा काढला गेला तर योनी किंवा गर्भाशय ग्रीवाला किरकोळ दुखापत होऊ शकते. या समस्या बहुतेक किरकोळ असतात आणि त्यांचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही, परंतु त्याकडे जास्त काळ दुर्लक्ष करणे योग्य नाही.

३. आययूडी (IUD) वापरणाऱ्यांनी घ्यावी खबरदारी :- ज्या महिलांनी गर्भनिरोधकासाठी आययूडी (इंट्रायूटरिन डिव्हाइस) घातले आहे त्यांनी मासिक पाळीचा कप काढताना काळजी घ्यावी, कारण खूप जास्त जोरात ओढल्याने आययूडी निघू शकतो. यामुळे महिलांना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

मासिक पाळीसाठी मेन्स्ट्रुअल कपचा वापर करणे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याचा प्रजनन क्षमतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. फक्त त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. तुम्ही मेन्स्ट्रुअल कप पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर तो व्यवस्थित आत घालावा आणि काढावा. त्याचवेळी, जर या काळात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही आई होऊ इच्छित असाल किंवा आधीच आई असाल  तर काळजी न करता तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरू शकता.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यप्रेग्नंसी