Join us
Daily Top 2 Weekly Top 5

World AIDS Day 2025: मासिक पाळी आणि HIV संसर्ग याविषयीचे ४ गैरसमज, घाबरु नका-काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2025 17:48 IST

World AIDS Day 2025: HIV myths: Menstruation and HIV: मासिक पाळीचा त्रास, संसर्ग आणि एचआयव्ही इन्फेक्शन यांचा काही संबंध असतो का?

वय वाढू लागले की महिलांना त्यांच्या शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. यामध्ये अनियमित मासिक पाळी, त्यातील बदल किंवा पाळीपूर्वीची लक्षणे वाढणे यांचा समावेश असू शकतो.(HIV myths) एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांमध्येही असे काही बदल दिसतात.( Menstruation and HIV) त्यामुळे अनेकदा असा प्रश्न पडतो की मासिक पाळीचा त्रास, संसर्ग आणि एचआयव्ही इन्फेक्शन यांचा काही संबंध असतो का? (World AIDS Day)

लग्नसमारंभात करा रेखा स्टाईल एंट्री! ५ रॉयल साड्या, कायम दिसाल तरुण सुंदर आणि क्लासी

काही समज गैरसमज (HIV Myths)

१/ एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांची मासिक पाळी वेळेवर न येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तसेच २४ टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ मासिक पाळी चुकण्याचा अनुभव आलेला असतो तर एचआयव्ही नसलेल्या १३.३% महिलांना हा अनुभव येतो. 

२. एचआयव्ही संक्रमित असणाऱ्या महिलांसाठी मासिक पाळी हा अतिसंवेदनशील विषय. कारण या काळात शरीरातील हार्मोन्स आणि प्रतिकारशक्तीमध्ये होणारे चढ-उतार त्यांच्या आरोग्यावर परिणाम करु शकतात. काही महिलांमध्ये पाळी अनियमित होणे, खूप वेदना होणे, जास्त रक्तस्त्राव होणे किंवा मासिक पाळी बंद होणे या समस्यांना सामोरे जावे लागते. हे बदल घाबरण्यासारखे नसले तरी त्यामागे शरीरातील रोगप्रतिकारक पेशींची स्थिती आणि एचआयव्हीचा प्रभावी घटक असू शकतात. म्हणूनच पाळीतील बदल ओळखणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 

३. मासिक पाळी न येणे हे एचआयव्हीचे लक्षण आहे का? तज्ज्ञ म्हणतात मासिक पाळी न येणे हे एचआयव्हीचे लक्षण नाही. ताप येणे, सुजलेल्या ग्रंथी, स्नायू दुखणे आणि थकवा येणे. गर्भधारणा, प्रवास, ताणतणाव, अचानक वजन वाढणे आणि भरपूर व्यायाम करणे यासारखी अनेक कारणे मासिक पाळी चुकवू शकतात. 

४. मासिक पाळीच्या वेळी महिलांना एचआयव्हीचा धोका जास्त असतो का? महिलांनी मासिक पाळी दरम्यान स्वच्छता, पोषण, पुरेशी झोप, ताण कमी घेणे आणि शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यायला हवे. तसेच मासिक पाळीसंबंधित तक्रारीसाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मासिक पाळीत स्वच्छता न राखल्यास लैंगिक आजारातून होणाऱ्या संसर्गाची शक्यता जास्त असते.

English
हिंदी सारांश
Web Title : World AIDS Day: Menstruation and HIV – 4 Myths and Facts

Web Summary : Menstrual changes in women with HIV can cause concern. Irregular periods aren't always HIV symptoms. Focus on hygiene and consult doctors for period issues. Understand the myths and facts to prioritize health.
टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यमहिलाआरोग्यलैंगिक आरोग्यहेल्थ टिप्स