Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीच्या दिवसात फक्त १ मिनिट करा ‘ही’ गोष्ट, स्तनांमधला जडपणा-दुखणं होईल कमी...

मासिक पाळीच्या दिवसात फक्त १ मिनिट करा ‘ही’ गोष्ट, स्तनांमधला जडपणा-दुखणं होईल कमी...

Benefits Of One Minute Underarms Tapping For Breast Health : underarm tapping for breast health : one minute underarm tapping benefits : breast care tapping technique : स्तनांचे आरोग्य सुधारण्यासाठी व मासिक पाळीत स्तनांचा जडपणा कमी करण्यासाठी 'अंडरआर्म टॅपिंग टेक्निक' अत्यंत फायदेशीर ठरते, कशी ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2025 16:05 IST2025-07-22T16:00:00+5:302025-07-22T16:05:01+5:30

Benefits Of One Minute Underarms Tapping For Breast Health : underarm tapping for breast health : one minute underarm tapping benefits : breast care tapping technique : स्तनांचे आरोग्य सुधारण्यासाठी व मासिक पाळीत स्तनांचा जडपणा कमी करण्यासाठी 'अंडरआर्म टॅपिंग टेक्निक' अत्यंत फायदेशीर ठरते, कशी ते पाहा...

Benefits Of One Minute Underarms Tapping For Breast Health underarm tapping for breast health one minute underarm tapping benefits breast care tapping technique | मासिक पाळीच्या दिवसात फक्त १ मिनिट करा ‘ही’ गोष्ट, स्तनांमधला जडपणा-दुखणं होईल कमी...

मासिक पाळीच्या दिवसात फक्त १ मिनिट करा ‘ही’ गोष्ट, स्तनांमधला जडपणा-दुखणं होईल कमी...

आपल्यापैकी अनेकजणींना पाळीच्या काळात वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा त्रास कमी - अधिक प्रमाणात सोसावा लागतोच. मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा मासिक पाळीच्या (breast care tapping technique) दरम्यान अनेकींना स्तन दुखणं, सुज येणं किंवा जडपणा वाटू लागतो. पाळीच्या काळात ही साधीसुधी वाटणारी लक्षणं अधिक तीव्र होतात, पण तरीही त्याकडे (Benefits Of One Minute Underarms Tapping For Breast Health) दुर्लक्ष केलं जातं. बहुतेकवेळा या लक्षणांकडे कानाडोळा (underarm tapping for breast health) करुन ही समस्या फार गंभीर नसल्याने लक्ष दिले जात नाही. दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या काळात स्तनांशी संबंधित अशा समस्या अनेकींना सतावतात. यावर साधासोपा सहज घरच्याघरीच करता येईल असा उपाय म्हणजे अंडरआर्म टॅपिंग टेक्निक(one minute underarm tapping benefits).

ही पद्धत महिलांच्या स्तनांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते, असं वीमेन हेल्थ, वेलनेस आणि वेटलॉस कोच रंजनाकुमारीन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे. मासिक पाळीच्या दिवसांत स्तनांशी संबंधित लहान - मोठ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी व एकूणच स्तनांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही 'अंडरआर्म टॅपिंग टेक्निक' अत्यंत फायदेशीर ठरते. 

महिलांसाठी अंडरआर्म टॅपिंग टेक्निक का आवश्यक आहे ?

आपल्या शरीरामध्ये एक यंत्रणा असते, जिला 'लिम्फॅटिक सिस्टीम' म्हणतात. या 'लिम्फॅटिक सिस्टीम' च्या मदतीने शरीरातून टॉक्सिन्स आणि अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्याचे मुख्य काम केले जाते. अंडरआर्मच्या खाली लिम्फ नोड्सचा एक महत्त्वाचा समूह असतो, जो स्तनांचा भाग आणि शरीराच्या वरच्या भागातून  येणाऱ्या लिम्फ लिक्विडला फिल्टर करून स्वच्छ करतो. हे लिम्फ नोड्स शरीरातील घाण काढून टाकणाऱ्या लहान फिल्टरसारखे काम करतात.

९ वर्षांनंतर उर्फी जावेदने काढले लिप फिलर्स आणि चेहरा सुजला भप्प, दिसतंय विचित्रच कारण...

जेव्हा आपण बराच वेळ बसून राहतो, खूप टाइट कपडे घालतो, काखेत घाम साचतो, तणावात राहतो किंवा हार्मोनल असंतुलनामुळे लिम्फॅटिक सिस्टीमवर परिणाम होतो. याचबरोबर, या सगळ्या कारणांमुळे लिम्फ नोड्स नीट कार्य करत नाहीत आणि लिम्फ फ्लो म्हणजेच द्रव प्रवाह मंदावतो. जेव्हा लिम्फ फ्लो मंदावतो, तेव्हा विषारी द्रव्यं आणि अतिरिक्त फॅट अंडरआर्म आणि ब्रेस्ट टिशूमध्ये साचू लागतात. यामुळे सूज, जडपणा किंवा छोट्या गाठी जाणवू शकतात. या गाठी अनेकदा 'लिम्फॅटिक स्टॅग्नेशन' म्हणजेच लिम्फ लिक्विड साचल्यामुळे होतात आणि त्या गंभीर नसतात. पण वेळेत काळजी घेतली नाही, तर हे साचलेलं लिम्फ ब्रेस्टच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतं आणि ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं कारण ठरू शकतं. त्यामुळे अंडरआर्म टॅपिंग हे लिम्फ फ्लो सुधारण्यासाठी आणि स्तनांचे आरोग्य टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

अंडरआर्म टॅपिंग टेक्निक कशी फायदेशीर ठरते ? 

टॅपिंगमुळे त्या भागामध्ये सौम्य व्हायब्रेशन तयार होतात, जे ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास मदत करते आणि थांबलेला लिम्फ फ्लो पुन्हा सक्रिय करण्यास मदत करते. हे व्हायब्रेशन लिम्फ लिक्विडला हलवण्याचे काम करते आणि ते लिम्फ नोड्समार्फत पुढे ढकलले जाते. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक सहजसोपी होते आणि स्तनांचे आरोग्य टिकवण्यास मदत होते.

गुडघेदुखीचा त्रास-सांध्यांतून कट-कट आवाज येतो? डॉक्टर सांगतात ५ उपाय - दुखणे होईल कमी...

अंडरआर्म टॅपिंग कसे करावे ? 

अंडरआर्म टॅपिंग ही एक सोपी पद्धत आहे की, प्रत्येक महिला आपल्या डेली रुटीनमध्ये अगदी सहजपणे समाविष्ट करू शकते. अंडरआर्म टॅपिंग दिवसातून फक्त १ ते २ वेळा फक्त मिनिटभर करायचं आहे. हात वर करून दुसऱ्या हाताने काखेच्या भागात हलकेच बोटांच्या मदतीने टॅपिंग करावे. फार जोरात किंवा खूप वेगाने टॅप करू नका. टॅपिंग करताना दीर्घ श्वासोच्छ्वास करत राहा.

Web Title: Benefits Of One Minute Underarms Tapping For Breast Health underarm tapping for breast health one minute underarm tapping benefits breast care tapping technique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.