Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मार्च महिन्यात खरंच पिरियड्स उशिरा येतात का? तुम्हाला आला अनुभव? वाचा यामागचं कारण 

मार्च महिन्यात खरंच पिरियड्स उशिरा येतात का? तुम्हाला आला अनुभव? वाचा यामागचं कारण 

Health Tips About Periods In Women: मार्च महिन्याचा आणि मासिक पाळी म्हणजेच पिरियड्स उशिरा येण्याचा नेमका काय संबंध असतो? सध्या सोशल मीडियावर याची का चर्चा आहे? (is it really true that periods get delayed in march?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2026 16:47 IST2026-04-04T16:46:21+5:302026-04-04T16:47:16+5:30

Health Tips About Periods In Women: मार्च महिन्याचा आणि मासिक पाळी म्हणजेच पिरियड्स उशिरा येण्याचा नेमका काय संबंध असतो? सध्या सोशल मीडियावर याची का चर्चा आहे? (is it really true that periods get delayed in march?)

are your periods delayed in march, is it really true that periods get delayed in march | मार्च महिन्यात खरंच पिरियड्स उशिरा येतात का? तुम्हाला आला अनुभव? वाचा यामागचं कारण 

मार्च महिन्यात खरंच पिरियड्स उशिरा येतात का? तुम्हाला आला अनुभव? वाचा यामागचं कारण 

Highlightsजर्नल ऑफ वुमेन्स हेल्थ आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या अभ्यासानुसार महिलांना जर पाळी उशिरा येत असेल तर त्यामागे एक कारण असंही असतं की त्या खूप तणावात आहेत.

महिलांना मासिक पाळी दर महिन्याला येतेच. आता ती किती दिवसांनी येते याचं प्रत्येकीचं गणित वेगवेगळं असतं. कोणाची पाळी अगदी वेळेत येते, तर कोणाची काही दिवस मागे- पुढे होत असते. प्रत्येकीच्या शरीर प्रकृतीनुसार त्यात भेद दिसून येतो. पण सध्या सोशल मीडियावर एक नवीच चर्चा सुरू झाली आहे आणि त्यानुसार मार्च महिन्यात पाळी येणं लांबतं असं म्हटलं आहे. काही जणींनी खरंच हा अनुभव घेतला आहे, तर काही जणींना यात काहीही तथ्य नाही, असं वाटतं. तुम्हालाही असा काही अनुभव आला आहे का? बघा याविषयी एक्सपर्ट काय सांगतात..(is it really true that periods get delayed in march?) 

 

जर्नल ऑफ वुमेन्स हेल्थ आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या अभ्यासानुसार महिलांना जर पाळी उशिरा येत असेल तर त्यामागे एक कारण असंही असतं की त्या खूप तणावात आहेत. मानसिक ताण वाढला की पाळी उशिरा येते. तसेच हवामानात झालेला बदलही कधी कधी पाळीच्या तारखेत बदल करू शकतो.

उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून गेली? 'या' पद्धतीने राईस फेशियल करा- टॅनिंग जाऊन चेहऱ्यावर येईल ग्लो

आता मार्च महिन्याचं बोलायचं झालं तर फेब्रुवारी आणि मार्च यादरम्यान वातावरण खूप बदललेलं असतं. हिवाळा जाऊन उन्हाळ्याला चांगलीच सुरुवात झालेली असते. उष्णता वाढलेली असते. त्यामुळे मेलाटोनिन आणि कॉर्टिसॉल या हार्मोन्सचं संतुलनही बिघडतं.

 

त्याचा ओव्ह्युलेशनवर परिणाम होऊ शकतो. पण याचा परिणाम सगळ्याच महिलांवर होईल असं नाही. त्यामुळे सरसकट सगळ्यांनाचा हा त्रास होऊन त्यांचे मार्चचे पिरियड्स उशिराच येतील असं नाही.

दुपारच्या जेवणानंतर खूप सुस्ती येते? हे नॉर्मल आहे की धोक्याची सूचना? डॉक्टर सांगतात..

पिरियड्स वेळेवर येण्यासाठी तुमची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी उत्तम असणं गरजेचं आहे. पण तरीही पिरियड्स उशिराच येत असतील तर मात्र एखाद्या महिन्याला त्यासाठी जबाबदार न ठरवता डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक चांगलं. 
 

Web Title : क्या मार्च में पीरियड्स वाकई देरी से आते हैं? विशेषज्ञों ने बताई वजह।

Web Summary : तनाव और बदलते मौसम के कारण हार्मोन संतुलन बिगड़ने से मार्च में पीरियड्स में देरी हो सकती है। जीवनशैली और आहार महत्वपूर्ण हैं, लेकिन अगर देरी बनी रहती है तो डॉक्टर से सलाह लें। व्यक्तिगत अनुभव अलग-अलग होते हैं, और सभी महिलाएं प्रभावित नहीं होती हैं।

Web Title : Do periods really get delayed in March? Experts explain reason.

Web Summary : Periods can be delayed in March due to stress and changing weather affecting hormone balance. Lifestyle and diet are key, but consult a doctor if delays persist. Individual experiences vary, and not all women are affected.