बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका आणि ‘मिसेस फनीबोन्स’ म्हणून ओळखली जाणारी ट्विंकल खन्ना ही कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.(Twinkle Khanna menopause) समाज ज्या विषयांवर गप्प बसतो, त्यावर ती निर्भीडपणे बोलते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी तिने महिलांच्या आरोग्याशी संबंधित एका अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर आपलं मन मोकळं केलं तो म्हणजे मेनोपॉज.(menopause symptoms explained)
अनेक महिलांसाठी मेनोपॉज म्हणजे “नैसर्गिक बदल” एवढाच शब्द असतो. घर, कुटुंब, जबाबदाऱ्या यामध्ये स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्याची सवय स्त्रियांना लहानपणापासूनच लावली जाते. पण ट्विंकल खन्ना स्पष्टपणे सांगते की हा काळ इतका सोपा नसतो, जितका तो वरवर पाहता वाटतो. ती म्हणते, मेनोपॉज म्हणजे केवळ मासिक पाळी थांबणं नाही, तर तो शरीर आणि मन दोघांनाही बदलणारा काळ असतो. या टप्प्यावर महिलांच्या शरीरातील हार्मोन्स झपाट्याने बदलू लागतात. कधी अचानक येणारा थकवा, कधी विनाकारण डोळ्यात येणारे पाणी, तर कधी स्वतःच स्वतःला ओळखू न शकण्याची भावना हे सगळं आतून खूप वेदनादायक असतं.
या काळात महिलांनी स्वत:ला तू मजबूत आहेस असं सांगण्यापेक्षा तुला कसं वाटतंय? हा प्रश्न विचारणं स्वत:ला विचारणं जास्त गरजेचं आहे. कारण शारीरिक वेदनांसोबतच मानसिक अस्थिरता देखील महिलांना एकटं पाडत असते. समाजाकडून समजून घेतलं जाणं, कुटुंबाकडून आधार मिळणं आणि स्वतःच्या भावनांकडे लक्ष देणं ही खरी गरज असते.
ट्विंकल खन्नाच्या मते, मेनोपॉजमध्ये अचानक शरीरात उष्णता जाणवत नाही. या काळात शरीरात अनेक बदल होतात. चिडचिडेपणा, विसरभोळेपणा आणि हाडांचे कमकुवत होणे अशा अनेक समस्या एकाच वेळी डोकं वर काढतात. या काळात इस्ट्रोजन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे स्त्रियांना नैराश्य किंवा सतत अस्वस्थपणा जाणवतो. अशावेळी महिलांनी काय करायला हवं. शरीरात होणारे बदल कसे स्वीकारायला हवे, याविषयी माहिती दिली आहे.
ट्विंकल म्हणते, सगळ्यात आधी प्रत्येक महिलेने आपल्या शरीरात होणारे बदल स्वीकारायला हवे. हे बदल लपवण्यापेक्षा त्याबद्दल डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करा. या वयात आपली चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि फायबर असणारे पदार्थ खा. तसेच आहारातील साखरेचे प्रमाण कमी करा. प्रत्येक महिलेने नियमितपणे व्यायाम करायला हवा. यामध्ये केवळ चालणं पुरेसे नाही. वयानुसार स्नायूंची ताकद कमी होते, त्यामुळे वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं आवश्यक आहे. ज्यामुळे हाडांची झीज थांबवता येईल.
मेनोपॉजमध्ये चिडचिडेपणा कमी करण्यासाठी महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी वाचन, लेखन किंवा योगासने करायला हवीत. आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन गुंतवायला हवे. त्रास असह्य होत असेल, तर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मेनोपॉज हा आपल्या आयुष्याचा शेवट नसून तो एका नव्या सुरुवातीचा टप्पा आहे. योग्य माहिती, सकस आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा 'पेनफुल' काळही सुसह्य होऊ शकतो, असं ट्विंकल खन्ना म्हणते.
Web Summary : Twinkle Khanna highlights menopause isn't just the end of periods. It's a transformative phase needing understanding, self-care, and support. She advises women to acknowledge changes, seek medical advice, adopt a healthy lifestyle, and prioritize mental well-being for a smoother transition.
Web Summary : ट्विंकल खन्ना ने बताया मेनोपॉज सिर्फ़ माहवारी का अंत नहीं है। यह एक परिवर्तनकारी चरण है जिसमें समझ, आत्म-देखभाल और समर्थन की ज़रूरत होती है। उन्होंने महिलाओं को बदलावों को स्वीकार करने, चिकित्सीय सलाह लेने, स्वस्थ जीवनशैली अपनाने और बेहतर बदलाव के लिए मानसिक स्वास्थ्य को प्राथमिकता देने की सलाह दी।