पाळी सुरू होण्याचा काळ आणि पाळी बंद होण्याचा काळ हा प्रत्येक स्त्री साठी भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खूप बदल घडवून आणणारा असतो. या दोन्ही वेळेला स्त्रिया वयाच्या अगदी नाजूक टप्प्यावर असतात. अतिशय हळव्या झालेल्या असतात. पाळी सुरू होण्यापुर्वी शरीरात काही बदल होत असतात आणि पाळी जाण्याच्या टप्प्यातही शरीर बदलत असते. या अवस्थेमध्ये असणाऱ्या बहुतांश स्त्रियांना एक त्रास जाणवायला लागतो आणि तो म्हणजे ब्रेन फॉग. हाच त्रास नेमका अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिलाही होत होता. तो कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांनी तिला नेमका काय सल्ला दिला याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता ब्रेन फॉग म्हणजे नेमकं काय आणि ते कमी करण्यासाठी समंथाने काय उपाय केले ते पाहूया..(Nutritionist gives Samantha Ruth Prabhu 3 tips to get relief from brain fog during perimenopause)
ब्रेन फॉग म्हणजे नेमकं काय?
समंथाने याविषयी आहारतज्ज्ञ राशी चौधरी यांच्याशी चर्चा केली. यामध्ये त्या म्हणाल्या की ब्रेन फॉग हा काही आजार नाही. ती एक मानसिक अवस्था आहे. यामध्ये महिलांना मेंटली आपण थोडे स्लो झालो आहोत असं वाटतं. एकाग्रता कमी होते. मन खूप चंचल होतं.
फक्त ३ स्टेप्समध्ये झटपट करा भोगीची पारंपरिक भाजी, चव आणि पौष्टिकता दोन्हीही जपणारी...
विसराळूपणा वाढत जातो आणि लहानसहान गोष्टीतही खूप गाेंधळून गेल्यासारखं होतं. असं होण्यामागचं कारण म्हणजे या काळात महिलांचया शरीरातलं इस्ट्रोजीन कमी झालेलं असतं. त्यामुळे मेंदूवर जे इस्ट्रोजीन रिसेप्टर असतात त्यांचंही काम मंदावतं आणि त्यामुळे मग ब्रेन फॉगसारखा त्रास होतो.
ब्रेन फॉगचा त्रास कमी करण्यासाठी समंथाने काय उपाय केले?
१. समंथाला आहारतज्ज्ञांनी जे काही उपाय सांगितले त्यातला पहिला उपाय म्हणजे दिवसाची सुरुवात एखाद्या हेल्दी फॅटने करा. यासाठी बटर, तूप किंवा खाण्यायुक्त असणारं खोबरेल तेल ओल्या हळदीसोबत खा. त्यात थोडी मिरेपूडही असू द्या. या पदार्थांमुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते.
संक्रांतीला नववधूसाठी हलव्याच्या मंगळसुत्राचे ७ सुंदर प्रकार, घरीही करता येतील असे सोपे डिझाईन्स..
२. सिंहकेसर (Lion's Mane Mushroom) नावाचं जे औषधी मशरूम असतं ते देखील हा मानसिक त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. कॉफी, चहा किंवा सकाळी तुम्ही घेत असणाऱ्या कोणत्याही पेयासोबत सिंहकेसर मशरूमही थोडं घ्या.
३. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही सप्लिमेंट्स सुरू केल्या तर त्यामुळेही ब्रेन फॉगचा त्रास बराच कमी होऊ शकतो.
