Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menopause > मेनोपॉजचा परिणाम दातांवरही होऊ शकतो- बघा तज्ज्ञ काय सांगतात, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच..

मेनोपॉजचा परिणाम दातांवरही होऊ शकतो- बघा तज्ज्ञ काय सांगतात, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच..

Menopause And Oral Health: आपल्याला कदाचित या गोष्टीचा अंदाजही नसतो, पण मेनोपॉजचा परिणाम आपल्या दातांवर, मौखिक आरोग्यावरही हाेऊ शकतो...(how to take care of teeth and oral health during menopause?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 17:18 IST2026-03-11T16:41:05+5:302026-03-11T17:18:32+5:30

Menopause And Oral Health: आपल्याला कदाचित या गोष्टीचा अंदाजही नसतो, पण मेनोपॉजचा परिणाम आपल्या दातांवर, मौखिक आरोग्यावरही हाेऊ शकतो...(how to take care of teeth and oral health during menopause?)

menopause harms your teeth, how to take care of teeth and oral health during menopause | मेनोपॉजचा परिणाम दातांवरही होऊ शकतो- बघा तज्ज्ञ काय सांगतात, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच..

मेनोपॉजचा परिणाम दातांवरही होऊ शकतो- बघा तज्ज्ञ काय सांगतात, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच..

Highlightsअसे त्रास तुम्हाला चाळिशी किंवा पंचेचाळिशीनंतर सुरू झाले असतील तर ते मेनोपॉजचं एक लक्षण आहे, हे समजून घ्या.

मासिक पाळी येण्याच्या काळात आणि त्यानंतरही पुढे काही वर्षे मुलींच्या शरीरात जसे बदल होत जातात, तसेच काही वेगळे बदल पेरीमेनोपॉज, मेनोपॉजचा काळ आणि त्यानंतरही काही वर्षे महिलांच्या शरीरात होत असतात. कारण या काळामध्ये शरीरातल्या हार्मोन्सची स्थिती खूप वर- खाली होत असते. त्यांच्यात खूप बदल होत असतात. त्याचेच कित्येक परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात. त्यापैकीच एक म्हणजे मौखिक आरोग्यावरही मेनोपॉजचा परिणाम होतो. आता मेनोपॉज आणि मौखिक आरोग्य यांचा काय संबंध असं वाटणं अगदी साहजिक आहे. तेच आता आपण पाहूया आणि मेनोपॉज किंवा पेरिमेनोपॉज काळात मौखिक आरोग्याचीही कशी काळजी घ्यायची ते बघूया..(how to take care of teeth and oral health during menopause?) 

 

मेनोपॉज किंवा पेरिमेनोपॉजचा परिणाम दातांवर कसा होतो?

याविषयी डॉ. संदीप देव यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार मेनोपॉजच्या काळात इस्ट्रोजीन हार्मोन वेगात कमी होत असतो. तोंडामध्ये लाळेचे प्रमाण चांगले असणे, हिरड्या आणि दात मजबूत ठेवणे यासाठी इस्ट्रोजीन उपयुक्त ठरतं.

व्हायरल झालेला Kora Turmeric Mask माहितीये का? ४ पदार्थ एकत्र करून लावा, त्वचेवर येईल अफलातून ग्लो...

जेव्हा मेनोपॉजदरम्यान इस्ट्रोजीन कमी होते तेव्हा लाळ कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे तोंड कोरडं पडतं, तोंडाची दुर्गंधी वाढते. त्याचप्रमाणे दात आणि हिरड्यांचे त्रासही सुरू होतात. कधी कधी हिरड्यामधून रक्त येतं. दात दुखरे होतात. असे त्रास तुम्हाला चाळिशी किंवा पंचेचाळिशीनंतर सुरू झाले असतील तर ते मेनोपॉजचं एक लक्षण आहे, हे समजून घ्या.

 

मेनोपॉजदरम्यान महिलांनी मौखिक आरोग्याची कशी काळजी घ्यावी?

इस्ट्रोजीनचा महिलांच्या दातांवर, तोंडामध्ये कसा परिणाम होतो ते आपण पाहिलेच. हे त्रास टाळायचे असतील तर रोजच्या रोज तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणं तर गरजेचंच आहे. पण ६ महिन्यातून एकदा डेंटीस्टचा सल्लाही घेतला पाहिजे.

गॅस सिलेंडर मिळेल की नाही, टेन्शन आलंय? बघा ५ रेसिपी, गॅस पेटविण्याची गरजच नाही, गॅसची होईल बचत

त्यांच्याकडून डेंटल क्लिनिंग झालं पाहिजे. याशिवाय फ्लुरोईडचं प्रमाण जास्त असणारी टुथपेस्ट वापरणे. तोंडाच्या हायड्रेशनची काळजी घेणे आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी या सप्लिमेंट्स सुरू करणंही गरजेचं आहे. 

 

Web Title : मेनोपॉज दांतों के स्वास्थ्य को प्रभावित करता है, विशेषज्ञ सलाह; इन लक्षणों को अनदेखा न करें!

Web Summary : मेनोपॉज हार्मोनल परिवर्तन का कारण बनता है जो मौखिक स्वास्थ्य को प्रभावित करता है। एस्ट्रोजन में गिरावट से मुंह सूखना, सांसों की दुर्गंध और मसूड़ों की समस्या होती है। इस अवधि के दौरान मौखिक देखभाल के लिए नियमित दंत जांच, फ्लोराइड टूथपेस्ट, जलयोजन और पूरक महत्वपूर्ण हैं।

Web Title : Menopause affects dental health, expert advice; don't ignore these symptoms!

Web Summary : Menopause causes hormonal changes impacting oral health. Estrogen decline leads to dry mouth, bad breath, and gum problems. Regular dental check-ups, fluoride toothpaste, hydration, and supplements are crucial for oral care during this period.