Lokmat Sakhi >Health >Menopause > डोळ्यात पाणी येतं अचानक आणि.. अभिनेत्री विशाखा सुभेदार सांगतात, मेनोपॉज त्रास देतो म्हणून..

डोळ्यात पाणी येतं अचानक आणि.. अभिनेत्री विशाखा सुभेदार सांगतात, मेनोपॉज त्रास देतो म्हणून..

Vishakha Subhedar About Her Menopause: मेनोपॉज आणि त्याचा होणारा शारिरीक, मानसिक त्रास याविषयी अभिनेत्री विशाखा सुभेदार थेट सोशल मिडियावरच बोलत्या झाल्या आहेत...

By रुचिका पालोदकर | Published: June 11, 2024 01:32 PM2024-06-11T13:32:58+5:302024-06-11T13:34:48+5:30

Vishakha Subhedar About Her Menopause: मेनोपॉज आणि त्याचा होणारा शारिरीक, मानसिक त्रास याविषयी अभिनेत्री विशाखा सुभेदार थेट सोशल मिडियावरच बोलत्या झाल्या आहेत...

Marathi actress Vishakha Subhedar reveals about her experience of menopause  | डोळ्यात पाणी येतं अचानक आणि.. अभिनेत्री विशाखा सुभेदार सांगतात, मेनोपॉज त्रास देतो म्हणून..

डोळ्यात पाणी येतं अचानक आणि.. अभिनेत्री विशाखा सुभेदार सांगतात, मेनोपॉज त्रास देतो म्हणून..

Highlightsअभिनेत्री विशाखा सुभेदार यांची सोशल मिडियावरची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी मेनोपॉजविषयीचा त्यांचा स्वत:चा अनुभव सांगितला आहे.

ऋचिका सुदामे- पालोदकर


आयुष्य छान सुरळीत सुरू असतं. आपण आपल्या कामात बिझी झालेलाे असतो आणि अचानक ४०- ४५ च्या वयात आलेल्या बाईच्या आयुष्याला एक जोरदार ब्रेक लागतो. दबक्या पावलांनी येऊन मेनोपॉज तिला गाठतो. यामुळे मग सुरुवातीला ती थोडी बिचकून जाते. पाळी, मेनोपॉज याविषयी आजही कोणी फारसं काही बोलत नाही. त्यामुळे या त्रासाविषयी तिला खूप काही माहिती नसतंच. तिलाच माहिती नसल्याने तिच्या घरच्यांना, जवळच्या व्यक्तींनाही काही माहिती असण्याचा प्रश्नच नसतो. खरंतर त्यावेळी तिला त्यांची साथ हवी असते. पण त्याविषयी आपल्याकडे अजूनही खूप सजगता नाहीत. म्हणूनच मेनोपॉजच्या त्रासाविषयी पुढच्या पिढीतल्या स्त्रियांना तसेच त्यांच्या घरातल्या इतर लोकांनाही थोडं- फार समजावं आणि त्यांची त्या स्त्रीला आधार देण्याची मानसिक तयारी व्हावी, यासाठी मी मेनोपॉजचा विषय थेट सोशल मिडियावर मांडला असं अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी लोकमत सखी. कॉमशी बोलताना सांगितलं.. 

 

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची सोशल मिडियावरची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी मेनोपॉजविषयीचा त्यांचा स्वत:चा अनुभव सांगितला आहे. मेनोपॉजच्या त्रासातून जाणाऱ्या आणि काही वर्षांनी त्या टप्प्यावर येऊ पाहणाऱ्या प्रत्येकीसाठी ती पोस्ट खूपच उपयुक्त ठरणारी आहे.

फक्त १ आवळा आणि अर्धी वाटी तेल, केस गळणं ८ दिवसांत होईल कमी- बघा काय करायचं...

त्या म्हणतात की आपल्या आईला, आजीला, मावशीला, आत्याला हा त्रास झाला. पण त्यांनी तो कधी सांगितला नाही. त्यांनी सांगितलं नाही म्हणून आपणही त्यांना हवी तशी साथ देऊ शकलो नाही. पण असं आपल्यासोबत किंवा पुढच्या पिढीसोबत व्हायला नको. म्हणूनच याबाबत आता थोडं तरी व्यक्त होणं गरजेचं आहे. 

 

हा त्रास तर होतो आहे आणि तो आणखी किती महिने चालणार हे देखील माहिती नाही. पण यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी त्यांचा स्वत:चा काय मार्ग शोधला आहे हे देखील त्यांनी सांगितलं. विशाखा म्हणाल्या की या काळात खूप जास्त मूडस्विंग होतात.

सावळ्या रंगावरून हिणवल्यामुळे निताराने 'ही' गोष्ट कायमची सोडली- लेकीबद्दल ट्विंकल खन्ना सांगते....

कोणी सहज जरी काही बोललं तरी ते वाक्य आपल्याला टोचतं, त्याचा लगेच मनावर परिणाम होतो. वाईट वाटतं. खूप नकारात्मक विचार मनात येतात. हे सगळे विचार मनातून बाहेर काढून टाकण्यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशन या दोन गोष्टींची सध्या खूप जास्त मदत होत आहे, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. या उपायांची साथ आणि आपल्या माणसांचा आधार यांच्या मदतीने मेनोपॉजचा त्रास नक्कीच सुसह्य होऊ शकतो. 

 

Web Title: Marathi actress Vishakha Subhedar reveals about her experience of menopause 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.