Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menopause > मेनोपॉज आणि वाढत्या उष्णतेचा त्रास सतावतो ? करा ३ सोपे उपाय - उन्हाळ्यातही राहा सुपरकूल, एनर्जेटिक...

मेनोपॉज आणि वाढत्या उष्णतेचा त्रास सतावतो ? करा ३ सोपे उपाय - उन्हाळ्यातही राहा सुपरकूल, एनर्जेटिक...

how to reduce body heat in menopause naturally : summer diet for menopausal women : natural cooling foods for menopause : उन्हाळा आणि मेनोपॉजचा त्रास कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 18:05 IST2026-04-02T18:00:25+5:302026-04-02T18:05:01+5:30

how to reduce body heat in menopause naturally : summer diet for menopausal women : natural cooling foods for menopause : उन्हाळा आणि मेनोपॉजचा त्रास कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय...

how to reduce body heat in menopause naturally summer diet for menopausal women | मेनोपॉज आणि वाढत्या उष्णतेचा त्रास सतावतो ? करा ३ सोपे उपाय - उन्हाळ्यातही राहा सुपरकूल, एनर्जेटिक...

मेनोपॉज आणि वाढत्या उष्णतेचा त्रास सतावतो ? करा ३ सोपे उपाय - उन्हाळ्यातही राहा सुपरकूल, एनर्जेटिक...

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे बदल केवळ शारीरिक नसून ते मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात. त्यात सध्या भर पडते ती कडक उष्णतेची...उन्हाळा सुरू झाला की मेनोपॉजच्या काळात असलेल्या महिलांना उष्णतेचा त्रास दुप्पट जाणवू लागतो. मेनोपॉजच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल घडत असतात...मेनोपॉजच्या काळात अनेकजणींना उन्हाळ्याचा त्रास असह्य होतो अशावेळी नेमकं उपाय म्हणून काय करावं सुचत नाही(summer diet for menopausal women).

शरीरातील हार्मोनल बदलांमुळे अचानक उष्णता जाणवणे किंवा पचनाच्या तक्रारी वाढणं इतकंच नाही तर हॉट फ्लॅशेस आणि रात्री येणारा घाम यामुळे अनेक महिला हैराण होतात...अशा परिस्थितीत उपाय म्हणून आपल्याच स्वयंपाकघरातील पारंपरिक पदार्थ फायदेशीर ठरतात. करीना कपूरला डाएट टिप्स (how to reduce body heat in menopause naturally) देणाऱ्या सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (natural cooling foods for menopause) यांनी खास उन्हाळ्यासाठी ३ सोपे उपाय सांगितले आहेत. रणरणत्या उष्णतेचा आणि मेनोपॉजचा त्रास कमी करुन यंदाचा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूयात... 

उन्हाळा आणि मेनोपॉजचा त्रास कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय... 

१. शहाळ्याच्या पाण्यांत सब्जाचं बी घालून पिणं :- दिवसाची सुरुवात जर शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थाने झाली, तर दिवसभर शरीर ताजेतवाने आणि हलके वाटते. मेनोपॉजच्या काळात शरीराचे तापमान अचानक वाढणे किंवा अस्वस्थ वाटणे यावर हा एक उत्तम उपाय आहे. सकाळी १२ वाजण्यापूर्वी एक ग्लास शहाळ्याचं पाणी पिणं अत्यंत फायदेशीर ठरते. या शहाळ्याच्या पाण्यात फक्त एक चिमूटभर सब्जाच बी मिसळा. शहाळ्याच्या पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट्स असतात, जे शरीराचे तापमान संतुलित राखण्यास मदत करतात. हे पेय शरीराला दिवसभर हायड्रेटेड ठेवते, ज्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो. सब्जाच्या बिया पचनक्रिया सुरळीत करतात आणि पोट फुगणे किंवा गॅस होण्यासारख्या समस्यांपासून आराम देतात.

पदार्थ दिसतात हेल्दी पण किडनीसाठी विष! पौष्टिक डाएट फूडही ठरू शकते किडनी स्टोनचे कारण - पाहा ते पदार्थ कोणते ? 

२. दुपारच्या जेवणात दही किंवा ताकाचा समावेश :- उन्हाळ्यात दुपारच्या जेवणासोबत दही किंवा ताक घेणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मेनोपॉजच्या काळात अनेक महिलांना पचनाच्या तक्रारी किंवा पोट जड होण्याचा त्रास होतो, त्यावर हा एक रामबाण उपाय आहे. जेवताना एक वाटी दही किंवा एक ग्लास ताक आवर्जून घ्या. यामध्ये थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकल्यास त्याची चव आणि गुणधर्म दोन्ही वाढतात. दही आणि ताक यामध्ये 'गुड बॅक्टेरिया' भरपूर प्रमाणात असतात, जे आतड्यांचे आरोग्य उत्तम राखतात. जिऱ्याची पूड पचनक्रिया वेगवान करते आणि जेवणानंतर येणारा आळस किंवा सुस्ती कमी करण्यास मदत करते. हे पदार्थ शरीराला आतून थंडावा देतात, ज्यामुळे उन्हाळ्यातील दाह कमी होतो आणि पोट हलके राहते. उन्हाळ्यात पित्त वाढल्यामुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी आहारात दही ताकाचा समावेश करणं फायद्याचं ठरतं. 

हेल्दी लिव्हरसाठी खायलाच हव्यात 'या' ३ भाज्या! सर्वात स्वस्त आणि घरगुती उपाय - लिव्हर राहील सुपरहेल्दी... 

३. संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर केळी खा :- उन्हाळ्याच्या दिवसांत केळे खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरू शकते. विशेषतः मेनोपॉजच्या काळात ज्या महिलांना रात्री अस्वस्थ वाटते किंवा पोटाच्या तक्रारी जाणवतात, त्यांच्यासाठी हा एक फायदेशीर उपाय आहे. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक केळे खाणे फायदेशीर ठरू शकते. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील इलेक्ट्रोलाईटचे संतुलन राखण्यास मदत करतात. केळे पोटाला शांत ठेवते आणि पचनक्रिया अधिक सुलभ करते. ज्यांना बद्धकोष्ठता किंवा पोट जड होण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी केळे अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे पोट हलके वाटते आणि शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी केळं खाल्ल्याने स्नायूंना आराम मिळतो, ज्यामुळे मेनोपॉजमधील महिलांना सतावणारी निद्रानाशाची समस्या कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.

कंबरेचे माप २८ व्हावे असे वाटते? पण जिमचं नको आणि डाएटिंगही नको, मग रोज १५ मिनिटं करा ३ उपाय...

४. हवामान बदलताना पचनसंस्था मंदावणे :- मेनोपॉजच्या काळात शरीरातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे पचनक्रिया काहीशी मंदावू शकते. विशेषतः जेव्हा हवामान बदलते (उदा. थंडी संपून उन्हाळा सुरू होतो), तेव्हा गॅस किंवा ब्लोटिंग (पोट फुगणे) यांसारख्या समस्या अधिक प्रमाणात त्रास देतात. ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे त्याबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही. योग्य आहार आणि थोडी खबरदारी घेतल्यास या समस्यांवर सहज नियंत्रण मिळवता येते.


छोटे बदल, मोठे फायदे... 

आपल्या डेली रुटीनमध्ये शहाळ्याचं पाणी, दही किंवा ताक आणि केळी यांसारख्या साध्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही उन्हाळ्याचा त्रास सहज कमी करू शकता. हे छोटेसे बदल शरीर थंड ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि शांत झोप मिळवून देण्यास मोठी मदत करतात. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि तुमच्या खिशालाही परवडणाऱ्या आहेत. जर तुम्हालाही या उन्हाळ्यात 'कूल' आणि 'एनर्जेटिक' राहायचे असेल, तर ऋजुता  दिवेकर यांनी सांगितलेल्या या सोप्या टिप्स नक्कीच करुन पाहा..

Web Title : मेनोपॉज की गर्मी को मात दें: ठंडी गर्मी के लिए 3 सरल उपाय।

Web Summary : क्या मेनोपॉज और गर्मी आपको परेशान कर रही है? पोषण विशेषज्ञ रुजुता दिवेकर ठंडा और ऊर्जावान रहने के लिए नारियल पानी में सब्जा के बीज के साथ दिन की शुरुआत करने, दोपहर के भोजन में दही या छाछ शामिल करने और रात के खाने के बाद केला खाने का सुझाव देती हैं।

Web Title : Beat menopause heat: 3 simple tips for a cool summer.

Web Summary : Menopause and summer heat bothering you? Nutritionist Rujuta Diwekar suggests starting the day with sabja seeds in coconut water, including yogurt or buttermilk in lunch, and eating a banana after dinner to stay cool and energetic.