Join us
Daily Top 2 Weekly Top 5

भारतातल्या महिलांना लवकर सुरू होतोय मेनोपॉज, बघा त्यामागची कारणं आणि तब्येतीवर होणारे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 17:45 IST

Early Menopause in Indian Women: भारतीय महिलांचं मेनोपॉजचं वय अलिकडे का येत आहे काय बरं त्यामागचं कारणं (what are the symptoms and causes of early menopause in Indian women?)

मेनोपॉज म्हणजे महिलांच्या रजोनिवृत्तीचा काळ. मासिक पाळी सुरू होण्याचा काळ जसं प्रत्येक मुलीच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यात खूप बदल घडवून आणणारा असतो, तसाच मासिक पाळी जाण्याचा म्हणजेच मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीचा काळही महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आतापर्यंत रजोनिवृत्तीचं वय साधारण पन्नाशीच्या नंतर असायचं. त्यानंतरच महिलांची पाळी बंद व्हायची. पण आता मात्र मागच्या काही वर्षांपासून भारतीय महिलांचं रजोनिवृत्तीचं वय अलिकडे आलं असून पंचेचाळिशीनंतरच कित्येकींची पाळी बंद होत आहे.(what are the symptoms and causes of early menopause in Indian women?)

 

कमी वयातच महिलांना मेनोपॉज का येतो?

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे यांच्या आकडेवारीनुसार जवळपास १६ टक्के महिलांना ४० ते ४४ या वयातच मेनोपॉज सुरू झाला होता. त्याची अनेक कारणंही आहेत.

व्यायाम, डाएट करूनही वजन कमी का होत नाही? पाहा ३ कारणं- बघा काय करायचे उपाय

तणाव, जीवनशैलीमध्ये झालेला बदल, शारिरीक ताण, मद्यपान किंवा धुम्रपान यासारख्या सवयी, पचनक्रिया किंवा चयापचय क्रियेसंबंधी असणारे आजार, थायरॉईड अशी अनेक कारणं यामागे असू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात. त्याचप्रमाणे कमी वयात लग्न आणि मुलं होणे, ॲबॉर्शन ही देखील पाळी लवकर येण्यामागची कारणं असू शकतात. 

 

मेनोपॉज लवकर आल्याने शरीरात काय बदल होतात?

मेनोपॉज सुरू झाला म्हणजे महिलांच्या शरीरातला इस्ट्रोजीन हार्मोन कमी होत जाताे. हा हार्मोन प्रजनन संस्थेसोबतच हाडांची मजबुती, हृदयांचे आरोग्य यासारख्या गोष्टींसाठीही जबाबदार असतो.

३ गोष्टींकडे लक्ष द्या, पाळी आल्यानंतरही मुलींची उंची नक्कीच वाढते, मात्र त्यासाठी...

त्यामुळे जेव्हा लवकर मेनोपॉज येतो तेव्हा आरोग्याच्या कित्येक तक्रारी कमी वयातच सुरू होतात. त्यामुळे कमी वयातच मेनोपॉज येणं ही चिंतेचीच गोष्ट आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Early menopause in Indian women: Causes, health effects explained.

Web Summary : Indian women are experiencing menopause earlier, often after 45. Factors include stress, lifestyle changes, unhealthy habits, metabolic disorders, thyroid issues, early marriage, and abortions. Early menopause causes estrogen decline, affecting bone health and heart function, leading to premature health problems.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य