पन्नाशी जवळ आलेल्या महिलांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मेनोपॉज. मासिक पाळी थांबण्याची प्रक्रिया. हा टप्पा नैसर्गिक असला तरी शरीरात आणि मनसिकतेत मोठे बदल घडवतो. (Does your body feel tired between the ages of forty and fifty? See what changes happen to your body and what to do about it)या काळात अनेक महिलांना पाय दुखणे, थकवा, अंगदुखी, दम लागणे, झोप नीट न लागणे, गरम होणे (हॉट फ्लॅशेस), घाम येणे, चिडचिड किंवा उदासीनता जाणवू लागते. हे सर्व बदल हार्मोन्समधील असमतोलामुळे होत असतात.
मेनोपॉजदरम्यान शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन महत्त्वाचे हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होऊ लागतात. इस्ट्रोजेनची कमतरता झाल्यामुळे हाडांची ताकद कमी होते, त्यामुळे सांधेदुखी आणि पाय दुखणे वाढते. स्नायूंवर ताण येतो आणि अंग वारंवार दुखते. शिवाय रक्ताभिसरणात बदल झाल्यामुळे अंग जड होते. थकवा आणि दम लागणे वाढते. काही महिलांना थंडीही जाणवते. चेहऱ्यावर लालसरपणा किंवा अचानक घाम येणे असे त्रास होतात.
या काळात मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. हार्मोनल बदलांमुळे मेंदूतील न्यूरोकेमिकल्समध्ये फरक पडतो, त्यामुळे चिडचिड, नैराश्य, अस्वस्थता आणि भावनिक अस्थैर्य जाणवते. कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या आणि झोपेचा अभाव या गोष्टींमुळे ही स्थिती अधिक वाढते.
या त्रासांवर काही साधे पण प्रभावी उपाय करा.
१. दररोज नियमित चालणे, योगासन किंवा हलका व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात आणि हाडांना बळकटी मिळते.
२. आहारात कॅल्शियम, जीवनसत्व डी, लोह आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स यांचा समावेश करावा. दूध, दही, डाळी, हिरव्या भाज्या, जवस, बदाम, तिळाचे लाडू हे पदार्थ विशेष फायदेशीर ठरतात. हळद, तूप आणि आलं यांचा वापर केल्याने सांधेदुखी आणि सूज कमी होते.
३. पुरेशी झोप आणि ध्यान (मेडिटेशन) मानसिक स्थैर्य टिकवतात. दररोज काही मिनिटे असे डोके मिटून शांत बसल्याने चिडचिड आणि मनावरचा ताण कमी होतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने थेरपी किंवा नैसर्गिक पूरक आहार (सप्लिमेंट्स) घ्यावेत.
Web Summary : Menopause causes hormonal changes leading to fatigue, aches, and mood swings. Exercise, calcium-rich foods, and adequate sleep can alleviate symptoms. Consult doctors for support.
Web Summary : रजोनिवृत्ति हार्मोनल बदलावों का कारण बनती है जिससे थकान, दर्द और मूड स्विंग होते हैं। व्यायाम, कैल्शियम युक्त खाद्य पदार्थ और पर्याप्त नींद लक्षणों को कम कर सकते हैं। सहायता के लिए डॉक्टरों से सलाह लें।