Join us

स्वयंपाकघरात उभे राहून पाय दुखतात? प्रत्येक महिलेने रोज 'या ' ६ गोष्टी केल्या तर पाय दुखणं थांबेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 13:00 IST

your feet hurt? do you stand in the kitchen for long ? do these 6 things every day : घर सांभाळताना पायांची काळजी घ्यायला विसरु नका. सतत उभे राहिल्यामुळे पायाच्या वेदना वाढतात.

महिला आजकाल सगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे आहेत. घर, संसार, ऑफीस, मुलं सगळंच त्या व्यवस्थित सांभाळतात. आजकाल पुरुषही महिलांना घरकामात मदत करायला लागले आहेत. (your feet hurt? do you stand in the kitchen for long ? do these 6 things every day)मात्र सगळीकडेच तसे चित्र दिसत नाही. काही ठराविक विचारसारणीच्या घरात सगळे मिळून काम करतात. मात्र घराची बऱ्या पैकी जबाबदारी महिलांवरच पडते. एका वयानंतर सगळ्या गोष्टी सांभाळणं जरा कठीण होतं. त्यामुळे थकवा, चिडचिड, अंगदुखी अशा अनेक त्रासांमधून जावे लागते. महिलांसाठी काही कृती आहेत. व्यायाम नाही कृतीच म्हणायचे कारण काही फार शारीरिक कष्ट न घेता फक्त काही छोट्या क्रिया करुन थकवा आणि शारीरिक त्रास कमी करता येईल. 

१. घरी साधा खेळण्यातला चेंडू असतो. पायाखाली चेंडू ठेवायचा आणि त्यावरून पाऊल पुढे मागे फिरवायचे. असे केल्याने पायाला आराम मिळतो. नसा मोकळ्या होतात. पायाला आराम मिळतो. उभे राहिल्याने पायाला झालेला त्रास कमी होतो. 

२. पायाच्या बोटांवर जोर देऊन चालायचे. टाच हवेत ठेवायची. झेपतील तेवढ्या फेऱ्या मारायच्या. हा प्रकार पायांसाठी फार आरामदायी असतो. पायाच्या बोटांची दुखणी कमी होतात. तसेच टाचेला आराम मिळतो. 

३. एका कॉटनच्या फडक्यावर उभे राहा आणि पायाच्या बोटांनी फडकं घट्ट आवळा आणि सोडा. किमान वीस ते तीस वेळा असे करायचे. बोटाच्या हाडांना आराम मिळतो. तसेच तासंतास उभे राहिल्याने बोटांवर आलेला ताण कमी होतो. हा प्रकार  दिवसातून दोन ते तीन वेळा करा. 

४. बोटांवर चालून झाल्यावर टाचांवरही चालायचे. टाचांवर चालल्याने पायाच्या बोटांना आराम मिळतो. टाचांवर थोडा जोर दिल्यामुळे टाचांना बरेही वाटते. दुखत असतील तर आराम मिळतो.    

५. झोपल्यावर किंवा बसताना पाय लांब करुन बसा आणि पाय हलके सोडायचे. हलके सोडल्यावर पाय जरा हळूहळू हलवायचे. असे केल्याने पाय मोकळे होतात. पायांना आराम मिळतो. 

६. मसाजसाठी विविध उपकरणे बाजारात मिळतात. त्यांचा वापर करा. पायावरुन रोज थोडावेळ मसाजर फिरवायचा असे केल्याने थकवा कमी होईल. झोपही शांत लागेल.             

टॅग्स : हेल्थ टिप्समहिलाआरोग्य