Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ऐन तारुण्यात तुमचा मेंदू म्हातारा होतोय, 'या' सवयी आजच बदला; नाहीतर अल्झायमर होण्याचाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 17:11 IST

3 Habits are Causing Your Brain to Shrink: शरीर थकतं तसंच आपला मेंदूही थकतो. पण कमी वयातच तो थकू लागला तर.....

ठळक मुद्दे विस्मरण वाढत चाललंय आणि कमी वयातच अल्झायमरसारखा त्रास सुरू होण्याचा धोका वाढला आहे.

सगळेच जण आता हे अनुभवत आहेत की बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर खूप परिणाम होत आहेत. जे आजार पुर्वी साठी गाठल्यानंतर मागे लागायचे ते आता अगदी पस्तिशी, चाळिशीतच आपल्याला घेरत आहेत. लाईफस्टाईल तर बदललीच पण त्याच्या जोडीला स्पर्धा प्रचंड वाढली, ताण वाढला. यासोबतच कित्येक चुकीच्या सवयीही आपण लावून घेतल्या. त्यामुळे त्याचा परिणाम जसा आपल्या शरीरावर होतो, मनावर होतो, तसाच तो आपल्या मेंदूवरही होतोच आहे. म्हणूनच तर कमी वयात आपला मेंदू थकायला लागला आहे. यातूनच विस्मरण वाढत चाललंय आणि कमी वयातच अल्झायमरसारखा त्रास सुरू होण्याचा धोका वाढला आहे.

 

मेंदू का थकतो?

१. याविषयी ज्योती बाला शर्मा यांनी दिलेली माहिती झी न्यूजने प्रकाशित केली आहे. त्या म्हणतात की पुरेशी शांत झोप घेणं खूप गरजेचं आहे. पण कित्येक लोकांना शांत झोप येत नाही. त्याचा परिणाम साहजिकच मेंदूवर होतो. मेंदूला म्हणावा तसा आराम मिळत नाही आणि तो दिवसेंदिवस थकत जातो.

आलिया भटची मोगरा साडी- नाजुक फुलांचे सुंदर काठ, जणू मोगऱ्याचा बहर! पाहा व्हायरल फोटो

२. काही लोक शारिरीकदृष्ट्या अजिबातच ॲक्टीव्ह नसतात. कोणताही व्यायाम करत नाही. याचा परिणामही मेंदूवर होतो आणि त्याचा ॲक्टीव्हपणा कमी होत जातो.

३. मद्यपान, धुम्रपान यासारख्या सवयींमुळेही तब्येत आणि मेंदू दोन्ही कमकुवत होत जातात. 

 

मेंदूला ॲक्टीव्ह ठेवण्यासाठी काय करावं?

१, मेंदूला नेहमीच फ्रेश ठेवायचं असेल आणि थकू द्यायचं नसेल तर झोपेचं गणित पाळा. झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवून टाका आणि त्यानुसार दिनक्रम ठरवा. विनाकारण रात्री जागणं सोडून द्या आणि मेंदूला पुरेसा आराम द्या.

Summer Special: उन्हाळ्यात आपलं घर थंडगार ठेवतात ३ रोपं, घरात येताच जाणवतो गारवा- हवाही राहील शुद्ध

२. आहारावर लक्ष केंद्रित करा. घरचं ताज, सकस अन्न मेंदू आणि तुमचं शरीर दोन्हीही फ्रेश ठेवण्यास मदत करतं. आहारात पुरेशी फळं असू द्या.

३. रोज कोणता ना कोणता व्यायाम अवश्य करा.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Young brain aging? Change these habits to avoid Alzheimer's risk.

Web Summary : Unhealthy lifestyles, stress, and bad habits can prematurely age the brain, leading to memory problems and increased Alzheimer's risk. Prioritize sleep, exercise, and a healthy diet to keep your brain active and fresh.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स