Join us

बाळाला कफ झाला, रात्ररात्र खोकतोय? करुन पाहा ‘या’ पुरचुंडीचा उपाय, कफ होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 16:10 IST

Your Baby Is Coughing All Night? Try This Remedy : ओव्याची पुरचुंडी तयार करा. बाळाचा कफ अगदी गायबच होईल.

थंडी, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो. लहान मुलांना काही ना काही कारणांनी सर्दी, खोकला, कफ होतच असतो. लहान मुलांसाठी वेगवेगळी औषधं मेडिकल मध्ये मिळतात. (Your Baby Is Coughing All Night? Try This Remedy)पण त्या चिमुकल्यांना अशी औषध द्यावी की नाही? त्यांना ती पचतील का? असे प्रश्न उगाच डोक्यात फिरत राहतात. अशा वेळी लागेचच आपण आई किंवा आजीकडे उपाय विचारायला जातो. शिक्षित डॉक्टरांपेक्षा अनुभवी महिला अशा वेळी जास्त जवळच्या वाटतात. (Your Baby Is Coughing All Night? Try This Remedy)मग आई एक जादूची पोटली तयार करून देते. जिच्यामुळे लहान मुलांचा कफ सुटतो. सर्दी बरी होते आणि खोकला पण जातो. वर्षानुवर्षे चालत आलेला हा उपाय म्हणजे ओव्याची पुरचुंडी. बळांसाठी हा उपाय नेहमीच उपयुक्त ठरला आहे. आपल्या आईने, आजीने आपल्यासाठी ही ओव्याची पुरचुंडी वापरली असेलच. 'जुनं ते सोनं' असा हा उपाय आहे.

  "घरगुती उपाय नको." असं आजकाल बऱ्याच जणी म्हणतात. त्यांनी हे लक्षात घ्या की, डॉक्टरही हा उपाय सुचवतातच. करायला सोपा आणि दुष्परिणाम काहीच नाहीत. (Your Baby Is Coughing All Night? Try This Remedy)त्यामुळे चिंता नको. डॉ. अर्पित गुप्ता सांगतात, "ओव्यामध्ये अँटी- बॅक्टेरियल सत्व असतात." त्यामुळे ओव्याच्या वासाने साकळलेला कफ विरघळून बाहेर पडतो. कंजेक्शन कमी कमी होत जाऊन नाहीसे होते. छातीचा पिंजरा साफ होतो.  पोटासाठीही ओवा चांगला. बाळांना ओवा खायला देऊ शकत नाही. तो तिखट लागतो. अडकू शकतो. त्यामुळे ओव्याची पुरचुंडी वापरायची पद्धत आहे. 

पुरचुंडी कशी तयार कराल? १. तव्यावर किंवा पॅनमध्ये अर्धी वाटी ओवा  घ्या. त्याचा वास सुटेपर्यंत तो परतून घ्या. सुती कापडामध्ये तो बांधून त्याच्या पुरचुंड्या तयार करून घ्या. तीन चार पुड्या तरी तयार करा. जास्त फायदेशीर ठरेल. ३.पूरचूंडी सुटणार नाही याची काळजी घ्या. नीट घट्ट बांधा. २. बाळाच्या आजूबाजूला त्या पुड्या व्यवस्थित पसरवून ठेवा. 

ओव्याच्या वासाने बाळाचे नाक वाहायचे थांबते. हा उपाय नक्की करून पाहा.   

टॅग्स : हेल्थ टिप्सहोम रेमेडीवैद्यकीयपालकत्व