कपडे असो किंवा चपला असो.. फॅशन सारखी बदलत असते. आता सध्या चपलांच्या किंवा पादत्राणांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास क्रॉक्स प्रकारच्या चपलांची खूप फॅशन आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत कित्येक जण क्रॉक्स वापरताना दिसतात. महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येकालाच क्रॉक्स वापरणं अतिशय ट्रेण्डी वाटतं. ही पादत्राणे खूप महाग असतात पण तरीही ती घेतली जातात. कारण ती वापरणं अतिशय आरामदायी असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. पण तो अनुभव तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ते योग्य पद्धतीने वापराल. कारण काही एक्सपर्ट असं सांगत आहेत की बहुतांश लोक क्रॉक्स चुकीच्या पद्धतीने घालतात आणि त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो (wrong method of wearing crocks).. म्हणून क्राॅक्स वापरण्याची योग्य पद्धत नेमकी कशी ते पाहूया..(wearing crocks in wrong way may causes some health issues)
क्रॉक्स पायात घालण्याची योग्य पद्धत कोणती?
क्रॉक्स घालण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ marwadiyogi या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
शहनाज हुसैन सांगतात तरुण त्वचेचं सिक्रेट- कोलॅजीनयुक्त ४ शाकाहारी पदार्थ खा, सुरकुत्या गायब
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की क्रॉक्सला जो बेल्ट असतो तो आपल्या पायाच्या मागच्या बाजुने यायला हवा. पण अनेक जण तो बेल्ट पुढेच ठेवतात. अशाच पद्धतीने क्रॉक्स वापरत असाल तर यामुळे चालताना तुमचा पाय पुढे सरकतो आणि बोटांवर जास्त जोर येतो.
गहू टिकतील वर्षांनुवर्षे- अळ्या, किडे अजिबात होणार नाहीत! धान्य भरताना लक्षात ठेवा ४ टिप्स
यामुळे तुमचे बाॅडी पोश्चर बदलत जाते. नेहमीच असं चुकीच्या पद्धतीने चालल्यावर आपोआपच पाठीत बाक येणे, पाठ- कंबर दुखणे असा त्रास होऊ शकतो.
याशिवाय अशा पद्धतीने चालल्यामुळे पायाचा घोटा आणि गुडघे या दोघांवरही जास्त जोर येऊन कमी वयातच गुडघेदुखी तसेच पायाचा घोटा दुखणे असा त्रास होऊ शकतो.
काकडीचं रायतं, कोशिंबीर तर नेहमीचीच, आता काकडीचं लोणचं खाऊन पाहा- घ्या चटपटीत रेसिपी
त्यामुळे क्रॉक्सचा बेल्ट नेहमी मागच्या बाजुनेच असायला हवा याची काळजी घ्या आणि तुमची मुलंही क्रॉक्स कोणत्या पद्धतीने घालत आहेत याकडे लक्ष द्या. अन्यथा कमी वयातच त्यांच्या मागे वेगवेगळे आजार लागू शकतात.