World Water Day 2025: पाणी हे जीवन आहे, असं का म्हटलं जातं याची कल्पना सगळ्यांनाच आहे. पृथ्वीवरील कोणताही जीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. जगभरात 22 मार्च या दिवशी World Water Day म्हणून पाळला जातो. 1993 पासून या दिवसाची सुरूवात झाली होती. या दिवसाचा उद्देश लोकांपर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचवणं आणि लोकांना पाणी वाचवण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे. आजच्या या महत्वाच्या दिवशी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला काय फायदे मिळतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यावरून पाण्याचं महत्व पुन्हा एकदा तुम्हाला कळेल.
सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे फायदे
किडनी-लिव्हर डिटॉक्स
किडनी जर रोज व्यवस्थित साफ झाली नाही तर शरीरात अनेक विषारी तत्व तसेच जमा होतील. ज्यामुळे किडनी डॅमेज होईल आणि इतरही अनेक समस्या होतील. अशात किडनी साफ करण्यासाठी म्हणजे डिटॉक्स करण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायला हवं. किडनीसोबतच लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी सुद्धा सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी पिणं महत्वाचं ठरतं.
मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
रोज सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्यानं शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि कॅलरी अधिक जळतात. ज्यामुळे तुम्हाला वजन लवकर कमी करण्यास मदत मिळते.
डोकेदुखी-अंगदुखी होईल दूर
जपानी मेडिकल सोसायटीनुसार, सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्यानं डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, वाढतं वजन, अस्थमा, टीबी, किडनी आणि लघवीच्या आजारांचा धोका कमी होतो.
त्वचा क्लीन होते
शरीर आतून साफ करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी पाणी पिणं गरजेचं आहे. रोज सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्यास त्वचेवर याचा प्रभाव दिसून येतो.
डिहायड्रेशन दूर होतं
शरीरात पाण्याची कमतरता झाली की, चक्कर येणे, कमजोरी जाणवणे, वजन कमी होणे अशा अनेक समस्या होतात. अशा अनेक समस्या टाळण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणं फार महत्वाचं ठरतं. यासाठी रोज सकाळी तर पाणी प्यावंच सोबतच दिवसभर भरपूर पाणी प्यावं.
वाढते ऊर्जा
सकाळी उपाशीपोटी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीराची ऊर्जा वाढते. त्यामुळे दिवसभर वेगवेगळी कामं करण्यास तुम्हाला मदत मिळते.