Join us

तुम्ही विचारही करू शकत नाही अशा भयानक आजारांना आमंत्रण देतो लठ्ठपणा! ऐका धोक्याची घंटा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 19:31 IST

World Obesity Day: ४ मार्च हा दिवस जागतिक लठ्ठपणा दिन म्हणून ओळखला जातो. डॉक्टर सांगतात वाढत्या वजनामुळे होऊ शकणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेऊन वेळीच वजन नियंत्रित ठेवण्यासाठ प्रयत्न करा..(Health Risks of Overweight & Obesity)

ठळक मुद्दे लठ्ठपणा हा असा एक त्रास आहे जो येताना त्याच्यासोबत अनेक वेगवेगळ्या आजारांना घेऊन येत असतो.

सध्या वाढत्या वजनाचा त्रास अनेकांना होत आहे. कारण एकतर प्रत्येकाच्याच जीवनपद्धतीमध्ये खूप जास्त बदल झाला आहे. खाण्यापिण्याच्या सवयी तर बदलल्या आहेतच पण शारिरीक हालचालींचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. अनेकांना व्यायाम करायला अजिबात वेळ मिळत नाही. शिवाय ८ ते १० तास सलग एका जागी बसून काम करावे लागते. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या खूप वाढते आहे. लहान मुलांच्या बाबतीतही हेच दिसून येत आहे. कारण एकतर त्यांच्याही आहारातले जंकफूड, पॅकफूड, प्रोसेस्ड फूडचे प्रमाण वाढले आहे. शिवाय मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मुलांमध्येही स्थुलता दिसून येते (World Obesity Day). लठ्ठपणा हा असा एक त्रास आहे जो येताना त्याच्यासोबत अनेक वेगवेगळ्या आजारांना घेऊन येत असतो (obesity increases the risk of 8 diseases).. त्यामुळे त्याच्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.(Health Risks of Overweight & Obesity)

 

लठ्ठपणामुळे मागे लागणारे आजार

१. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराचा धोका असे अनेक आजार जडू शकतात.

२. इन्सुलिन प्रतिकारशक्ती कमी झाल्याने टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

देखण्या नवरा- नवरीसाठी घ्या नव्या पद्धतीच्या सुंदर मुंडाळव्या!! बघा एकदम हटके ८ पॅटर्न्स...

३. वजनाचा भार वाढल्यामुळे कमी वयातच सांधेदुखी, गुडघेदुखी, हाडांचे आजारही मागे लागू शकतात. कंबरेवर अतिरिक्त ताण येऊन कंबर दुखणे, पाठदुखी असा त्रासही होऊ शकतो. 

४. फुफ्फुसांवरही लठ्ठपणाचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे असा त्रास होतो. सतत घोरणे किंवा थकवा जाणवणे हे त्याचेच परिणाम आहेत.

 

५. याशिवाय यकृतामध्ये चरबी साठते व नॉलअल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीस होण्याचा धाेका वाढतो.

६. लठ्ठपणाचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे आत्मविश्वास कमी होणे, नैराश्य येणे असा त्रासही होऊ शकतो.

कॅन्सरने आपल्याला गाठूच नये असं वाटतं ना? मग डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी कराच...

७. लठ्ठपणामुळे बऱ्याचदा शरीरात होणारे बदल चटकन दिसून येत नाहीत.  त्यामुळे स्तन, गर्भाशय, आतडे, प्रोस्टेट अशा अवयवांच्या कॅन्सरचा धोकाही वाढतो.

८. पचनासंबंधी तक्रारी वाढतात. नेहमीच अपचन, ॲसिडीटी होते. पित्ताशयात खडे होतात. पुर्वी १० पैकी २ जणांमध्ये लठ्ठपणा दिसून यायचा. पण आता मात्र १० पैकी ४ जणांमध्ये लठ्ठपणा दिसून येतो, अशी माहिती डॉ. नीलेश लोमटे यांनी लोकमतला दिली.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयरोगहृदयविकाराचा झटकामधुमेह