World Lung Cancer Day 2025 : जगभरात कॅन्सरनं मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्या मोठी आहे. त्यात फुप्फुसाच्या कॅन्सरनं जीव जाणाऱ्यांची संख्या बरीच जास्त आहे. एका रिपोर्टनुसार, फुप्फुसांच्या कॅन्सरच्या ८० ते ९० टक्के केसेसमध्ये तंबाखू किंवा सिगारेटचा धूर मुख्य कारण मानला जातो. जे लोक स्मोकिंग करत नाहीत, त्यांच्यात हा धोका आनुवांशिक, वायू प्रदूषण, रेडॉन गॅस आणि इतर रसायनांच्या संपर्कात आल्यानंही वाढतो. फुप्फुसांचा कॅन्सर फुप्फुसांच्या पेशी असामान्यपणे विभाजित झाल्यावर आणि वाढल्यावर होतो. या पेशी ट्यूमरचं रूप घेतात, ज्यामुळे पुढे जाऊन कॅन्सर होतो. जर वेळेवर यावर उपचार मिळाले नाही तर व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
फुप्फुसाच्या कॅन्सरचे मुख्यपणे दोन प्रकार आहेत. एका म्हणजे नॉन-स्मॉल सेल (NSCLC) आणि स्मॉल सेल (SCLC). ८५ टक्क्यांपेक्षा अधिक केसेसमध्ये नॉन-स्मॉल सेल प्रकार आढळतो. तर १५ टक्क्यांमध्ये स्मॉल सेल कॅन्सर आढळतो. नॉन-स्मॉल सेल हळूहळू आणि स्मॉल सेल वेगानं वाढतो.
फुप्फुसाच्या कॅन्सरबाबत जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी वर्ल्ड लंग कॅन्सर डे (World Lung Cancer Day 2025) पाळला जातो. फुप्फुसांमध्ये कॅन्सर झाल्याची काही लक्षणं शरीरात दिसतात. जर वेळीच ही लक्षणं ओळखली तर रूग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो. आज आपण तेच बघणार आहोत.
फुप्फुसाच्या कॅन्सरची सुरूवात कशी होते?
फुप्फुसाचा कॅन्सर प्रामुख्याने धुम्रपान केल्यानं होतो. अनेक वर्षांपासून धुम्रपान केल्यानं तंबाखूच्या धुरामुळे आणि इतर कार्सिनोजेन्समुळे विषारी रसायनं फुप्फुसांच्या संपर्कात येतात. ज्यामुळे डीएनएमध्ये बदल होतो. हाच पुढे जाऊन कॅन्सर होतो.
लंग कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं
- सतत खोकला, जो अनेक दिवस बरा होत नाही.
- खोकल्यासोबत कफ किंवा रक्त येणे
- श्वास घेण्यास त्रास किंवा अस्वस्थ वाटणे
- छातीत वेदना, खासकरून खोकताना किंवा श्वास घेताना
- आवाजात बदल किंवा जडपणा
- अचानक वजन कमी होणे
- कमजोरी आणि थकवा
- भूक कमी लागणे
काही केसेसमध्ये या कॅन्सरची काही सायलेंट लक्षणंही दिसतात. जसे की, खांदे किंवा हातांमध्ये वेदना, डोळ्यांची समस्या, छातीत नेहमीच इन्फेक्शन, शरीराच्या इतर भागात सूज आणि वेदना.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या २०२४ च्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, वेळीच जर ही लक्षणं ओळखली नाही तर यातून बाहेर पडणं अवघड होऊन बसतं. सुरूवातीच्या स्थितीची माहिती मिळाल्यावर ५ वर्ष जगण्याचा दर साधारण ५० ते ७० टक्के असू शकतो. जर जास्तच उशीर केला तर जगण्याचा दर केवळ १ टक्का किंवा त्यापेक्षाही कमी राहतो. वेळेवर उपचार घेतले तर यातून बचाव केला जाऊ शकतो. यासाठी टेस्ट करणं, लक्षण ओळखणं या गोष्टी करणं महत्वाचं ठरतं.