कामाच्या बदलेल्या वेळेमुळे आपण तासन्तास एकाच ठिकाणी बसून राहातो. कधी दिवसा तर कधी रात्रीच्या वेळी काम केल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. (Home Remedies for Heartburn) यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या वेळेसह पाठीवर, कंबेरवर आणि झोपेवरही परिणाम होऊ लागतो.
सतत एकाच जागी बसल्यामुळे तरुणांमध्ये पित्ताचा त्रास पाहायला मिळत आहे. (desk job acidity problem) यामुळे छातीत जळजळ होणे, अपचन, पोटात दुखणे किंवा अन्ननलिकेत वेदना होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (How to cure acidity permanently) यामुळे पचनसंस्थेवर दबाव येऊन शरीरातील आम्लपित्त अधिक वाढते. पण हा त्रास तुम्हालाही वारंवार होत असेल तर योग्य ती काळजी वेळीच घ्यायला हवी. शरीरात आम्लता वाढत असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेऊया.
1.नियमित व्यायाम करा
सकाळी नियमितपणे व्यायाम केल्याने तुमचे पूर्ण शरीर सक्रिय राहाते. तसेच पचनसंस्था मजबूत होऊन पित्ताची समस्या कमी होण्यास मदत होते. तर पोटात तयार होणाऱ्या आम्लापासून तुम्हाला आराम मिळेल.
2.खाण्यापिण्याच्या सवयी बदला
डेस्क जॉब करताना आपण सतत काही ना काही अनहेल्दी पदार्थ चघळत असतो. त्यामुळे पित्ताची समस्या अधिक वाढते. त्यासाठी आपल्या आहारात फायबर असलेले पदार्थ, फळे, भाज्या खा. तसेच मसालेदार पदार्थ, तेलाचे किंवा जंक फुड खाणे टाळा. यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होईल.
3.पाण्याचे प्रमाण वाढवा
कामाच्या ठिकाणी एकाच जागी एसीमध्ये बसल्याने सहसा आपल्याला तहान लागत नाही. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या आणि पोटात गॅस तयार होतो. काहीही खाल्ले की, छातीत जळजळ सुरु होते. अशावेळी पाण्याचे प्रमाण वाढवायला हवे. ज्यामुळे पचनसंस्था सुरळीत होऊन आम्लपित्ताचा त्रास कमी होईल.
4.तणाव कमी करा
वाढत्या कामाच्या व्यापामुळे आपल्याला अधिक तणाव येतो. त्यामुळे वेळेवर खाणे-पिणे होत नाही, झोपचे तंत्र देखील बिघडते. अशावेळी आपण नियमितपणे योगा, ध्यान आणि व्यायाम करायला हवा. जास्त तणाव घेतल्यामुळे पित्ताचा त्रास वाढतो. त्यामुळे तुम्हाला तणावमुक्त राहायला हवे.
5. अल्कोहोल आणि कॅफिन
अल्कोहोल आणि कॅफिनचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे पित्ताची समस्या वाढते. जर तुम्हाला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर कॅफिनचे सेवन कमी करा. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधं घ्या, मनानं घेऊ नका.