Join us

'हा' आजार असलेल्या महिलांना दुप्पट असतो हार्ट डॅमेजचा धोका, तुम्हाला तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:32 IST

Heart Disease : धक्कादायक बाब म्हणजे हार्ट डॅमेज होत असल्याचं कोणतंही मुख्य लक्षण दिसत नसल्यानं हा आजार सायलेंट किलर मानला जातो. 

Heart Disease : वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका अलिकडे खूप जास्त वाढलेला आहे. महिला असो वा पुरूष कुणालाही हे हृदयरोग होऊ शकतात. हार्ट डॅमेज हा असाच एक आजार आहे जो आजकाल खूप वाढला आहे. पण याची महत्वाची बाब हा पुरूषांपेक्षा एक खास आजार असलेल्या महिलांना अधिक होतो. धक्कादायक बाब म्हणजे हार्ट डॅमेज होत असल्याचं कोणतंही मुख्य लक्षण दिसत नसल्यानं हा आजार सायलेंट किलर मानला जातो. 

अलिकडेच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, टाइप २ डायबिटीसनं पीडित महिलांना हिडन हार्ट डॅमेजचा धोका पुरूषांच्या तुलनेत दुप्पट असतो. डायबिटीस एक गंभीर समस्या असून यात शरीरातील वेगवेगळे अवयव प्रभावित होतात. ज्यात हृदयाचा देखील समावेश आहे. ब्लड शुगर लेव्हल जास्त झाल्यानं आर्टरीज आणि हृदयाचं नुकसान होतं, ज्यामुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. पण हा धोका महिलांना जास्त असतो.

हा रिसर्च कोरोनरी मायक्रोवस्कुलर डिसफंक्श कंडीशनवर आधारित होता. ज्यात हृदयाच्या छोट्या ब्लड वेसल्समध्ये ब्लड फ्लो विस्कळीत होतो. चला समजून घेऊ असं का होतं आणि याचा धोका कसा कमी करता येईल.

महिलांना हार्ट डिजीजचा धोका जास्त का?

लेस्टर यूनिव्हर्सिटीतील अभ्यासकांना आढळून आलं की, ४६ टक्के महिलांमध्ये कोरोनरी मायक्रोवस्कुलर डिसफंक्शनची लक्षणं होती, तर पुरूषांमध्ये हे प्रमाण २६ टक्के होतं.  

हा फरक चिंताजनक आहे कारण महिलांमध्ये हार्ट डिजीजची लक्षणं पुरूषांपेक्षा वेगळी असतात, जी अनेकदा क्लीअर नसतात. नॉर्मल टेस्ट, जसे की ECG किंवा अ‍ॅंजियोग्राफी इत्यांदीमध्ये ही समस्या दिसून येत नाही. डायबिटीसमुळे महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कोणत्याही इशाऱ्याशिवाय वाढतो. 

बचावासाठी काय कराल?

हृदयरोगांचा धोका टाळण्यासाठी ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवा. नियमितपणे ब्लड शुगर चेक करा. HbA1c ७ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरच्या सल्ल्यानं औषधं घ्या. हेल्दी डाएट फॉलो करा. तसेच कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली डाएट जसे की, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, डाळी आणि फायबर असलेली फळं खावीत. इतंकच नाही तर सॅच्युरेटेड फॅट आणि प्रोसेस्ड फूड्स टाळा. ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हृदयासाठी फायदेशीर असतं. 

नियमितपणे एक्सरसाईज करा

रोज किमान ३० मिनिटं एक्सरसाईज करा, वजन कंट्रोलमध्ये ठेवा, कारण लठ्ठपणा डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका वाढवतो. ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवा, मीठ कमी खा, चिंता कमी करा आणि चांगली झोप घ्याय. तसेच मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्सरसाईज करा. 

स्मोकिंग, दारूपासून दूर रहा

स्मोकिंग केल्यानं ब्लड वेसल्सचं नुकसान होतं. तसेच अल्कोहोलनंही हृदयाचं नुकसान होतं. त्यामुळे नियमितपणे हृदयाचं चेकअप करा. 

टॅग्स : हृदयरोगमधुमेहहेल्थ टिप्स