Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सार्वजनिक शौचालयात जाताना महिलांनी घ्यायला हवी खबरदारी, युरिन इन्फेक्शनचा मोठा धोका..

सार्वजनिक शौचालयात जाताना महिलांनी घ्यायला हवी खबरदारी, युरिन इन्फेक्शनचा मोठा धोका..

Women should take precautions in public toilets, there is a high risk of urinary tract infection : सार्वजनिक शौचालय सुविधेसाठी असले तरी ते स्वच्छ नसेल तर आजारपण पसरेल. पाहा काय होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 15:56 IST2025-05-01T15:54:58+5:302025-05-01T15:56:33+5:30

Women should take precautions in public toilets, there is a high risk of urinary tract infection : सार्वजनिक शौचालय सुविधेसाठी असले तरी ते स्वच्छ नसेल तर आजारपण पसरेल. पाहा काय होईल.

Women should take precautions in public toilets, there is a high risk of urinary tract infection. | सार्वजनिक शौचालयात जाताना महिलांनी घ्यायला हवी खबरदारी, युरिन इन्फेक्शनचा मोठा धोका..

सार्वजनिक शौचालयात जाताना महिलांनी घ्यायला हवी खबरदारी, युरिन इन्फेक्शनचा मोठा धोका..

सार्वजनिक ठिकाणी आजकाल पिण्याच्या पाण्याची सोय असते. वॉशरुमची सोय असते. राहण्याची आणि खाण्याचीही सोय असते. (Women should take precautions in public toilets, there is a high risk of urinary tract infection.)सगळ्या प्रकारच्या मूलभूत सोयी आजकाल सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहेत. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे की अशा सोयी जागोजागी उपलब्ध आहेत. एखाद्या ठिकाणी सार्वजनिक सुविधा नसतील तर मग पर्यटनासाठी येणाऱ्यांची किंवा कोणाला काही इमर्जंसी असेल अशा लोकांचे फार वांदे होतात. (Women should take precautions in public toilets, there is a high risk of urinary tract infection.)त्यामुळे सार्वजनिक सोयी सुविधा असणे गरजेचे आहे. पण या ठिकाणांचा वापर करणे सुरक्षित आहे का?

नक्कीच सुरक्षित नाही. सार्वजनिक शौचालय वापरणे नक्कीच पूर्णपणे सुरक्षित नाही. अनेक लोक त्या ठिकाणाचा वापर करत असतात. स्वच्छतेसाठी कर्मचारी असतात, मात्र सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती आपल्याकडे चांगली नाही हेही सत्य आहे. गरज नसताना या ठिकाणांचा वापर करणे टाळा, कारण काही भयंकर आजार सार्वजनिक शौचालयांचा वापर केल्याने पसरतात.

१. युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन  
या आजाराचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. सगळीकडे आता कमोड सिस्टीम आहे. कमोडला अनेकांच्या त्वचेचा स्पर्श झालेला असतो. त्यामुळे कमोडवर अनेक जंतू असतात. तसेच बॅक्टेरियल इन्फेक्शन परत येते. त्यामुळे मग जळजळ होते. लघवी करताना वेदना होतात. इतरही काही लक्षणे दिसायला लागतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. युरीनरी इन्फेक्शन फार वाईट ठरू शकते.

२. फंगल इन्फेक्शन  
अनेकदा सार्वजनिक सुविधांच्या जागा दमट व अशुद्ध असतात. त्याची सफाई चांगली केली जात नाही. पाणी कमी वापरले जाते. त्यामुळे मांड्यांना तसेच योनीभवती खाज येते. रॅश उठतात. जळजळ होते. इतरही त्रास होतात.

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शक्यतो भारतीय पद्धतीचे शौचालय वापरावे. कमोड वापरणे टाळा. टॉयलेट सीट क्लिनरसाठी स्प्रे मिळतो. हा स्प्रे प्रत्येक महिलेने प्रवासात वापरायला हवा. सॅनिटायझर वापरा. आजकाल पे अॅण्ड युज म्हणजेच पैसे देऊन वापरता येतात असे वॉशरुम असतात. त्यांचा वापर करा. स्वच्छता नसेल तर तेथे जाणे टाळा. युरीनरी इन्फेक्शन झाले की मग त्याचा त्रास फार होतो.

Web Title: Women should take precautions in public toilets, there is a high risk of urinary tract infection.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.