Heart Attack Symptoms In Women: अलिकडे हार्ट अॅटॅकच्या केसेस खूप वाढल्या आहेत. केवळ पुरूषच नाही तर महिलांमध्ये या केसेस वाढल्या आहेत. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, पुरूषांच्या तुलनेत महिलांना हार्ट अॅटॅकचा धोका अधिक राहतो. पण याच्या लक्षणांकडे महिला दुर्लक्ष करतात किंवा याची लक्षणं लगेच दिसून येत नाहीत. महिलांनी हार्ट अॅटॅकसंबंधी लक्षणांबाबत जागरूक होण्याची गरज आहे. जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार करून जीव जाण्याचा धोका टाळता येईल. अशाच काही लक्षणांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
महिलांमध्ये हार्ट अॅटॅकची लक्षणं
महिलांमध्ये हार्ट अॅटॅकची लक्षणं थोडी वेगळी असतात. ज्यामुळे ती लगेच ओळखता येत नाही. त्यांच्या छातीत जोरात वेदना होण्याऐवजी श्वास घेण्यास समस्या, जबडा आणि खांद्यामध्ये वेदना, मळमळ, उलटी, बेशुद्ध पडणे, चक्कर येणे आणि सुस्ती यांसारख्या समस्या होऊ शकतात. अशात नियमितपणे टेस्ट कराव्या.
इतरही काही लक्षणं
सतत थकवा
अनेकदा महिलांना दिवसभर काम केल्यानंतर थकवा आणि कमजोरी जाणवते. या समस्या समजून दुर्लक्ष केलं जातं. पण अनेकदा थकवा हार्टसंबंधी समस्यांचा संकेत असू शकते. जर नेहमीच थकवा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
छातीत दुखणे किंवा दबाव
छातीत हलक्या वेदना किंवा अस्वस्थ वाटणं काही सामान्य नाही. अनेक महिलांमध्ये छातीत वेदना, दबाव किंवा अस्वस्थ वाटणं हे हार्ट अॅटॅक किंवा हृदयासंबंधी समस्यांचं लक्षण असू शकतं.
मेनोपॉजच्या आधी आणि नंतर हार्ट डिजीजवर प्रभाव
मेनोपॉजमुळे वजन वाढतं, पोटावर चरबी जमा होते, डायबिटीस, हाय कोलेस्ट्रॉलचा धोकाही वाढतो. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. वेळेआधीच मेनोपॉज हार्ट अॅटॅक आणि हार्ट फेलिअरचा धोका वाढवतं.
कोणत्या कारणाने हार्ट अॅटॅकचा धोका?
गर्भनिरोधक गोळ्यांमुळे ब्लड क्लॉट, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवतात. याचा सगळ्यात जास्त धोका अशा महिलांमध्ये होतो, ज्या धुम्रपान करतात. ज्यांचं ब्लड प्रेशर हाय आणि हाय कोलेस्टेरॉल असतं. अशा महिलांना जास्त काळजी घेण्याची गरज असते.