शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपचा दररोज वापर केला जातो. मात्र आता एका नवीन रिसर्चमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शाम्पू, बॉडी लोशन, साबण आणि आयलॅश ग्लूसारख्या पर्सनल केअर प्रोडक्टमध्ये फॉर्मल्डिहाइडसारखे केमिकल्स असतात जे शरीरात फॉर्मल्डिहाइड सोडतात.
या केमिकल्सचा कॅन्सरच्या धोक्याशी संबंध आहे आणि त्याचा सततचा वापर गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या ७० महिलांवर हे संशोधन करण्यात आलं, ज्यामध्ये असं आढळून आलं की, यापैकी ५३% महिला नियमितपणे अशा उत्पादनांचा वापर करत होत्या.
हा रिसर्च एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी सहभागींना अॅप वापरून त्यांच्या उत्पादन लेबलचे फोटो सबमिट करण्यास सांगितले. विश्लेषणानंतर असं आढळून आलं की, ५८% केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये फॉर्मल्डिहाइड सोडणारे केमिकल्स असतात.
या रिसर्चचे प्रमुख लेखक डॉ. रॉबिन डॉडसन म्हणाले की, आपण दररोज वापरणाऱ्या पर्सनल केअर प्रोडक्टमध्ये हे केमिकल्स असतात. वारंवार संपर्कामुळे गंभीर नुकसान होऊ शकतं. ग्राहकांना हे केमिकल्स ओळखणं कठीण होतं कारण लेबलवर लिहिलेली नावं समजत नाहीत. उदाहरणार्थ, DMDM Hydantoin हे एक केमिकल आहे जे शरीरात फॉर्मल्डिहाइड सोडतं.