Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बी कॉम्प्लेक्स कमी झाले की महिलांना होतात हे टिपिकल आजार, पाहा लक्षणे काय उपाय काय

बी कॉम्प्लेक्स कमी झाले की महिलांना होतात हे टिपिकल आजार, पाहा लक्षणे काय उपाय काय

Women get these diseases when B complex levels are low, see the symptoms, what are the remedies : शरीरातील जीवनसत्त्व कमी झाले की होतात अनेक आजार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2026 16:32 IST2026-02-01T16:31:21+5:302026-02-01T16:32:48+5:30

Women get these diseases when B complex levels are low, see the symptoms, what are the remedies : शरीरातील जीवनसत्त्व कमी झाले की होतात अनेक आजार.

Women get these diseases when B complex levels are low, see the symptoms, what are the remedies | बी कॉम्प्लेक्स कमी झाले की महिलांना होतात हे टिपिकल आजार, पाहा लक्षणे काय उपाय काय

बी कॉम्प्लेक्स कमी झाले की महिलांना होतात हे टिपिकल आजार, पाहा लक्षणे काय उपाय काय

बी-कॉम्पलेक्स म्हणजे शरीरासाठी आवश्यक असलेल्या आठ महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचा (व्हिटॅमिन्सचा) समूह. ही सर्व जीवनसत्त्वे पाण्यात विरघळणारी असल्यामुळे ती शरीरात साठून राहत नाहीत, म्हणूनच त्यांचा नियमित पुरवठा आहारातून होणे गरजेचे असते. ऊर्जा निर्मिती, मज्जासंस्थेचे कार्य, रक्तनिर्मिती आणि त्वचा-केसांचे आरोग्य यामध्ये बी-कॉम्पलेक्सची भूमिका फार महत्त्वाची आहे. बी-कॉम्पलेक्समध्ये व्हिटॅमिन B1 (थायमिन), B2 (रायबोफ्लेविन), B3 (नायसिन), B5 (पँटोथेनिक अॅसिड), B6 (पायरीडॉक्सिन), B7 (बायोटिन), B9 (फॉलिक अॅसिड) आणि B12 (कोबालामिन) यांचा समावेश होतो. हे सर्व घटक एकत्रितपणे शरीरातील हालचाली सुरळीत ठेवतात आणि मेंदू व स्नायूंना आवश्यक ऊर्जा देतात.

शरीरात बी-कॉम्पलेक्सची कमतरता झाल्यास सुरुवातीला सतत थकवा जाणवणे, कमजोरी, चक्कर येणे, भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. त्वचेवर कोरडेपणा, ओठ फाटणे, तोंडाच्या कोपऱ्यांत जखमा होणे, जीभ लाल होणे किंवा जळजळ होणे ही सामान्य लक्षणे आहेत. केस गळणे, नखं ठिसूळ होणे आणि त्वचेवर पुरळ येणे यामागेही बी-कॉम्पलेक्सची कमतरता कारणीभूत असू शकते. काही लोकांमध्ये ही कमतरता वाढली तर मानसिक आणि मज्जासंस्थेशी संबंधित तक्रारी दिसू शकतात. चिडचिडेपणा, नैराश्य, लक्ष केंद्रित न होणे, स्मरणशक्ती कमी होणे, हात-पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे ही लक्षणे विशेषतः B12 आणि B6 च्या कमतरतेमुळे आढळतात. गर्भवती महिलांमध्ये फॉलिक अॅसिडची कमतरता असल्यास गर्भाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो.

बी-कॉम्पलेक्सची कमतरता टाळण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धान्ये, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, केळी, शेंगदाणे, बदाम, अक्रोड यांचा आहारात नियमित समावेश केल्यास या जीवनसत्त्वांचा पुरवठा चांगल्या प्रमाणात होतो.  कधी-कधी आहारातून पुरेसा बी-कॉम्पलेक्स मिळत नसेल, सतत आजारपण, ताणतणाव, दारुचे अतिसेवन किंवा पचनाच्या समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बी-कॉम्पलेक्स सप्लिमेंट्स घेणे उपयुक्त ठरते. मात्र स्वतःहून औषधे घेण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे.

एकंदरीत, बी-कॉम्पलेक्स हे शरीराच्या दैनंदिन कार्यासाठी अत्यावश्यक आहे. त्याची कमतरता वेळेवर ओळखून योग्य आहार आणि गरज असल्यास उपचार केले, तर थकवा, त्वचेच्या समस्या आणि मज्जासंस्थेचे त्रास सहज टाळता येऊ शकतात.

Web Title : बी-कॉम्प्लेक्स की कमी: महिलाओं में लक्षण, रोग और उपचार

Web Summary : बी-कॉम्प्लेक्स विटामिन ऊर्जा, नसों और रक्त के लिए महत्वपूर्ण हैं। कमी से थकान, त्वचा की समस्याएं और तंत्रिका संबंधी समस्याएं होती हैं। अनाज, साग, डेयरी और नट्स से भरपूर आहार महत्वपूर्ण है। जरूरत पड़ने पर सप्लीमेंट मदद कर सकते हैं।

Web Title : B-Complex Deficiency: Symptoms, diseases in women and Remedies Explained

Web Summary : B-complex vitamins are vital for energy, nerves, and blood. Deficiency causes fatigue, skin issues, and neurological problems. Diet rich in grains, greens, dairy, and nuts is crucial. Supplements can help if needed.