Abdominal Obesity in Women : भारतात लठ्ठपणाची समस्या खूप जास्त वाढत चाललीये. ही समस्या सगळ्यात जास्त महिलांमध्ये बघायला मिळते. बरं असं नाही की, वय जास्त झाल्यावरच ही समस्या होते. कमी वयातही अनेक महिला - तरूणी लठ्ठपणाच्या शिकार होताहेत. एका रिपोर्टनुसार, भारतात ३० ते ४९ वयोगटातील प्रत्येक १० पैकी ५ ते ६ महिलांना पोटावर चरबी वाढण्याची समस्या आहे.
डायबिटीस अॅन्ड मेटाबॉलिक सिंड्रोम जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, भारतीय पुरूषांच्या तुलनेत महिला एब्डोमिनल ओबेसिटी म्हणजे पोटावर चरबी वाढण्याच्या समस्येच्या शिकार आहेत. स्थिती इतकी गंभीर आहे की, ३० ते ४९ वयोगटातील १० पैकी साधारण ६ महिलांना ही समस्या आहे. महिलांमध्ये ८० सेमी आणि पुरूषांसाठी ९४ सेमीपेक्षा अधिक कंबरेचा घेर या धोक्याच्या श्रेणीत येतो.
काय सांगतो रिसर्च?
सामान्यपणे आपण लठ्ठपणा हा बॉडी मास इंडेक्सने मोजतो, पण हा रिसर्च सांगतो की, BMI शरीराची मूळ स्थिती लपवू शकतो. कारण एशियन इंडियन्समध्ये बॉडी फॅट जास्त असतो. अनेकदा वजन सामान्य असूनही पोटावर जमा चरबी अंतर्गत अवयवांसाठी घातक ठरते. त्यामुळे कंबरेची घेर मोजणे योग्य ठरेल. रिसर्चनुसार, हा ट्रेंड टीनएजर्स आणि तरूणींमध्ये वेगाने वाढत आहे. अर्बन लाइफस्टाईल, जास्त कमाई आणि नॉन-व्हेज डाएट याचं मोठं कारण आहे.
काय आहेत लठ्ठपणाची कारणं?
रिसर्चनुसार, वाढतं वय, शहरांमध्ये राहणं, अधिक कमाई आणि जास्त नॉन-व्हेज खाणं या गोष्टींमुळे महिलांच्या पोटावरील चरबी वाढत आहे. लिव्हर पँक्रियासच्या आसपास फॅट मेटाबॉलिक रिस्क वाढतो. रिसर्चमधून इशारा देण्यात आलाय की, याने टाइप - २ डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, किडनीसंबंधी आजार आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो.
लठ्ठपणा कसा कमी कराल?
एक्सपर्ट सांगतात की, वजन वाढलं असेल तर रूटीन चेकअप करा. पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम याने लठ्ठपणाची ही समस्या कंट्रोल केली जाऊ शकते. आता सामान्य लठ्ठपणावर नाही तर एब्डॉमिनलवर लक्ष देण्याची गरज आहे. ही समस्या ग्रामीण भागातही वाढू लागली आहे. शहरात याचं प्रमाण अधिक आहे. एक्सपर्ट सांगतात की, वजन चेक करण्यासोबतच आपल्या कंबरेच घेर चेक करणं देखील महत्वाचं आहे.
