Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Sexually Transmitted Infections: लैंगिक संबंधातून होणारे ५ इन्फेक्शन टाळण्यासाठी महिलांनी करायला हव्या ५ गाेष्टी...

Sexually Transmitted Infections: लैंगिक संबंधातून होणारे ५ इन्फेक्शन टाळण्यासाठी महिलांनी करायला हव्या ५ गाेष्टी...

Sexually Transmitted Infections : Information for Women: Women do these 5 things after physical relation to reduce infection risk : what women should do after physical intimacy : natural ways to maintain hygiene after sex : लैंगिक संबंधातून महिलांना होणारे त्रास कायम लपवले जातात, ते योग्य नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 22:05 IST2025-07-19T22:00:00+5:302025-07-19T22:05:02+5:30

Sexually Transmitted Infections : Information for Women: Women do these 5 things after physical relation to reduce infection risk : what women should do after physical intimacy : natural ways to maintain hygiene after sex : लैंगिक संबंधातून महिलांना होणारे त्रास कायम लपवले जातात, ते योग्य नाही.

Women do these 5 things after physical relation to reduce infection risk what women should do after physical intimacy natural ways to maintain hygiene after sex | Sexually Transmitted Infections: लैंगिक संबंधातून होणारे ५ इन्फेक्शन टाळण्यासाठी महिलांनी करायला हव्या ५ गाेष्टी...

Sexually Transmitted Infections: लैंगिक संबंधातून होणारे ५ इन्फेक्शन टाळण्यासाठी महिलांनी करायला हव्या ५ गाेष्टी...

शारीरिक संबंध ही वैवाहिक नात्यातली महत्वाची गोष्ट. हे संबंध सुखद असतील तर नातं निकोप तर राहतंच त्यासोबत दोघांचं शारीरिक मानसिक आरोग्यही उत्तम रहायला मदत होते( Women do these 5 things after physical relation to reduce infection risk).

लैंगिक संबंधातून होणारे आजार, विशेषत: महिलांना होणारे आजार ही मोठी समस्या आहे आणि त्यावर औषधोपचारही लाज वाटते याकारणास्तव केले जात नाहीत. लैंगिक संबंधातून होणारे इन्फेक्शन (what women should do after physical intimacy) टाळणे शक्य असते, त्यासाठी काही गाेष्टींची काळजी महिलांनी घ्यायला हवी ( natural ways to maintain hygiene after sex).

काय करायला हवं?

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिखा भारती यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीनुसार लैंगिक संबंधांनंतर महिलांनी ५ महत्वाच्या गोष्टी  करणं गरजेचं असतं. त्यानं अनेक आजार टळू शकतात.

१. लघवीला जाणं :- महिलांनी शारीरिक संबंधांनंतर लघवीला जाऊन येणं अत्यावश्यक आहे. संभोगाच्या दरम्यान जर कोणतेही बॅक्टेरिया मूत्रमार्गात गेले असतील, तर लघवी करताना ते शरीरातून बाहेर टाकले जातात. यामुळे युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) होण्याचा धोका कमी होतो. 

२. पाणी प्यावं :- शारीरिक संबंधांनंतर पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळतं आणि त्यामुळे लघवीची प्रक्रिया सुरळीत होते. थकवा येत नाही. 

तीन तिघाडा काम बिघाडा ही विसरा, '३-३-३ चा नियम' पाळा - वजन होईल किमी जबरदस्त वेगाने....

३. योनीची स्वच्छता :- शारीरिक संबंधांनंतर महिलांनी योनीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. संबंधानंतर गार पाण्याने गुप्तांग स्वच्छ धुवावं, पण यावेळी कोणताही साबण किंवा केमिकलयुक्त वॉश वापरणं टाळावं. कारण यामुळे योनीचे नैसर्गिक pH संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. धुतल्यानंतर स्वच्छ, कोरड्या आणि मऊ टॉवेलने हलक्या हाताने पुसून कोरडं ठेवणं महत्त्वाचं आहे.

४. अंतर्वस्त्रे बदला :- शारीरिक संबंधांनंतर महिलांनी अंतर्वस्त्रे बदलण अत्यंत आवश्यक असते. स्वच्छ आणि सुती अंतर्वस्त्रं घालावीत. यामुळे त्वचा कोरडी आणि स्वच्छ राहते, तसेच ओलावा टिकत नाही, जो बॅक्टेरिया वाढीसाठी कारणीभूत ठरतो. 

नर्गिस फाकरी वर्षातून २ वेळा करते 'हा' उपाय, स्वतःला 'असं' ठेवते मेंटेन - पाहा तिचा फिटनेस फंडा...

५. विश्रांती घ्या :- संभोगानंतर काही काळ विश्रांती घेतली पाहिजे. हे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे महत्वाचे असते. जर लघवी करताना जळजळ, खाज सुटणे यासह आणखी काही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यायला हवा. दुर्लक्ष करणं घातक ठरतं.

Web Title: Women do these 5 things after physical relation to reduce infection risk what women should do after physical intimacy natural ways to maintain hygiene after sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.