Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > महिलांनाही छळतोय फॅटी लिव्हरचा त्रास, वाढलेलं वजन आणि आयुष्यभराचं दुखणं-पाहा कारणं..

महिलांनाही छळतोय फॅटी लिव्हरचा त्रास, वाढलेलं वजन आणि आयुष्यभराचं दुखणं-पाहा कारणं..

Women are also suffering from fatty liver disease, weight gain, and lifelong pain - see the reasons : महिलांमध्ये फॅटी लिव्हरचा वाढता त्रास ठरेल धोक्याचा. पाहा काय कारणे आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2025 17:20 IST2025-07-22T17:17:01+5:302025-07-22T17:20:38+5:30

Women are also suffering from fatty liver disease, weight gain, and lifelong pain - see the reasons : महिलांमध्ये फॅटी लिव्हरचा वाढता त्रास ठरेल धोक्याचा. पाहा काय कारणे आहेत.

Women are also suffering from fatty liver disease, weight gain, and lifelong pain - see the reasons.. | महिलांनाही छळतोय फॅटी लिव्हरचा त्रास, वाढलेलं वजन आणि आयुष्यभराचं दुखणं-पाहा कारणं..

महिलांनाही छळतोय फॅटी लिव्हरचा त्रास, वाढलेलं वजन आणि आयुष्यभराचं दुखणं-पाहा कारणं..

फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये मेदाचा साठा होणे. सामान्यत: लिव्हरमध्ये थोड्या प्रमाणात चरबी असते, परंतु ही चरबी प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात जमा झाल्यास त्याला 'फॅटी लिव्हर' असे म्हटले जाते. वैद्यकीय भाषेत याला 'हिपॅटिक स्टीटोसिस' असे म्हणतात. (Women are also suffering from fatty liver disease, weight gain, and lifelong pain - see the reasons..)ही स्थिती पटकन कळून येत नाही. लक्षणे जरा उशीरा दिसायला लागतात. पण वेळेवर उपचार न झाल्यास समस्या गंभीर होऊ शकते. जसे की लिव्हर इन्फ्लेमेशन (सायटोहेपॅटायटिस), लिव्हर फिब्रोसिस, सिरॉसिस किंवा अगदी लिव्हर फेल्युअर सुद्धा. असे केअर हॉस्पिटल्सच्या साईटवर लिहिले आहे. 

महिलांमध्ये फॅटी लिव्हर होण्यामागे अनेक कारणे असतात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे हार्मोनल बदल. स्त्रियांमध्ये विशेषतः मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते. ज्याचा परिणाम पचन प्रक्रियेवर होतो आणि त्यामुळे शरीरात मेद साठण्याची शक्यता वाढते. या व्यतिरिक्त, आधुनिक जीवनशैली देखील फॅटी लिव्हरसाठी कारणीभूत ठरते. सतत बसून राहण्याची सवय, शारीरिक हालचालींचा अभाव, अयोग्य आहार, जंक फूड, साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्न यामुळे लिव्हरमध्ये चरबी साठते.

लठ्ठपणा हा फॅटी लिव्हरचा एक महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः पोटाभोवती साचलेली चरबी लिव्हरसाठी घातक ठरते. इन्सुलिन रेसिस्टन्स ही आणखी एक अवस्था आहे जी फॅटी लिव्हरसाठी कारणीभूत ठरते. इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणजे शरीर योग्यप्रकारे इन्सुलिन वापरू शकत नाही. ज्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते आणि चरबी साठायला लागते.

महिलांमध्ये थायरॉईडची समस्या, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS), मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल यांसारखे आजारही फॅटी लिव्हरसाठी कारणीभूत असतात. तसेच अल्कोहोलमुळे फॅटी लिव्हरचा त्रास होतो. पण अनेक महिलांमध्ये अल्कोहोल न घेताही 'नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज'(NAFLD) दिसून येते.

औषधांचा दीर्घकालीन वापर,  स्टिरॉइड्स, टॅमॉक्सिफेन किंवा काही अँटीबायोटिक्स, यांचाही लिव्हरवर परिणाम होतो. तसेच झोपेची कमी, मानसिक ताण-तणाव आणि धावपळीची जीवनशैलीही लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम करते. महिलांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही शारीरिक लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. 

Web Title: Women are also suffering from fatty liver disease, weight gain, and lifelong pain - see the reasons..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.