Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लघवीनं डोळे धुतल्यानं खरंच दृष्टी वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं काय खरं, काय खोटं...

लघवीनं डोळे धुतल्यानं खरंच दृष्टी वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं काय खरं, काय खोटं...

Eye Wash With Urine: खरंच असं केल्यानं डोळे चांगले होतात का किंवा डोळ्यांच्या समस्या दूर होतात का? याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:20 IST2025-06-28T12:02:29+5:302025-06-28T12:20:19+5:30

Eye Wash With Urine: खरंच असं केल्यानं डोळे चांगले होतात का किंवा डोळ्यांच्या समस्या दूर होतात का? याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. 

Woman washing her eyes with urine goes viral on social media doctor tells how dangerous it is | लघवीनं डोळे धुतल्यानं खरंच दृष्टी वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं काय खरं, काय खोटं...

लघवीनं डोळे धुतल्यानं खरंच दृष्टी वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं काय खरं, काय खोटं...

Eye Wash With Urine: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात एक महिला तिच्या लघवीनं डोळे धुताना दिसत आहे. महिलेनं दावा केला की, असं केल्यानं दृष्टी अधिक चांगली होते. त्याशिवाय ड्रायनेस, जळजळ, खाज आणि लालसरपणा या समस्याही दूर होतात. पण खरंच असं केल्यानं डोळे चांगले होतात का किंवा डोळ्यांच्या समस्या दूर होतात का? याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. 

लघवीनं डोळे धुणं फायदेशीर आहे का?

लघवीनं डोळे धुणं सुरक्षित आणि फायदेशीर असतं का? याबाबत NDTV ला डॉक्टर रिंकी अग्रवाल यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "शरीरातून निघणाऱ्या प्रत्येक द्रव्य पदार्थाची एक खास संरचना आणि काम असतं. जसे की, अश्रू डोळे साफ करतात. यांमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल एंझाइम्स, अ‍ॅंटी-बॉडी आणि म्यूसिन सारखे तत्व असतात, जे डोळ्यांचा बाहेरील इन्फेक्शनपासून बचाव करतात. तेच लघवी शरीरातून निघणारं वेस्ट आहे. ज्यात यूरिया, क्रिएटिनिन, बॅक्टेरिया, एपिथेलिअल सेल्स आणि अनेक विषारी तत्व असतात. अशात लघवी डोळ्यात टाकणं योग्य नाही. असं केल्यानं डोळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं".

त्या सांगतात की, "जर लघवीनं डोळे धुतले तर यानं डोळ्यांमध्ये जळजळ, सूज, लाल चट्टे, इन्फेक्श आणि इतरही काही गंभीर समस्या होऊ शकतात. लघवी आणि अश्रूंमधील केमिकल्स पूर्णपणे वेगळे असतात. अश्रू क्षारिय असतात, तर लघवी आम्लीय असते. त्यामुळे लघवी डोळ्यांच्या संपर्कात येणं घातक ठरू शकतं".

डॉक्टर सांगतात की, सोशल मीडिया अशाप्रकारचे घातक आणि खोटे ट्रेण्ड वेगानं पसरत आहेत. पण विचार न करता कोणताही ट्रेण्ड फॉलो करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. डोळे आपल्या शरीरातील सगळ्यात नाजूक आणि संवेदनशील अवयव आहेत. अशात डोळ्यांसोबत असे काही प्रयोग करणं टाळलं पाहिजे. काही समस्या असेल तर डॉक्टरांना दाखवायला हवेत.

Web Title: Woman washing her eyes with urine goes viral on social media doctor tells how dangerous it is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.