हिवाळ्याच्या दिवसांत वातावरणातील गारवा वाढला की शरीराच्या अनेक समस्या त्रास देतात. थंडीच्या दिवसांत अनेकांना हातापायांना सूज येणे, बोटे बधिर होणे किंवा ब्लड सर्क्युलेशन नीट न होण्यासारख्या समस्या जाणवू लागतात. ज्याचा थेट परिणाम शरीराच्या रक्तभिसरणावर होतो. रक्ताचा प्रवाह संथ झाल्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि सांधेदुखी देखील वाढते. अशावेळी फक्त गरम कपडे घालणे पुरेसे ठरत नाही, तर शरीराला आतून उष्णता देणारी आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करणारी योग्य काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. योग्य तेलाने नियमित मसाज केल्यास हातापायांतील सूज कमी होण्यास, स्नायूंना आराम मिळण्यास आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होऊ शकते(winter swelling in hands and feet remedy).
थंडीच्या दिवसांत या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि शरीरातील ऊब टिकवून ठेवण्यासाठी मालिश हा सर्वात जुना आणि फायदेशीर उपाय मानला जातो. योग्य तेलाने केलेली मालिश केवळ सूजच कमी करत नाही, तर रक्ताभिसरण सुधारून शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते. थंडीच्या दिवसांत हातापायांची सूज घालवण्यासाठी आणि रक्तप्रवाह (best oil for hand and foot massage in winter) सुरळीत करण्यासाठी नेमक्या कोणत्या तेलांचा (oil massage for cold-induced swelling) वापर करावा आणि मालिश करण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहूयात...
थंडीच्या दिवसांत हातापायांची सूज घालवण्यासाठी खास तेल...
थंडीच्या दिवसांत हातापायांची सूज घालवण्यासाठी खास तेल तयार करण्यासाठी मोहरीचे तेल १/२ कप, १ टेबलस्पून हळद, २ ते ३ लसूण पाकळ्या इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
तेल तयार करण्याची कृती...
सगळ्यांत आधी एका मोठ्या भांड्यात मोहरीचे तेल व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर या गरम तेलात लसूण ठेचून घालावा. सोबतच हळद देखील घालावी. हे सगळे जिन्नस तेलात व्यवस्थित गरम होऊ द्यावे. मग ३ ते ५ मिनिटे तेल मंद आचेवर गरम करून घेतल्यानंतर गॅस बंद करावा. तेल गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. हे तेल थोडे कोमट असतानाच सूज आलेल्या भागांवर हलकेच लावून मसाज करून घ्यावा. त्यानंतर अंगावर ऊबदार असे कपडे घालावेत. या साध्यासोप्या घरगुती उपायामुळे थंडीच्या दिवसांत हातापायांना येणारी सूज कमी होऊन आराम मिळतो.
हाता - पायांत काटा रुतून बसलाय? फक्त २ मिनिटांत वेदनेशिवाय काटा काढण्याचे २ भन्नाट उपाय...
हा घरगुती उपाय करण्याचे फायदे...
१. मोहरीचे तेल :- मोहरीचे तेल हे निसर्गता उष्ण गुणधर्माचे असते, त्यामुळे हिवाळ्यात शरीरातील ऊब टिकवून ठेवण्यास मदत होते. या तेलाने मालिश केल्यामुळे संथ झालेला रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होतो. हे तेल स्नायूंमधील कडकपणा कमी करून सांधेदुखी आणि वेदनांपासून त्वरित आराम देते.
२. लसूण पाकळ्या :- तेलात लसूण गरम करून लावल्यामुळे तेलाचे औषधी गुणधर्म दुपटीने वाढतात; लसूण हा 'नॅचरल पेनकिलर' म्हणून काम करतो. लसणामध्ये दाहशामक गुणधर्म असतात, जे हातापायांवरील सूज झपाट्याने कमी करण्यास मदत करतात. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करून रक्ताभिसरण सुधारण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर ठरतो.
३. हळद :- हळदीमध्ये 'कर्क्युमिन' हा घटक असतो, जो अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक म्हणून कार्य करतो. हळदीच्या उष्णतेमुळे रक्तातील गाठी किंवा सूज कमी होण्यास मदत होते. त्वचेवरील लालसरपणा आणि खाज कमी करण्यासाठी हळद फायदेशीर असून ती नैसर्गिकरीत्या जखमा भरून काढण्यास मदत करते.
