थंडीचे दिवस सुरू झाले की, वातावरणातील वाढत्या गारठ्यामुळे सर्दी, खोकला, घशात खवखव आणि कणकण होणे यांसारख्या समस्या लगेच डोकं वर काढतात. हवामानातील बदलांमुळे होणारे हे आजार लहान मुलांना आणि वृद्धांना तर जास्तच त्रास देतात. या कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत खोकला, नाक वाहणे आणि घशात खवखव ही समस्या जवळजवळ (winter cold & cough home remedy) प्रत्येक घरात दिसू लागते. हवेतला गारठा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो आणि त्यामुळे हंगामी आजार पटकन होतात. हिवाळ्यात वारंवार होणारे लहान - सहान आजार किंवा आरोग्याच्या कुरबुरी कमी करण्यासाठी आपल्या आजीच्या बटव्यातील पारंपरिक घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरतात(winter season health tips).
हिवाळ्यात वरचेवर होणारी सर्दी - खोकला, घशाची खवखव कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील काही पदार्थ असरदार ठरतात. या उपायांसाठी लागणारे सगळे पदार्थ, जसे की हळद, आले, मध, तुळस आपल्या घरात सहज उपलब्ध असतात. कोणतेही दुष्परिणाम नसलेले आणि सोपे असे हे घरगुती उपाय लगेच आराम देतात. आपल्या स्वयंपाकघरातील आले, हळद, मध किंवा मसाले योग्य पद्धतीने वापरले तर हे घरगुती उपाय हिवाळ्यातील हंगामी आजारांवर अगदी सुरक्षित व परिणामकारक ठरतात. थंडीच्या दिवसांत या हंगामी आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, घरातच उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर (Instant cough relief home remedy) करून कोणकोणते प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय करता येतील ते पाहूयात...
हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी - खोकला आणि घशाच्या खवखवीवर खास उपाय...
हिवाळ्यात होण्याऱ्या लहान - सहान घरगुती आजार बरे करण्यासाठी घरगुती उपाय करताना आपल्याला १ मोठा स्टीलचा चमचा, चमचाभर मध, प्रत्येकी १/२ टेबलस्पून काळीमिरी पूड व काळे मीठ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
चमचाभर-मूठभर की वाटीभर, एका दिवसात किती सुकामेवा खाणं पोटासाठी बरं? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ सांगतात...
घरगुती उपाय काय ?
सर्वात आधी एक स्टीलचा चमचा घेऊन तो गॅसच्या मध्यम आचेवर थेट धरुन हलकेच गरम करून घ्यावा. लक्षात ठेवा की चमचा गरजेपेक्षा जास्त गरम करु नका अन्यथा मध आणि चमचा दोन्ही खराब होऊ शकतात. गरम चमचा गॅसवरून उतरवा आणि त्यात १ चमचा मध घाला. मध घसादुखी आणि खोकला कमी करण्यासाठी केला जाणारा घरगुती उपाय आहे. मधातील औषधी गुणधर्म घसा लवकर बरा करण्यास मदत करतात. आता यात थोड काळे मीठ आणि काळीमिरी पावडर घाला. काळे मीठ घशातील कफ कमी करते आणि खोकल्यापासून त्वरित आराम देते. हे घसा साफ ठेवण्यास मदत करते.
हिवाळ्यात आहारात हवेच असे ६ फूड - कॉम्बिनेशन! कडाक्याच्या थंडीतही राहाल हेल्दी, ठणठणीत...
काळीमिरी पूड घसा आणि छातीतील कफ दूर करते. यामुळे कफ पातळ होऊ लागतो आणि जुनाट खोकला देखील बरा होतो. हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या आणि मग घोट घेत घेत प्या. असे म्हटले जाते की, हा उपाय घशाला त्वरित आराम पोहोचवतो आणि खोकल्याची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणे फायदेशीर मानले जाते. जर तुमचा खोकला जास्त काळ बरा होत नसेल, ताप येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा घसा खूप जास्त सुजला असेल, तर डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते. हा उपाय सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्यावर प्राथमिक घरगुती उपचार करू शकतो, पण गंभीर स्थितीमध्ये वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते.
हा उपाय कसा आहे फायदेशीर...
१. मध :- मधामध्ये नैसर्गिकरित्या जखमा बऱ्या करण्याचे औषधी गुणधर्म असल्याने ते घशातील सूज आणि खवखव कमी करून तात्काळ आराम देते.
२. काळीमिरी पूड :- काळीमिरी पूड कफ पातळ करते आणि छातीतील कफ दूर करून खोकल्याची तीव्रता कमी करण्यास मदत करते.
३. काळे मीठ :- काळे मीठ घशातील जमा झालेला कफ बाहेर काढण्यास मदत करते आणि घसा साफ ठेवण्यास फायदेशीर ठरते.
