Join us

चांगले दिसत नाहीत म्हणून नाकातील केस काढता? असं करणं अत्यंत धोक्याचं, श्वसन आजारांचाही धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:14 IST

Nose Hair Removing Side Effects : बऱ्याच महिला वाढलेल्या केसांमुळे नाक वळवळत असल्यानं त्यातील केस कात्रीनं कापतात किंवा खेचून तोडतात. पण असं करणं आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक ठरू शकतं.

Nose Hair Removing Side Effects : काखेतील केस असतील, प्रायव्हेट पार्टवरील असतील किंवा ओठ किंवा दाढीवरील असतील ते काढून टाकले जातात. कारण असं करणं आरोग्यासाठी फायदेशीरही असतं. पण बऱ्याच महिला एका अशा अवयवातील केस काढतात जे त्यांना महागात पडू शकतं. तो अवयव म्हणजे नाक. बऱ्याच महिला वाढलेल्या केसांमुळे नाक वळवळत असल्यानं त्यातील केस कात्रीनं कापतात किंवा खेचून तोडतात. पण असं करणं आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक ठरू शकतं. ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. ब्रिटिश डॉक्टर करण राजन यांनी सोशल मीडियावरून लोकांना याबाबत आवाहन केलं की, नाकातील केस कधीच काढू नये.

इन्स्टाग्रामवर याबाबत डॉक्टर करण राजन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे आणि पोस्टच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की, ग्रूमिंग म्हणून नाकातील केस काढणं जीवघेणं ठरू शकतं. त्यांनी डायग्रामच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, नाकातील केस आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत आणि ते काढणं आपल्याला किती प्रभावित करू शकतं.

नाकातील केस नुकसानकारक नाही तर फायदेशीर

डॉक्टर म्हणाले की, आपल्या नाकात दोन प्रकारचे केस असतात. एक मायक्रोस्पोपिक सिलिया हेअर जे नाकाच्या आतील द्रव्य फिल्टर करतात आणि ते पुन्हा घशाकडे पाठवतात. तर मोठे पार्टिकल्स बाहेर येतात. डॉक्टर या जाड केसांना बाहेर काढण्यास मनाई करतात. डॉक्टर म्हणाले की, जर ते दिसायला चांगले दिसत नसतील तर खेचून काढण्याऐवजी कापून छोटे केले जाऊ शकतात. हे केस नाकात बॅक्टेरिया आणि जर्म्स जाण्यापासून रोखतात. जर ते काढले तर जर्म्स नाकात जाऊन इन्फेक्शन होऊ शकतं.

ब्रेन इन्फेक्शनचा धोका

डॉक्टरांनी डायग्रामच्या माध्यमातून दाखवलं की, नाकाच्या आत होणाऱ्या डेंजर ट्राएंगलमुळे ब्रेन इन्फेक्शन होऊ शकतं. नाकातील काही नसा नाकात रक्त पुरवठा  करतात. ज्या मेंदुतील रक्ताच्या काही नसांना मिळतात. त्यात जर जर्म्स किंवा बॅक्टेरिया झाले तर यामुळे ब्रेनमध्ये इन्फेक्शन पसरू शकतं. 

डॉक्टर म्हणाले की, हे तसं लवकर होत नाही. पण आपल्या इम्यून सिस्टीमला प्रभावित करण्याची यात पूर्ण क्षमता असते. अशात नाकातील केसांना अनावश्यक समजून ते वॅक्स किंवा कोणत्याही प्रकारे खेचून काढून नका त्याऐवजी कापून कमी करा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य