Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुम्हीही रात्री सॉक्स घालून झोपता का? जाणून घ्या सॉक्स घालून झोपण्याचे नुकसान!

तुम्हीही रात्री सॉक्स घालून झोपता का? जाणून घ्या सॉक्स घालून झोपण्याचे नुकसान!

Side Effects of Sleeping With Socks : रात्री सॉक्स घालून झोपल्याने भलेही थंडीपासून बचाव होत असला तरी याचे अनेक नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:18 IST2024-12-17T11:18:05+5:302024-12-17T11:18:35+5:30

Side Effects of Sleeping With Socks : रात्री सॉक्स घालून झोपल्याने भलेही थंडीपासून बचाव होत असला तरी याचे अनेक नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Why you should never sleep wearing socks know the reason | तुम्हीही रात्री सॉक्स घालून झोपता का? जाणून घ्या सॉक्स घालून झोपण्याचे नुकसान!

तुम्हीही रात्री सॉक्स घालून झोपता का? जाणून घ्या सॉक्स घालून झोपण्याचे नुकसान!

Side Effects of Sleeping With Socks : थंडीचा पारा सध्या चांगलाच वाढला आहे. अशात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक सामान्यपणे स्वेटर, गरम कपडे, टोपी आणि सॉक्सचा वापर करतात. अनेकांना तुम्ही रात्री सॉक्स घालून झोपताना पाहिलं असेल. मात्र, सॉक्स घालून झोपण्याआधी याचे आरोग्याला होणारे नुकसान आणि फायदे माहीत असले पाहिजे. रात्री सॉक्स घालून झोपल्याने भलेही थंडीपासून बचाव होत असला तरी याचे अनेक नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सॉक्स घालून झोपण्याचे नुकसान

1) झोप न येण्याची समस्या

जर तुम्ही सॉक्स घालून झोपत असाल तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते. अशात तुमची झोप पूर्ण होणार नाही आणि अधे-मधे तुम्हाला जाग येईल.

2) नसांवर पडतो दबाव

जेव्हा तुम्ही सॉक्स घालून झोपता तेव्हा नसांवर दबाव पडतो. नसांवर दबाव पडल्याने तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा सामना करावा लागू शकतो.

3) ब्लड सर्कुलेशन 

सॉक्स घालून झोपल्याने नसांवर प्रेशर पडतं. ज्यामुळे तुमचं ब्लड सर्कुलेशन बिघडतं. यामुळे इतरीही वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

4) ओवर हीटिंगची समस्या 

हिवाळ्यात सामान्यपणे लोक ब्लॅंकेट किंवा दुलई घेऊन झोपतात. अशात जर तुम्ही सॉक्स घालत असाल तर तुमचं शरीर जास्त गरम होऊ सकतं. ज्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते.

5) इन्फेक्शनचा धोका

जास्त वेळ सॉक्स घालून राहिल्याने तुमच्या पायात इन्फेक्शन होण्याचा धोकाही असतो. अशात तुम्हाला खाज येण्याची समस्या होऊ शकते. 

6) श्वास घेण्यास समस्या

रात्री टाइट सॉक्स घालून झोपल्याने पायांच्या नसांवर दबाव पडतो. ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यास जास्त जोर लावावा लागतो. अशात श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.

Web Title: Why you should never sleep wearing socks know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.