आजच्या काळात 'डायबिटीस' हा केवळ एक आजार न राहता ती एक लाईफस्टाईल झाली आहे. आजकाल फारच कमी वयातच डायबिटीस होण्याचे प्रमाणात जास्त वाढले आहे. डायबिटीस झाल्यानंतर सर्वात आधी आहारात बदल करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यात साखर टाळणं हा महत्त्वाचा भाग असतो. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आपण गोड पदार्थांपासून लांब राहतो, पण अशा परिस्थितीत, भारतीयांचे चहावरचे प्रेम मात्र तसूभरही कमी होत नाही. चहा सोडणे कठीण वाटते, म्हणून मग मधला मार्ग शोधला जातो - 'बिनसाखरेचा चहा'...आपल्यापैकी कित्येकजण डायबिटीस असल्यावर साखेरचा चहा पिऊ शकत नसल्याने थेट चहातील साखर वगळून बिनसाखरेचा चहा पिणं पसंत करतात(Why milk tea or coffee without sugar also bad for diabetes).
अनेकांना वाटते की साखरेचा त्याग केला म्हणजे चहा आता पूर्णपणे सुरक्षित झाला आहे. पण, खरंच केवळ साखर टाळल्याने चहाचे दुष्परिणाम संपतात का? तज्ज्ञांच्या मते, डायबिटीस असताना साखर (sugar free tea for diabetes side effects) न घालता चहा पिणे हे देखील आरोग्यासाठी 'सायलेंट किलर' ठरू शकते. चहामधील कॅफिन, टॅनिन आणि रिकाम्या पोटी चहा घेण्याची सवय यामुळे रक्तातील साखरेवर विपरीत परिणाम होऊ शकतात. “साखर नाही म्हणजे चहा सुरक्षित” असा समजही बऱ्याच लोकांमध्ये आढळतो. मात्र तज्ज्ञांच्या मते, फक्त साखर टाळली म्हणून डायबिटीस असणाऱ्यांसाठी चहा पूर्णपणे फायदेशीर ठरत नाही. उलट वारंवार किंवा अति प्रमाणात बिनासाखरेचा चहा पिण्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर, पचनक्रियेवर आणि हार्मोन्सच्या संतुलनावरही परिणाम होऊ शकतो. डायबिटीस नियंत्रणात ठेवताना केवळ साखर कमी करणं पुरेसं नसून चहा कधी, किती आणि कसा पितो (why sugar free tea is also bad for diabetes) हेही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे बिनासाखरेचा चहा आरोग्यासाठी खरोखर फायदेशीर आहे की नकळत नुकसान करणारा ठरू शकतो, हे जाणून घेणं आवश्यक आहे.
डायबिटीस असताना बिनासाखरेचा चहा देखील का नुकसानकारक ठरतो ?
shlloka या युट्युब चॅनलवर प्रकाशित झालेल्या पॉडकास्टमध्ये डॉ. प्रमोद यांनी सांगितले की, डायबिटीस (मधुमेह) झाल्याचे समजताच अनेक लोक साखर सोडून देतात आणि विनासाखरेचा दुधाचा चहा पिण्यास सुरुवात करतात. मात्र, अशा चहामध्ये साखर न टाकल्याचा फारसा विशेष फायदा होत नाही. दुधाचा चहा हा साखरेसह किंवा साखरेविना, दोन्ही प्रकारे शरीराला नुकसानच पोहोचवतो. चहामध्ये साखर घातली किंवा नाही यामुळे या चहाच्या परिणामात फारसा फरक पडत नाही. दुधाचा चहा साखरेसह आणि बिनासाखरेचा — दोन्ही प्रकारे शरीराला नुकसान पोहोचवू शकतो. कारण घराघरात बनणारा साधारण चहा हा दुधात उकळून तयार केला जातो आणि दुधामध्ये IGF (इन्सुलिन-लाइक ग्रोथ फॅक्टर) असतो.
भात खाणं सोडू नका, फक्त तांदूळ बदला! वजन घटवण्यासाठी 'व्हाईट' की 'ब्राऊन', कोणता तांदूळ आहे बेस्ट?
एनआयएच (NIH) च्या माहितीनुसार, IGF म्हणजे इन्सुलिनसारखा कार्य करणारा ग्रोथ फॅक्टर. तज्ज्ञांच्या मते, IGF हे एक प्रोटीन असून ते ग्रोथ हार्मोन-बाइंडिंग प्रोटीनच्या क्रियेमुळे तयार होते. हे शरीराच्या वाढ आणि विकासाबरोबरच मेटाबॉलिझममध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. याचे हायपोग्लायसेमिक (रक्तातील साखर कमी करणे) आणि अॅनाबोलिक असे परिणामही शरीरावर दिसून येतात.
नको कडू काढे आणि डाएटचे पाढे, हा घ्या बॉडी डिटॉक्सचा सोपा आणि निवांत उपाय तो ही फुकट...
पोटाची ढेरी-जाडजूड मांड्या- फुग्यासारखे गाल लवकर होतील गायब, फक्त ३ सोप्या गोष्टी रोज करा...
डॉक्टरांनी अतिशय सोप्या शब्दांत सांगितले की, इन्सुलिन-लाइक ग्रोथ फॅक्टर म्हणजेच IGF शरीरात त्या ठिकाणी जाऊन चिकटतो जिथे इन्सुलिनने काम करणे अपेक्षित असते. त्यामुळे इन्सुलिन योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही आणि शरीरातील पेशींमध्ये साखर पोहोचण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामी रक्तातील साखर पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि इन्सुलिन रेसिस्टन्स निर्माण होतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. बहुतेक घरांमध्ये सकाळी प्यायली जाणारी गरम दुधाची चहा किंवा कॉफी हीच आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू लागते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रुग्णांनी ही सवय सोडणे अत्यंत आवश्यक आहे.
डायबिटीस असणाऱ्यांनी विनासाखरेचा चहा प्यायला तरी होणारे नुकसान...
१. दुधातील काही घटकांमुळे इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहणे कठीण होते.
२. चहात साखर घातली नाही तरी दुधातील नैसर्गिक साखर (लॅक्टोज) रक्तातील ग्लुकोज वाढवू शकते.
३. वारंवार चहा पिण्यामुळे शरीराची नैसर्गिक मेटाबॉलिक प्रक्रिया मंदावू शकते.
४. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास अॅसिडिटी, गॅस, अपचन आणि जळजळ होऊ शकते.
५. दिवसातून अनेक वेळा चहा घेतल्यास झोपेची गुणवत्ता कमी होते, आणि अपुरी झोप डायबिटीस नियंत्रण बिघडवू शकते.
६. चहातील कॅफिन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करू शकते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
७. जास्त कॅफिनमुळे हृदयाचे ठोके वाढणे आणि ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते.
Web Summary : Even sugar-free tea can harm diabetics due to caffeine, tannins, and milk's IGF. It disrupts blood sugar, digestion, and hormones. Doctors advise moderation and caution about milk tea's impact on insulin resistance. Reduce frequency and quantity to mitigate risks.
Web Summary : चीनी रहित चाय भी कैफीन, टैनिन और दूध के IGF के कारण मधुमेह रोगियों के लिए हानिकारक हो सकती है। यह रक्त शर्करा, पाचन और हार्मोन को बाधित करती है। डॉक्टर इंसुलिन प्रतिरोध पर दूध की चाय के प्रभाव के बारे में सावधानी बरतने और संयम बरतने की सलाह देते हैं। जोखिमों को कम करने के लिए बारंबारता और मात्रा कम करें।