Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हिवाळ्यात पायात सॉक्स घालून पाय उबदार ठेवायलाच हवेत, कारण... वाचा ६ जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2025 15:11 IST

Winter Special Health Tips:  हिवाळ्याच्या दिवसांत स्वेटर घालणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं पायांमध्ये सॉक्स घालून ठेवणं आहे, कारण...(why it is important to wear socks in winter season?)

ठळक मुद्दे पायात कायम सॉक्स घालून ठेवल्याने शरीरातली रक्ताभिसरण क्रियाही अधिक चांगली होते. हृदयाचे कार्य सुधारण्यासही मदत होते.

थंडीचा कडाका आता पुन्हा वाढला आहे. सुरुवातीला खूप थंडी पडली. त्यानंतर पुन्हा थंडी गायब होऊन उबदार वातावरण निर्माण झाले. आणि आता तापमानाचा पारा परत बऱ्यापैकी खाली घसरल्याने वातावरण चांगलेच थंड झाले आहे. थंडी वाढली की सर्दी, खोकला, कफ हे त्रास जसे वाढतात तसेच अंगदुखी, जॉईंटपेन, मसल पेन असे त्रासही सुरू होतात. याशिवा अनेकांना कॉन्स्टिपेशनचा त्रासही होतो. हे सगळे त्रास कमी करून राेगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर हिवाळ्यात पायात सॉक्स घालून ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण जमिनीतून जो थंडावा आपल्या तळपायांना मिळतो, त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत जातो (benefits of wearing socks). म्हणूनच थंड वातावरणात पायात सॉक्स घालणं का गरजेचं आहे ते पाहूया..(why it is important to wear socks in winter season?) 

 

हिवाळ्यात पायात सॉक्स घालून पाय उबदार ठेवायलाच हवेत, कारण....

१. पायात सॉक्स घालणं किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तळपाय जेवढे उबदार राहतील तेवढं किडनीचं कार्य सुधारतं.

२. आपल्या तळपायावर असे काही पॉईंट्स असतात ज्यांचा संबंध थेट आपल्या शरीरातल्या एनर्जीशी असतो. त्यामुळे एनर्जी लेव्हल चांगली ठेवायची असेल तर पाय उबदार ठेवायला हवे. यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

३. तळपायांमध्ये कायम सॉक्स घातल्यामुळे कंबरदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यामुळे ज्यांना नेहमीच कंबरदुखी, पाठदुखी असा त्रास होतो त्यांनी काही दिवस नियमितपणे सॉक्स घालून बघावेत.

 

४. ज्यांना रात्री शांत झोप येत नाही, सतत जाग येते किंवा अंथरुणावर पडल्यानंतरही बराच वेळ झोप येत नाही, त्यांनी रात्री झोपण्याच्या काही तास आधी पायात सॉक्स घालावेत. तसेच रात्रभर पायात सॉक्स तसेच राहू द्यावे. झोपेमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल.

५. पायात कायम सॉक्स घालून ठेवल्याने शरीरातली रक्ताभिसरण क्रियाही अधिक चांगली होते. हृदयाचे कार्य सुधारण्यासही मदत होते.

६. एवढेच नाही तर सॉक्समुळे पाय उबदार राहतात. त्यामुळे सर्व शरीरातच छान उबदारपणा जाणवतो आणि त्यामुळे आखडून गेलेले शरीर मोकळे होण्यास मदत होते, ब्लोटिंग कमी होते. तसेच जाॅईंट पेनही कमी होते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Wear socks in winter for warmth and these six health benefits.

Web Summary : Wearing socks in winter keeps feet warm, boosting kidney health, energy levels, and circulation. It reduces back pain, improves sleep, eases joint pain, and prevents body stiffness, offering overall comfort and well-being.
टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीआरोग्यहेल्थ टिप्स