Join us
Daily Top 2 Weekly Top 5

साखर बंद करून गूळ खाणं खरंच फायदेशीर आहे का? एक्सपर्ट म्हणतात, तुम्ही लवकर म्हातारे होत आहात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 13:07 IST

Why is sugar bad for your skin and aging: Is replacing sugar with jaggery healthy: पाहूयात आरोग्यासाठी सगळ्यात जास्त काय चांगलं आहे गूळ की साखर.

गोड खाल्ल्याने उतारवयाची लक्षणं दिसतात. हे विधान ऐकून अनेकांना धक्काच बसेल. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण शुगर क्रॅश आणि डायबिटीजच्या विळख्यात अडकलो आहोत. अनेकजण पांढऱ्या साखरेला आरोग्याचा शत्रू समजून गूळ हा नैसर्गिक पर्याय म्हणून पाहतात.(Why is sugar bad for your skin and aging) पण खरोखर गूळ खाणं आरोग्यासाठी योग्य आहे का? की तोही साखरेसारखा वजन वाढवणारा आहे.  सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेकांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग साखर झाली आहे.(Is replacing sugar with jaggery healthy) पण साखरेचे जास्त प्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. पाहूयात आरोग्यासाठी सगळ्यात जास्त काय चांगलं आहे गूळ की साखर.(Side effects of sugar on skin health)

साऊथ इंडियन महिलांचा पारंपरिक दागिना! मंगळसूत्राचे ५ रॉयल डिझाइन्स, लग्नसमारंभात मिळेल क्लासी लूक

पांढरी साखर शुद्ध करण्यासाठी त्यावर विविध रसायनांचा वापर केला जातो, ज्यामुळे त्यातील नैसर्गिक घटक नष्ट होतात आणि त्यात फक्त न हव्या असणाऱ्या कॅलरीज उरतात. गूळ हा नैसर्गिक पद्धतीने, उसाचा रस उकळवून बनवला जातो. ज्यात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्व असते. 

गूळ हा आपल्या पचनसंस्थेला सक्रिय करुन शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. गुळामध्ये नैसर्गिक लोह असल्याने अॅनिमियासारख्या आजारांशी लढण्यास मदत होते. साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar) अचानक वाढते, तर गुळातील घटक ऊर्जा हळूहळू देतात, ज्यामुळे थकवा कमी जाणवतो. 

एक्सपर्ट म्हणतात, गूळ साखरेपेक्षा नक्कीच चांगला आहे. पण औषध नाही. अनेकजण गूळ खातात. पण याचे अतिसेवन केल्यास वजन वाढू शकते. इतकेच नाही तर रक्तातील साखरेची पातळी देखील वाढते. मधुमेह असणाऱ्यांनी गूळाचे सेवन प्रमाणात करायला हवे. 

साखर आणि जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते, ज्यामुळे पेशींचे नुकसान होते. यालाच एजिंग (Aging) किंवा लवकर वृद्धत्व येणे असे म्हणतात. जर तुम्हाला चिरतरुण राहायचे असेल, तर गोड खाण्याचे प्रमाण कमी करणे हा एकमेव मार्ग आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Jaggery vs. Sugar: Is Jaggery Really Healthier? Experts Warn About Aging.

Web Summary : While many view jaggery as a healthy alternative to sugar, experts caution moderation. Jaggery offers benefits over refined sugar, but excessive consumption can still lead to weight gain and elevated blood sugar. High sugar intake accelerates aging by damaging cells.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स