हार्ट ॲटॅकचा आणि वयाचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. कारण अगदी कमी वयाच्या तरुण लोकांनाही हार्ट ॲटॅक आल्याच्या कित्येक घटना आपण पाहात असतो, ऐकत असतो. कारण बदललेली जीवनशैली हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. आता तर थंडीचे दिवस आले की हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाणही वाढतं असं आपण ऐकतो. ते कितपत खरं आहे आणि थंडीचा आणि हार्ट ॲटॅकचा धोका वाढण्याचा खरंच काही संबंध आहे का, याविषयी डाॅक्टरांनी शेअर केलेली ही माहिती प्रत्येकासाठीच उपयुक्त ठरणारी आहे.(Why Heart Attack Risk Increases in Winter?)
थंडीच्या दिवसांत हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण वाढते का?
थंडीच्या दिवसांत हार्ट ॲटॅक येण्याचा धोका खरोखरच काही पटींनी वाढलेला असतो, असं डॉ. सुब्रत अखौरी सांगतात. त्यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार थंडीच्या दिवसांत रक्ताभिसरण क्रियेवर परिणाम होतो.
उरलेल्या भातापासून फक्त ५ मिनिटांत करा जाळीदार डोसा- नेहमीच्या डोशापेक्षाही खूप चवदार
ते अधिक सावकाश होतं. त्यामुळे मग हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्त, ऑक्सिजन न मिळाल्याने पंपिंग करताना त्याच्यावर जोर येतो. त्यामुळे मग हार्ट ॲटॅक येण्याचा धोका थंडीच्या दिवसांत वाढलेला असतो. शिवाय बाहेर थंडी पडलेली असताना शरीर उबदार राहण्यासाठी रक्तवाहिन्या थोड्या आकुंचन पावतात. त्याचाही परिणाम रक्ताभिसरणावर होतो. याशिवाय ज्यांच्या धमन्यांमध्ये आधीपासूनच ब्लॉकेज असतात, त्यांच्यासाठी तर हा धोका जास्त वाढतो.
थंडीच्या दिवसांत हार्ट ॲटॅकचा धोका कमी करण्यासाठी काय काळजी घ्यावी?
डॉक्टर सांगतात की या दिवसांत नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सकाळी अतिशय थंड हवेत उबदार कपडे न घालताच घराबाहेर पडणंही टाळायला हवं.
सकाळी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करणं टाळायला हवं. याशिवाय सकाळी उठताच लगेच अतिशय अवघड व्यायामाला सुरुवात करणंही योग्य नाही. ज्यांना हाय बीपीचा त्रास असतो, अशा लोकांनी तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
