सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोट फुगणे आणि गॅस होण्याची समस्या एक सामान्य बनली आहे. अनेकदा आपण थोडेच जेवतो, पण त्यानंतर लगेच पोटात गुडगुड होते, गॅस होऊन पोट जड होण्याच्या तक्रारी सुरु होतात.(gas and bloating) यामुळे केवळ अस्वस्थता जाणवत नाही तर कामात लक्षही लागत नाही.(stomach bloating causes)
पोट फुगणे म्हणजे केवळ गॅस नसून, पचनसंस्थेत अडकलेली हवा किंवा पचन प्रक्रियेतील बिघाड असू शकतो.(home remedies for gas) जर तुम्हालाही असा त्रास वारंवार होत असेल तर महागड्या औषधांऐवजी तुमच्या स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक पदार्थ रामबाण ठरू शकतात.(bloated stomach relief) आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत जे पोटाच्या अनेक तक्रारी दूर करतात. जाणून घेऊया त्या ५ पदार्थांबद्दल.
तिळाचे लाडू दगडासारखे कडक होतात- तुटतच नाही? गूळ निवडण्यासाठी ४ टिप्स-लाडू मऊ खुसखुशीत
पोटाचे आरोग्य राखण्यासाठी आपल्याला चांगला आहार घेणं देखील तितकंच महत्त्वाच आहे. आपण यात घालत असणारे मसाले अन्नाला आणखी निरोगी राखण्यास मदत करतात. अनेक औषधी वनस्पती आणि मसाल्यांमध्ये पॉलिफेनॉल संयुगे असतात. ज्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. आतड्यांतील जीवाणू पॉलिफेनॉल पचवू शकतात, जे निरोगी जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात.
1. आल्यामध्ये अनेक पॉलीफेनॉल असतात , आल्यामध्ये 'जिंजरॉल' नावाचा घटक असतो. जो आपले पचन सुधारण्यास मदत करतो, यामुळे अन्न ही लवकर पचते. जेवणानंतर आल्याचा छोटासा तुकडा चघळा. यामुळे पोटातील गुडगुड थांबेल.
2. पोटात गॅस झाल्यानंतर बऱ्याच घरात आजही ओव्याचा वापर केला जातो. ओव्यामध्ये थायमोल असते. जे पोटातील एन्झाइम्सना सक्रिय करते आणि गॅसपासून आपल्याला लगेच आराम मिळतो. अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर काळं मीठ कोमट पाण्यासोबत घेतल्यास ५ मिनिटांत आराम मिळतो.
3. ताक हे आपल्याला पोटाच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक मानले जाते. यात असलेले लॅक्टिक अॅसिड पोटातील बॅक्टेरियांचे संतुलन राखते आणि पचन सुलभ करण्यास मदत करते. मसाला ताक पोटातील जळजळ आणि गॅस कमी करण्यासाठी चांगले आहे. दुपारच्या जेवणानंतर ताक पिणं फायदेशीर आहे.
4. पुदिन्यामध्ये पोटाला नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म आहेत. जे पोटातील गॅस बाहेर काढण्यास मदत करते आणि पचनसंस्थेला शांत करते. पित्तामुळे पोट फुगत असेल तर पुदिना अत्यंत प्रभावी ठरतो. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी प्या.
5. तसेच जेवताना पाणी पिणं टाळा, जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या. अन्न नीट चावून खायला हवं. ज्यामुळे लाळ अन्नात नीट मिसळते. रात्रीचे जेवण हलक असायला हवं. जेवण झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी करा.
