उचकी लागली ? नक्कीच कोणीतरी आठवण काढतंय. असं म्हणायची पद्धत आपल्याकडे आहे. आता ते खरं का खोटं माहिती नाही पण उचकी लागण्याचे खरे कारण नक्कीच सांगता येते. उचकी लागणे ही सामान्य अशी शारीरिक प्रक्रिया आहे. सगळ्यांनाच उचकी लागते. (why do we get hiccups? know the reason, see what to do , home remedies for instant relief )उचकी लागल्यावर बेचैन व्हायला होते. बहुतेक वेळा ती काही सेकंदांपासून काही मिनिटेच टिकते आणि आपोआप थांबते. मात्र काही लोकांना सारखी उचकी लागते, वारंवार उचकी येणे किंवा दीर्घकाळ उचकी सुरु राहणे यामुळे त्रास जाणवू शकतो. अशा वेळी हे फक्त एक साधे रिफ्लेक्स नसून शरीराने दिलेला छोटासा संकेतही असू शकतो. त्यामुळे उचकी लागण्याचे कारण जाणून घेणे गरजेचे असते.
उचकी ही डायाफ्राम या श्वसनाला मदत करणाऱ्या स्नायूच्या अचानक झालेल्या आकुंचनामुळे लागते. या आकुंचनानंतर आवाजपेटी बंद होते आणि हिक असा आवाज येतो. यामागील कारणे अनेक असू शकतात. जलद गतीने जेवणे, पोटात जास्त हवा जाणे, खूप गरम किंवा खूप थंड पदार्थ खाणे, तिखट खाणे, कार्बोनेटेड पेये पिणे किंवा अचानक जोरात हसणे. अशी साधी दैनंदिन कारणेही उचकीस कारणीभूत ठरु शकतात. मानसिक तणाव, थकवा किंवा अचानक तापमानातील बदलही उचकीचे कारण ठरतात. प्रसंगी ऍसिडिटी, पचनातील बिघाड, नसांशी संबंधित त्रास किंवा औषधांच्या दुष्परिणामामुळेही उचकी वारंवार लागू शकते.
साधारण उचकी ही हानिकारक नसते. परंतु जर उचकी खूप वेळ थांबत नसेल, वारंवार येत असेल किंवा दिवसातून अनेकदा लागत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. दीर्घकाळ सुरू राहणारी उचकी झोप बिघडवते, पचनावर परिणाम करते आणि रोजच्या कामात त्रास निर्माण करते. (why do we get hiccups? know the reason, see what to do , home remedies for instant relief )त्यामुळे उचकी लागल्यावर पाणी प्यावे, भरपूर पाणी प्यायचे. त्यामुळे उचकी थांबते. उचकी लागल्यावर मध खायचे. मध चाटल्याने उचकी थांबते हा फार जुना उपाय आहे. तसेच काहीही तिखट खाल्यावर लगेच उचकी लागत असेल तर शरीराला तिखट सोसत नसल्याना इशारा असतो. त्यामुळे अतितिखट खाणे टाळा. उचकी लागल्यावर चालायचे, त्यामुळे शरीराची क्रिया होते आणि उचकी थांबते.
